Poco India नं नवीन स्मार्टफोनच्या लॉन्चचे टीझर जारी केले, हे Poco X8 Pro सिरीजमधील असण्याची शक्यता
Poco India नं नवीन स्मार्टफोनचा टीझर जारी केलाय आहे. हा फोन Poco X8 Pro सिरीजमधील असण्याची शक्यता आहे. तो लवकरच भारतात लॉंच होईल.

Published : February 25, 2026 at 1:02 PM IST
मुंबई : Xiaomi चा सब-ब्रँड Poco भारतात नवीन स्मार्टफोन लॉंच करण्याच्या तयारीत आहे. Poco India च्या अधिकृत X अकाउंटवरून जारी केलेल्या पहिल्या टीझरमुळं याचे संकेत मिळाले आहे. हा फोन Poco X8 Pro सिरीजमधील असल्याचं लीक समोर आलं आहे.
Smart minds will wait for the smarter phone. They don’t rush. So shouldn’t you. #POCO pic.twitter.com/TyzgcOZKIE
— POCO India (@IndiaPOCO) February 25, 2026
Poco India चा टीझर
Poco India नं X वर पोस्ट केलेल्या टीझरमध्ये म्हटलं आहे, “Smart minds will wait for the smarter phone. They don’t rush. So shouldn’t you. #POCO”. सोबतच एक इमेज आहे ज्यात “People with high IQ will wait for what’s coming neXt!” असं लिहिलं आहे. यातील “neXt” मधील “X” चा उच्चार स्पष्टपणे Poco X8 Pro सिरीजचे संकेत (Poco X8 series teaser) देतोय. या टीझरमुळं भारतात हा फोन लवकरच लॉंच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा फोन मार्च 2026 मध्ये लॉंच होणं अपेक्षित आहे.
अपेक्षित मॉडेल्स
Poco X8 Pro (मॉडेल: 2602BPC18I) आणि Poco X8 Pro Max (मॉडेल: 2602BPC18I) दोन्ही भारतीय BIS प्रमाणपत्रावर दिसले आहेत, ज्यामुळं भारतात लॉंच निश्चित झालं आहे. Poco X8 Pro हे Redmi Turbo 5 चं ग्लोबल व्हर्जन असण्याची शक्यता आहे, तर X8 Pro Max हे Redmi Turbo 5 Max चं रीब्रँडेड व्हर्जन असेल. Poco X8 Pro चं ग्लोबल व्हर्जन Geekbench वर दिसलं असून, त्यात MediaTek Dimensity 8500 Ultra SoC, Android 16 OS आणि 12GB RAM पर्यंतचे पर्याय आहेत. X8 Pro Max ची Geekbench यादी अद्याप उपलब्ध नाही, पण Dimensity 9500s SoC अपेक्षित आहे.
Poco X8 Pro ची अपेक्षित वैशिष्ट्ये
Poco X8 Pro मध्ये 6.59 इंच 1.5K TCL M10 OLED डिस्प्ले (120Hz रिफ्रेश रेट, 2000 nits ब्राइटनेस, 3840Hz PWM डिमिंग) असण्याची शक्यता आहे. प्रोसेसर MediaTek Dimensity 8500 Ultra (Mali-G720 MC8 GPU) असेल, LPDDR5x RAM आणि UFS 4.1 स्टोरेजसह. बॅटरी 6,500 ते 7,560 mAh पर्यंतची (100W फास्ट चार्जिंग आणि 27W रिव्हर्स चार्जिंग) अपेक्षित आहे. कॅमेरा 50MP मुख्य (OIS) + 8MP अल्ट्रावाइड, आणि फ्रंट कॅमेरा 20MP असेल. IP68/IP69 रेटिंग, HyperOS 3 (Android 16 आधारित), स्टीरिओ स्पीकर्स, IR ब्लास्टर इत्यादी वैशिष्ट्ये असतील.
Poco X8 Series official teaser has started ✅
🇮🇳 launch ~March starting
Poco X8 Pro :
✅ Dimensity 8500
🔴 6.59"
✅ 7560mah
poco x8 pro max :
✅ dimensity 9500s
🔴 6.83"
✅ 8500mah🔋us fs
✅ ip69,100w⚡metal frame
🔴 1.5k 120hz flat oled
✅ 12gb ram, android 16
✅ 50+8🤳20mp<="" p>— debayan roy (gadgetsdata) (@gadgetsdata) February 25, 2026
Poco X8 Pro Max ची अपेक्षित वैशिष्ट्ये
X8 Pro Max मोठ्या 6.83 इंच 1.5K OLED डिस्प्लेसह येईल. Dimensity 9500s SoC (Immortalis-G925 MC12 GPU), 8,500mAh बॅटरी (100W चार्जिंग), समान डिस्प्ले आणि कॅमेरा सेटअप अपेक्षित आहे. हे मॉडेल भारतात प्रथम दिसलं असून, लवकरच इतर प्रमाणपत्रांवरही दिसेल.
लॉंच आणि उपलब्धता
Poco X8 Pro युरोप, सिंगापूर, इंडोनेशिया यांसह ग्लोबल मार्केटमध्ये लॉंच होईल. भारतात दोन्ही मॉडेल्स येण्याची शक्यता आहे. विशेषतः Iron Man एडिशनची चर्चा आहे. Poco X8 Pro सिरीज गेमिंग, बॅटरी आणि परफॉर्मन्ससाठी आकर्षक असेल.
हे वाचलंत का :

