ETV Bharat / technology

Realme 16 Pro vs Motorola Edge 60 Pro : 30 हजाराच्या सेगमेंटमध्ये कोणता स्मार्टफोन उत्तम?

30 हजार रुपयांच्या सेगमेंटमध्ये रियलमी 16 प्रो आणि मोटोरोला एज 60 प्रो यांच्यात तीव्र स्पर्धा आहे. जाणून घ्या कोणता स्मार्टफोन आहे उत्तम.

Realme 16 Pro vs Motorola Edge 60 Pro
Realme 16 Pro vs Motorola Edge 60 Pro (Realme,Motorola)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : January 9, 2026 at 10:35 AM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : भारतात स्मार्टफोनच्या मिड-रेंज सेगमेंटमध्ये सध्या मोठी स्पर्धा सुरू आहे. रियलमीनं 8 जानेवारी 2026 रोजी रियलमी 16 प्रो 5G लॉंच केला, तर मोटोरोला एज 60 प्रो 5G गेल्यावर्षी 30 एप्रिल 2025 रोजी बाजारात आला होता. दोन्ही फोन सुमारे 30 हजार रुपयांच्या किंमत सेगमेंटमध्ये आहेत, त्यामुळं ग्राहकांना कोणता फोन खरेदी करावा याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. रियलमी 16 प्रो मोठ्या बॅटरीवर भर देतो, तर मोटोरोला एज 60 प्रो कॅमेरा आणि परफॉर्मन्समध्ये आघाडी घेतो. या बातमीत आम्ही दोन्ही फोनची किंमत, कॅमेरा, बॅटरी, डिस्प्ले आणि परफॉर्मन्सची सविस्तर तुलना केलीय, जेणेकरून तुम्हाला योग्य निर्णय घेणं सोपं होईल.

undefined
रियलमी १६ प्रो

किंमत
किंमतीच्या बाबतीत मोटोरोला एज 60 प्रो आघाडीवर आहे. रियलमी 16 प्रो चं 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 31,999 ला मिळतं. त्याचवेळी मोटोरोला एज 60 प्रो चं 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट फक्त 29,999 ला उपलब्ध आहे. म्हणजेच कमी किंमतीत दुप्पट स्टोरेज मिळत असल्यानं मूल्याच्या दृष्टीनं मोटोरोला अधिक आकर्षक वाटतो.

image
Motorola Edge 60 Pro

कॅमेरा सेटअप
कॅमेरा हा दोन्ही फोनचा मजबूत मुद्दा आहे. रियलमी 16 प्रोमध्ये रियरला 200 मेगापिक्सेल मुख्य सेन्सर (OIS सह) आणि 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेन्स आहे. सेल्फी साठी 50 मेगापिक्सेल कॅमेरा दिला आहे. याउलट, मोटोरोला एज 60 प्रो ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येतो. 50 मेगापिक्सेल मुख्य सेन्सर (OIS), 50 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड आणि 10 मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्स. सेल्फी साठीही 50 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. जर तुम्हाला उच्च रिझॉल्यूशन मुख्य सेन्सर हवा असेल तर रियलमी 16 प्रो चांगला, पण उत्तम अल्ट्रा-वाइड आणि झूमसाठी मोटोरोला एज 60 प्रो निश्चितच फायदेशीर ठरेल.

undefined
रियलमी १६ प्रो

बॅटरी आणि चार्जिंग
बॅटरीच्या बाबतीत रियलमी 16 प्रो आघाडीवर आहे. यात 7000 एमएएचची मोठी बॅटरी आहे आणि 80 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. मोटोरोला एज 60 प्रोमध्ये 6000 एमएएच बॅटरी आहे, पण यात 90 वॉट वायर्ड, 15 वॉट वायरलेस आणि 5 वॉट रिव्हर्स वायरलेस चार्जिंग आहे. म्हणजेच दैनंदिन वापरात रियलमीची बॅटरी जास्त टिकेल, तर मोटोरोलाचे चार्जिंग पर्याय अधिक प्रगत आणि सोयीस्कर आहेत.

One camera system. No moment out of reach.
Motorola Edge 60 Pro

डिस्प्ले
डिस्प्ले दोन्ही फोन उत्तम आहेत, पण वेगळ्या गरजा पूर्ण करतात. मोटोरोला एज 60 प्रोमध्ये 6.7 इंच कर्व्ड पीओएलईडी डिस्प्ले असून 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि पीक ब्राइटनेस 4500 निट्स आहे. रियलमी 16 प्रोमध्ये मोठा 6.78 इंच फ्लॅट एमोलेड डिस्प्ले आहे. 144 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 1400 निट्स एचबीएम ब्राइटनेस आहे. आउटडोअर वापरात मोटोरोलाचा डिस्प्ले अधिक चांगला, तर गेमिंगसाठी रियलमीचा स्मूथ रिफ्रेश रेट फायदेशीर.

undefined
रियलमी १६ प्रो

परफॉर्मन्स
परफॉर्मन्समध्ये मोटोरोला एज 60 प्रो अधिक फायदेशीर आहे. यात मीडियाटेक डायमेन्सिटी 8350 एक्स्ट्रीम चिपसेट आहे, तर रियलमी 16 प्रोमध्ये फक्त डायमेन्सिटी 7300 मॅक्स आहे. गेमिंग, मल्टीटास्किंग आणि दीर्घकाळ वापरात मोटोरोला अधिक स्मूथ आणि कार्यक्षम ठरेल. जर तुम्हाला मोठी बॅटरी आणि उच्च रिझॉल्यूशन मुख्य कॅमेरा हवा असेल तर रियलमी 16 प्रो चांगला पर्याय आहे. पण बहुमुखी कॅमेरा, उत्तम परफॉर्मन्स, प्रगत चार्जिंग आणि कमी किंमतीत जास्त स्टोरेज हवे असतील तर मोटोरोला एज 60 प्रो निश्चितच फायदेशीर ठरेल.

image
Motorola Edge 60 Pro

रियलमी १६ प्रो विरुद्ध मोटोरोला एज ६० प्रो: फीचर्सची तुलना

फीचररियलमी 16 प्रोमोटोरोला एज 60 प्रो
किंमत (8 जीबी रॅम)31,999 (128 जीबी स्टोरेज)29,999 (256 जीबी स्टोरेज)
रियर कॅमेरा200 मेगापिक्सेल मुख्य (OIS) + 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड50 मेगापिक्सेल मुख्य (OIS) + 50 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड + 10 मेगापिक्सेल टेलिफोटो
फ्रंट कॅमेरा50 मेगापिक्सेल50 मेगापिक्सेल
बॅटरी क्षमता7000 एमएएच6000 एमएएच
चार्जिंग80 वॉट फास्ट चार्जिंग90 वॉट वायर्ड + 15 वॉट वायरलेस + 5 वॉट रिव्हर्स
डिस्प्ले6.78 इंच फ्लॅट एमोलेड, 144 हर्ट्झ, 1400 निट्स एचबीएम6.7 इंच कर्व्ड पीओएलईडी, 120 हर्ट्झ, 4500 निट्स पीक
चिपसेटमीडियाटेक डायमेन्सिटी 7300 मॅक्समीडियाटेक डायमेन्सिटी 8350 एक्स्ट्रीम
लॉंच तारीख8 जानेवारी 2026 30 एप्रिल 2025

हे वाचलंत का :

  1. ओप्पो पॅड 5 भारतात लाँच: नवीन टॅबलेटसह रेनो 15 सिरीज बाजारात
  2. ओप्पो रेनो 15 मालिका भारतात लॉंच प्रो मिनी मॉडेलसह तीन व्हेरिएंट्स
  3. Poco M8 5G भारतात लॉंच: कर्व्ड डिस्प्ले आणि पॉवरफुल फीचर्ससह नवीन मिड-रेंज स्मार्टफोन