Poco M8 5G भारतात लॉंच: कर्व्ड डिस्प्ले आणि पॉवरफुल फीचर्ससह नवीन मिड-रेंज स्मार्टफोन
पोकोनं भारतात Poco M8 5G स्मार्टफोन लॉंच केलाय. 6.77 इंच कर्व्ड डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 6 जेन 3 प्रोसेसर, 52MP कॅमेरा आणि 5520mAh बॅटरीआहे.

Published : January 8, 2026 at 1:07 PM IST
मुंबई : चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी पोकोनं गुरुवारी भारतात आपल्या एम-सिरीजमध्ये नवीन भर घातली आहे. Poco M8 5G हा नवीन हँडसेट लॉंच झाला असून, तो आता फ्लिपकार्टवर विक्रीस उपलब्ध होणार आहे. हा फोन तीन आकर्षक रंगांमध्ये येतो: कार्बन ब्लॅक, ग्लेशियल ब्लू आणि फ्रॉस्ट सिल्व्हर. विशेष म्हणजे, पहिल्या 12 तासांत खरेदी करणाऱ्या ग्राहकांना तो कमी किंमतीत मिळेल.
POCO M8 5G | #DesignedToSlay ⚔️ ft. EPR & Gopika
— POCO India (@IndiaPOCO) January 8, 2026
7.35mm slim. 178g light.
Curved AMOLED. Snapdragon 6 Gen 3.
IP66 + MIL-STD-810H tough.
🚀 Sale: 13 Jan | 12 PM
💰 ₹15,999 (12-hr launch price)*#POCOM85G #DesignedToSlay pic.twitter.com/svR6uyBvzy
6.77 इंचाचा 3डी कर्व्ड एमोलेड डिस्प्ले
Poco M8 5G मध्ये 6.77 इंचाचा 3डी कर्व्ड एमोलेड डिस्प्ले आहे, जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 3,200 निट्स पीक ब्राइटनेस देतो. हा डिस्प्ले वेट टच 2.0 सपोर्टसह येतो, ज्यामुळं ओल्या हातानंही फोन सहज चालवता येतो. परफॉर्मन्ससाठी क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 6 जेन 3 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे, जो 4 एनएम प्रोसेसवर आधारित आहे आणि 8 जीबीपर्यंत रॅमसह जोडलेला आहे.
Poco M8 5G किंमत आणि उपलब्धता
Poco M8 5G ची भारतातील किंमत बेस व्हेरिएंटसाठी (6जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज) 21,999 रुपयांपासून सुरू होते. 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 22,999 रुपये आहे, तर टॉप व्हेरिएंट (8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज) 24,999 रुपयांना मिळेल. मात्र, लॉंचच्या पहिल्या 12 तासांत खरेदी केल्यास इंट्रोडक्टरी ऑफरमध्ये तो फक्त 15,999 रुपयांना उपलब्ध होईल. हा फोन 13 जानेवारीपासून फ्लिपकार्टवर विक्रीस येईल. पोकोनं आयसीआयसीआय बँक कार्डवर अतिरिक्त डिस्काउंटही जाहीर केले आहे.
Poco M8 5G वैशिष्ट्ये आणि स्पेसिफिकेशन्स
Poco M8 5G अँड्रॉइड 15 वर आधारित हायपरओएस 2.0 वर चालतो. कंपनीनं यासाठी 4 वर्षांचे ओएस अपग्रेड्स आणि 6 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देण्याचं वचन दिलं आहे, जे एम-सिरीजसाठी सर्वाधिक आहे.
50 मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सर
डिस्प्लेमध्ये 1080x2392 पिक्सेल रिझोल्यूशन, 240 हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट आणि 100% डीसीआय-पी3 कलर गॅमट आहे. फोनला आयपी65+ आयपी66 रेटिंग मिळालं आहे, ज्यामुळं तो धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहे. कॅमेर्याबाबत, ड्युअल रिअर सेटअपमध्ये 50 मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सेल सेकंडरी सेन्सर आहे. फ्रंटला 20 मेगापिक्सेल कॅमेरा आहे, जो 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट करतो. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरही उपलब्ध आहे.
Poco M8 5G बॅटरी
बॅटरी 5,520 एमएएचची आहे, जी 45 वॅट फास्ट चार्जिंग आणि 18 वॅट रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट करते. फोनचे परिमाण 164x75.42x7.35 मिमी असून वजन फक्त 178 ग्रॅम आहे, ज्यामुळं तो अतिशय स्लिम आणि हलका वाटतो.
Poco M8 5G कनेक्टिव्हिटी
कनेक्टिव्हिटीमध्ये 5G, 4जी एलटीई, ब्ल्यूटूथ 5.1, वाय-फाय 5 आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. अनटूटू बेंचमार्कवर हा फोन 8,25,000 पेक्षा जास्त स्कोअर करतो, ज्यामुळं गेमिंग आणि मल्टिटास्किंगमध्ये उत्तम परफॉर्मन्स मिळेल. Poco M8 5G त्याच्या प्रीमियम डिझाइन, लाँग सॉफ्टवेअर सपोर्ट आणि आकर्षक किंमतीमुळं मिड-रेंज सेगमेंटमध्ये स्पर्धा वाढवेल. जेटमध्ये पॉवरफुल 5G फोन शोधणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
हे वाचलंत का :

