पोको एफ8 मालिका लवकरच होणार लाँच : अँड्रॉइड 16 सह हाय-एंड फीचर्स
पोको एफ8 सीरिज 26 नोव्हेंबरला लाँच होणार आहे. या मालिकेत अँड्रॉइड 16, स्नॅपड्रॅगन 8 एलिट, 100वॅट चार्जिंगसह प्रो आणि अल्ट्रा व्हेरिएंट असतील.

Published : November 17, 2025 at 1:06 PM IST
मुंबई : शाओमीच्या सब-ब्रँड पोको आपली नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन मालिका ‘पोको एफ8 सीरिज’ लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. 26 नोव्हेंबर रोजी इंडोनेशियातील बाली येथे होणाऱ्या जागतिक लाँच इव्हेंटमध्ये पोको एफ8 प्रो आणि पोको एफ8 अल्ट्रा हे दोन हाय-एंड मॉडेल्स लॉंच होण्याची शक्यता आहे. या मालिकेतील दोन्ही फोन थेट अँड्रॉइड 16 वर आधारित हायपरओएस 3 सह येतील, जी आतापर्यंतची सर्वात नवीन ऑपरेटिंग सिस्टम असेल. पोकोनं आपल्या चाहत्यांना उच्च दर्जाचा परफॉर्मन्स, उत्कृष्ट कॅमेरा आणि दमदार बॅटरी देणार आहे.
From power to perfection — it’s time to ascend. ⚡
— POCO (@POCOGlobal) November 17, 2025
The next era of ULTRA performance is rising.
Join us as POCO F8 Series takes the throne. 👑
📍 November 26, 2025 | 16:00 GMT+8 | Bali
UltraPower Ascended. pic.twitter.com/Sljz9DR3F2
डिस्प्ले आणि डिझाइन
लीकनुसार, पोको एफ8 प्रो मध्ये 6.59 इंच तर एफ8 अल्ट्रामध्ये 6.9 इंच मोठा ओएलईडी डिस्प्ले मिळेल. दोन्ही पॅनेल 1.5K रिझोल्यूशन आणि 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह येतील. डिस्प्ले दोन्ही बाजूंनी वक्र (curved) असण्याची शक्यता आहे.
प्रोसेसर आणि परफॉर्मन्स
दोन्ही फोन क्वालकॉमच्या नवीन जनरेशन फ्लॅगशिप चिपसेटवर चालतील. पोको एफ8 प्रोमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट तर अल्ट्रा व्हेरिएंटमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट जनरेशन 5 वापरलं जाण्याची शक्यता आहे. हे चिपसेट सध्या बाजारातील सर्वात ताकदवान प्रोसेसर मानले जातात.
All-round excellence. No compromise. 💪
— POCO (@POCOGlobal) November 17, 2025
POCO F8 Pro defines what it means to be a true flagship — balanced, bold, and brilliant.
UltraPower Ascended. pic.twitter.com/6jOuuQN8Tz
कॅमेरा सेटअप
पोको एफ८ प्रो
- 50 मेगापिक्सेल मुख्य सेन्सर (OIS सह)
- 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड
- 50 मेगापिक्सेल 2एक्स टेलिफोटो
- समोर 20 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा
पोको एफ8 अल्ट्रा
- तिहेरी 50 मेगापिक्सेल रियर कॅमेरा (मेन + अल्ट्रा-वाइड + पेरिस्कोप टेलिफोटो)
- अतिरिक्त रियर स्पीकरसह प्रीमियम ऑडिओ अनुभव
बॅटरी आणि चार्जिंग
दोन्ही फोनमध्ये 100 वॅट वेगवान चार्जिंग सपोर्ट मिळेल. मोठ्या बॅटरी क्षमतेमुळं दिवसभराची हमखास साथ मिळेल. 5जी, वाय-फाय 7, ब्लूटूथ 5.4, जीपीएस यासारखी कनेक्टिव्हिटी फीचर्सही उपलब्ध असतील. हा लाँच इव्हेंट पोकोच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर थेट प्रसारित होणार आहे. भारतात या फोनची किंमत आणि उपलब्धता लाँचनंतर लगेच जाहीर होईल, पण अपेक्षा आहे की पोको एफ8 प्रोची किंमत सुमारे 55,000 रुपये तर अल्ट्रा मॉडेलची 70,000 रुपयांपेक्षा जास्त असू शकते. पोको आपल्या आक्रमक किंमती आणि दमदार स्पेसिफिकेशन्समुळं नेहमीच तरुणांचा आवडता ब्रँड राहिला आहे. अँड्रॉइड 16 सह येणारी ही पहिलीच मालिका असल्यानं चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
हे वाचलंत का :

