ETV Bharat / technology

रेंज रोव्हर एसव्ही अल्ट्रा भारतात लाँच; किंमत 3.8 कोटी रुपये, टॉप स्पीड 261 किमी/तास

लॅंड रोव्हरनं भारतात रेंज रोव्हर एसव्ही अल्ट्रा मॉडेल लॉंच केलं. याची एक्स-शोरूम किंमत 3.8 कोटी रुपये आहे. हे रेंज रोव्हर मालिकेतील नवीन फ्लॅगशिप मॉडेल आहे.

Range Rover SV Ultra
रेंज रोव्हर एसव्ही अल्ट्रा (Land Rover)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : August 6, 2026 at 12:24 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : लॅंड रोव्हरनं भारतात रेंज रोव्हर एसव्ही अल्ट्रा मॉडेल (Range Rover SV Ultra ) लॉंच केलं. याची एक्स-शोरूम किंमत 3.8 कोटी रुपये आहे. हे मॉडेल रेंज रोव्हर मालिकेतील नवीन फ्लॅगशिप मॉडेल ठरलं आहे. विद्यमान एसव्ही मॉडेल्सच्या वर स्थान मिळालेल्या या आवृत्तीत खास साहित्य, कॅबिनमधील आकर्षक अनुभव आणि अधिक विशेष डिझाइन वैशिष्ट्ये आहेत.

Range Rover SV Ultra
रेंज रोव्हर एसव्ही अल्ट्रा (Land Rover)

डिझाइन वैशिष्ट्ये : रेंज रोव्हर एसव्ही अल्ट्राच्या (SV Ultra ) बाह्य रुपात टायटन सिल्व्हर रंग पर्याय विशेष आहे. सॅटिन प्लॅटिनम आणि सिल्व्हर क्रोम फिनिशमध्ये ग्रिल सराउंड, व्हील इन्सर्ट्स, स्किड प्लेट्स आणि रेंज रोव्हर बॅजिंग दिलx आहे. एसयूव्हीला 22-इंच अलॉय व्हील्सचा पर्याय देखील मिळाल आहे, ज्यात ‘इन्व्हर्टेड आर’ लोगो असलेले हबकॅप्स आहेत. इच्छुक खरेदीदार 23-इंच व्हील्स पर्याय निवडू शकतात, ज्यामुळं वाहनाचं स्वरूप अधिक प्रभावशाली दिसतं.

Range Rover SV Ultra
रेंज रोव्हर एसव्ही अल्ट्रा (Land Rover)

कॅबिन आणि आतील डिझाइन : आतील भागात ऑर्किड व्हाइट आणि सिंडर ग्रे रंगसंगती वापरली आहे. रॅटन पाम वूड व्हेनिअर आणि ग्लॉस-व्हाइट सिरॅमिक फिनिशमुळं कॅबिनला लाउंजसारखा अनुभव मिळतो. इल्युमिनेटेड एसव्ही अल्ट्रा सिल प्लेट्स प्रवेश करताना विशेष वातावरण निर्माण करतात. सर्वात लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे नवीन इलेक्ट्रोस्टॅटिक साउंड सिस्टम. यात 21 पातळ फिल्म स्पीकर्स हेडरेस्ट, सीटबॅक आणि हेडलाइनरमध्ये एम्बेड केले आहेत. हे रेंज रोव्हरच्या बॉडी अँड सोल सीट आणि सेन्सरी फ्लोअर हॅप्टिक सिस्टमसोबत एकत्र काम करतात. परिणामी ऑडिओ आणि कंपन आधारित अनुभव अधिक इमर्सिव्ह होतो.

Range Rover SV Ultra
रेंज रोव्हर एसव्ही अल्ट्रा (Land Rover)

वैशिष्ट्ये आणि आराम : एसव्ही अल्ट्रामध्ये 13.1 -इंच इन्फोटेनमेंट टचस्क्रीन, 13.7 -इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि मागील प्रवाशांसाठी 13.1-इंच एंटरटेनमेंट स्क्रीन आहेत. हीटेड स्टीयरिंग व्हील, पॉवर्ड रियर सनब्लाइंड्स, फोर-झोन क्लायमेट कंट्रोल, हेड-अप डिस्प्ले, अ‍ॅम्बियंट लाइटिंग, 360-डिग्री कॅमेरा आणि एअर प्युरिफायर यांचा समावेश आहे. सर्व सीट्स इलेक्ट्रिकली अ‍ॅडजस्टेबल असून हीटिंग, व्हेंटिलेशन, मसाज आणि मेमरी फंक्शन्स उपलब्ध आहेत. यामुळं प्रत्येक प्रवाशाला आरामदायी बैठक मिळते.

Range Rover SV Ultra
रेंज रोव्हर एसव्ही अल्ट्रा (Land Rover)

इंजिन आणि कामगिरी : या मॉडेलमध्ये 4.4-लिटर ट्विन-टर्बो पेट्रोल व्ही8 इंजिन आहे, जे 450एचपी पॉवर देते. माइल्ड-हायब्रिड सिस्टम आणि 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससोबत ऑल-व्हील ड्राइव्ह आहे. 0-100 किमी/तास गती 4.9 सेकंदांत गाठते आणि टॉप स्पीड 261 किमी/तास आहे. अ‍ॅडॅप्टिव्ह सस्पेंशन, ऑल-व्हील स्टीयरिंग आणि विविध ड्राइव्ह व टेरेन मोड्स यांमुळे लक्झरीसोबत कामगिरी आणि ऑफ-रोड क्षमताही उत्तम आहे.

Range Rover SV Ultra
रेंज रोव्हर एसव्ही अल्ट्रा (Land Rover)

रेंज रोव्हर एसव्ही अल्ट्रा भारतातील उच्चभ्रू ग्राहकांसाठी एक नवीन बेंचमार्क सेट करते. तीचं विशेष डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान आणि शक्तिशाली कामगिरी यामुळं ते लक्झरी एसयूव्हीमध्ये सर्वात वेगळी ठरते.

हे वाचलंत का :

  1. महिंद्रा स्कॉर्पिओ-एन फेसलिफ्ट भारतात लाँच; सुरुवातीची किंमत 13.69 लाख
  2. किआ सोरेंटो: फ्लॅगशिप एसयूव्ही भारतात 4 सप्टेंबरला होणार लाँच
  3. अधिकृत लाँचपूर्वी 'किया सोरेंटो'ची प्री-बुकिंग सुरू