पेर्प्लेक्सिटीचा नवं हायब्रिड फीचर: क्लाउड आणि लोकल एआयचा स्मार्ट मिलाफ, संवेदनशील डेटा सुरक्षित
पेर्प्लेक्सिटीनं अॅपल सिलिकॉन मॅकसाठी हायब्रिड कंप्युट फीचर आणलं आहे. क्लाउड आणि लोकल एआय एकत्र काम करून संवेदनशील डेटा पूर्णपणे सुरक्षित ठेवतं.

Published : September 3, 2026 at 11:05 AM IST
मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता प्लॅटफॉर्म पेर्प्लेक्सिटीनं गेल्या काही महिन्यांत अनेक नवीन फीचर्स आणल्यानंतर आता सर्वात महत्त्वाचं फीचर जाहीर केलं आहे. मंगळवारी ब्लॉग पोस्टमध्ये कंपनीनं ‘हायब्रिड कंप्युट’ वैशिष्ट्याची घोषणा केली. हे फीचर अॅपल सिलिकॉन आधारित मॅक संगणकांवर पेर्प्लेक्सिटी अॅपमध्ये उपलब्ध आहे. यामुळं व्यावसायिक वापरकर्ते संवेदनशील डेटा क्लाउडमध्ये न पाठवता एआय वापरू शकतात.
We're introducing hybrid compute for all users of the Perplexity Mac app.
— Aravind Srinivas (@AravSrinivas) September 1, 2026
This will allow Computer to orchestrate local models that can run locally on Mac, particularly for agent steps involving sensitive and private files (eg your bloodwork, tax returns, litigation, etc). pic.twitter.com/iypYpwcK3N
क्लाउड आणि लोकल मॉडेलमध्ये कामाची विभागणी : हायब्रिड कंप्युट प्रत्येक काम क्लाउड मॉडेल आणि मॅकवरील लोकल एआय मॉडेलमध्ये विभागतं. प्रगत रीझनिंग, वेब सर्च आणि प्लॅनिंगची कामं क्लाउड हाताळतो, तर खाजगी फाइल्स, संवेदनशील माहिती आणि ऑन-डिव्हाइस अॅक्शन्स लोकल मॉडेल सांभाळतो. पेर्प्लेक्सिटी कंप्युटर हे सर्व प्रक्रिया पार्श्वभूमीत समन्वयित करतो, त्यामुळं वापरकर्त्याला वेगवेगळ्या टूल्समध्ये स्वतः स्विच करण्याची गरज भासत नाही.
संवेदनशील माहिती नियंत्रित : मॅकवर असलेला प्रायव्हसी गेट ठरवतो की कोणती माहिती डिव्हाइसबाहेर जाऊ शकते. हा गेट संवेदनशील तपशील मास्क करू शकतो, पूर्णपणे लोकल ठेवू शकतो, कृती नाकारू शकतो किंवा संरक्षित फाइलमधील माहिती क्लाउडला जाण्यापूर्वी वापरकर्त्याची संमती मागू शकतो. ऑन-डिव्हाइस पेर्प्लेक्सिटी क्लासिफायर संवेदनशील तपशील ओळखतो. पासवर्ड, पेमेंट कार्ड तपशील आणि सरकारी ओळखपत्रांसारख्या अत्यंत गोपनीय डेटाला सर्वाधिक संरक्षण दिलं जातं.
अॅपलच्या नवीन मॅक मिनी आणि मॅक स्टुडिओसाठी आदर्श : पेर्प्लेक्सिटीच्या मते अॅपलनं अलीकडे लाँच केलेलं मॅक मिनी आणि मॅक स्टुडिओ हायब्रिड कंप्युट चालवण्यासाठी आदर्श आहेत. हे फीचर पेर्प्लेक्सिटी प्रो, मॅक्स आणि एंटरप्राइज सब्सक्रायबर्ससाठी उपलब्ध आहे. ते जेमा 4 ई4बी, क्वेन 3.6 35बी-ए3बी आणि पेर्प्लेक्सिटीचं स्वतःचं मॉडेल सपोर्ट करतं. अॅपल सिलिकॉन मॅक्सवर macOS 15किंवा त्यापुढील आवृत्ती आणि किमान 24 जीबी युनिफाइड मेमरी आवश्यक आहे.
वापरकर्त्यांनी कसं सुरू करावं : नवीनतम पेर्प्लेक्सिटी मॅक अॅप डाउनलोड करून उघडा. सपोर्टेड लोकल एआय मॉडेल एका क्लिकनं डाउनलोड करा. मॉडेल सिलेक्टर उघडा, हायब्रिड निवडा आणि कामासाठी लोकल, क्लाउड मॉडेल निवडा. यामुळं गोपनीयता आणि कार्यक्षमता दोन्ही मिळतात. हायब्रिड कंप्युट एआय वापरात गोपनीयता आणि सामर्थ्य यांचा समतोल साधण्याचे महत्त्वाचं पाऊल आहे. व्यावसायिक आणि एंटरप्राइज वापरकर्त्यांसाठी हे विशेष उपयुक्त ठरेल.
हे वाचलंत का :

