ओप्पो रेनो 15 मालिका भारतात लॉंच प्रो मिनी मॉडेलसह तीन व्हेरिएंट्स
ओप्पो रेनो 15 मालिका भारतात लॉंच झाली असून यात रेनो 15 प्रो, रेनो 15 प्रो मिनी, स्टँडर्ड रेनो 15, अशा तीन मॉडेलचा समावेश आहे.

Published : January 8, 2026 at 1:41 PM IST
मुंबई : ओप्पोनं भारतात आपली नवीन रेनो 15 मालिका अधिकृतपणे लॉंच केली आहे. या मालिकेत रेनो 15 प्रो, रेनो 15 प्रो मिनी (Reno 15 Pro Mini) आणि स्टँडर्ड रेनो 15 (Standard Reno 15) अशी तीन मॉडेल्स समाविष्ट आहेत. रेनो लाइनअपमध्ये पहिल्यांदाच ‘प्रो मिनी’ मॉडेल दाखल झालं आहे. भारतीय ग्राहकांमध्ये एका हातानं वापरता येणाऱ्या, कॉम्पॅक्ट आणि प्रीमियम स्मार्टफोनची मागणी वाढत असताना ओप्पोनं ही गरज लक्ष्यात घेऊन हा फोन बाजाराता उतरवला आहे.

डिस्प्ले आणि डिझाइन
रेनो 15 प्रोमध्ये चारही बाजूंना फक्त 1.15 मिमी इतका पातळ बेझेल्स आहे. यामुळं 6.78 इंचाच्या अमोलेड डिस्प्लेवर 95.5 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशो मिळतो. हे डिस्प्ले कॉर्निंग गोरिला ग्लास विक्टस 2 नं संरक्षित आहे. स्टँडर्ड रेनो 15 मध्ये 6.59 इंचाचा अमोलेड डिस्प्ले असून 93.4 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशो आहे; याचं संरक्षण गोरिला ग्लास 7i करतं.
रेनो 15 प्रो मिनी
रेनो 15 प्रो मिनी हे सर्वांत खास मॉडेल आहे. 6.32 इंचाच्या अमोलेड डिस्प्लेवर 1.6 मिमी बेझेल्स आणि 93.35 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशो मिळतो. वजन फक्त 187 ग्रॅम आणि जाडी 7.99 मिमी असल्यानं हे फोन एका हातानं सहज वापरता येतो. प्रो आणि प्रो मिनी मॉडेल्समध्ये पीक ब्राइटनेस 3,600 निट्सपर्यंत जातं, तर स्टँडर्ड मॉडेलमध्ये 1,200 निट्स आहे. तिन्ही मॉडेल्समध्ये 120 हर्ट्झ अॅडॅप्टिव्ह रिफ्रेश रेट आहे.
कॅमेरा
रेनो 15 प्रो (Reno 15 Pro) आणि प्रो मिनीमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे – 200 मेगापिक्सेल मुख्य सेन्सर (रेनो मालिकेतील सर्वांत मोठा), 50 मेगापिक्सेल 3.5एक्स ऑप्टिकल झूम टेलिफोटो आणि 50 मेगापिक्सेल अल्ट्रावाइड. तिन्ही कॅमेऱ्यांमधून 4K एचडीआर व्हिडिओ 60 एफपीएसवर रेकॉर्ड करता येतो.
स्टँडर्ड रेनो 15
स्टँडर्ड रेनो 15 मध्ये 50 मेगापिक्सेल मुख्य, 50 मेगापिक्सेल 3.5एक्स टेलिफोटो आणि 8 मेगापिक्सेल अल्ट्रावाइड आहे. सेल्फी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा असून 100 अंश फील्ड ऑफ व्ह्यू देतो. ओप्पोची प्युअरटोन टेक्नॉलॉजी नॅचरल आणि बॅलन्स्ड रंग देते.
परफॉर्मन्स आणि बॅटरी
रेनो 15 प्रो आणि प्रो मिनीमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 8450 चिपसेट आहे, तर स्टँडर्ड मॉडेलमध्ये स्नॅपड्रॅगन 7 जेन 4 आहे. प्रो मिनीच्या कॉम्पॅक्ट बॉडीतही 6,200 एमएएच बॅटरी आणि 80 वॅट फास्ट चार्जिंग आहे.
बिल्ड क्वालिटी आणि फीचर्स
तिन्ही फोनमध्ये एरोस्पेस-ग्रेड अॅल्युमिनियम फ्रेम, ग्लेशियर ग्लो ग्लास बॅक पॅनेल आणि होलोफ्यूजन डिझाइन आहे. आयपी66, आयपी68 आणि आयपी69 रेटिंगमुळं धूळ आणि पाण्यापासून पूर्ण संरक्षण मिळतं. एआय माइंड स्पेस फीचर स्क्रीनशॉट्स आणि फोटो स्मार्ट कलेक्शन्समध्ये ऑटोमॅटिकली ऑर्गनाइझ करतं.
रंग पर्याय
रेनो 15 प्रो : सनसेट गोल्ड, कोको ब्राउन
प्रो मिनी : कोको ब्राउन, ग्लेशियर व्हाइट (थ्री-डायमेंशनल रिबन पॅटर्नसह); स्टँडर्ड – ग्लेशियर व्हाइट, ट्वायलाइट ब्ल्यू, ऑरोरा ब्ल्यू.
किंमत
| Model | Configuration | Price |
|---|---|---|
| OPPO Reno15c 5G | 8GB + 256GB | Rs 34,999 |
| 12GB + 256GB | Rs 37,999 | |
| OPPO Reno15 5G | 8GB + 256GB | Rs 45,999 |
| 12GB + 256GB | Rs 48,999 | |
| 12GB + 512GB | Rs 53,999 | |
| OPPO Reno15 Pro Mini 5G | 12GB + 256GB | Rs 59,999 |
| 12GB + 512GB | Rs 64,999 | |
| OPPO Reno15 Pro 5G | 12GB + 256GB | Rs 67,999 |
| 12GB + 512GB | Rs 72,999 |
हे वाचलंत का :

