सर्वात प्रीमियम स्मार्टफोन ओपो रेनो 15 प्रो मॅक्स लॉंच, 200MP कॅमेरा, 6500mAh ची मोठी बॅटरी क्षमता
ओपो रेनो 15 सीरिजमधील सर्वात प्रीमियम मॉडेल Oppo Reno 15 Pro Max लॉंच झालंय. 200MP कॅमेरा, 6500mAh बॅटरी आणि डायमेंसिटी 8450 प्रोसेसरसह योतोय.

Published : January 2, 2026 at 11:23 AM IST
मुंबई : ओपो कंपनीनं आपल्या रेनो 15 सीरिजमध्ये एक नवीन आणि सर्वात शक्तिशाली मॉडेल लॉंच केलंय. ओपो रेनो 15 प्रो मॅक्स फोन (Oppo Reno 15 Pro Max) आधीच आंतरराष्ट्रीय बाजारात उपलब्ध असलेल्या रेनो 15 आणि रेनो 15 प्रो नंतर लॉंच झाला आहे. सर्वप्रथम तैवानमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झालेला हा फोन 200 मेगापिक्सेल कॅमेरा, 6500 एमएएच बॅटरी आणि मीडियाटेक डायमेंसिटी 8450 प्रोसेसरसह येतो. भारतात या सीरिजच्या लॉंचची आतुरतेनं वाट पाहत असलेल्या चाहत्यांसाठी हा फोन एक आकर्षक पर्याय ठरू शकतो, मात्र भारतातील लॉंचबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाहीय.

शक्तिशाली परफॉर्मन्स
ओपो रेनो 15 प्रो मॅक्समध्ये (Reno 15 Pro Max) मीडियाटेक डायमेंसिटी 8450 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे, जो 4 नॅनोमीटर तंत्रज्ञानावर आधारित आहे. हा प्रोसेसर 3.3 गीगाहर्ट्झ पर्यंत क्लॉक स्पीड देतो आणि गेमिंग, मल्टिटास्किंगसाठी उत्तम कार्यक्षमता प्रदान करतो. सीरिजमधील इतर मॉडेल्सप्रमाणेच हा चिपसेट एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि यूएफएस 3.1 स्टोरेजसह जोडलेला आहे. फोनमध्ये 12 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेजचा पर्याय आहे.

अप्रतिम कॅमेरा सेटअप
कॅमेरा या फोनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यात रियरला 200 मेगापिक्सेल मुख्य सेन्सर (एफ/1.8 अपर्चर, ओआयएस सपोर्ट), 50 मेगापिक्सेल पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स (3.5एक्स ऑप्टिकल झूम, ओआयएस), 50 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स (116° फिल्ड ऑफ व्ह्यू, एफ/2.0 अपर्चर) मिळतेय. 50MP


सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे, जो 100° फिल्ड ऑफ व्ह्यू आणि एफ/2.0 अपर्चरसह येतो. हा सेटअप प्रोफेशनल फोटोग्राफी आणि झूम शूटिंगसाठी आदर्श आहे.
डिस्प्ले आणि डिझाइन
फोनमध्ये 6.78 इंचाची फुल एचडी+ ओएलईडी डिस्प्ले आहे, ज्याची रिझोल्यूशन 2772 × 1272 पिक्सेल्स आहे. 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट, 1800 निट्स पीक ब्राइटनेस आणि 450 पीपीआय डेन्सिटीमुळं स्क्रीन अतिशय स्पष्ट आणि स्मूथ दिसते. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि कॉर्निंग गोरिला ग्लास विक्टस 2 प्रोटेक्शनसह येतो. फोन आयपी69 रेटिंगसह वॉटर आणि डस्ट रेसिस्टंट आहे.

दमदार बॅटरी आणि चार्जिंग
6500 एमएएचची मोठी बॅटरी आहे, जी 80 वॅट वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50 वॅट वायरलेस चार्जिंग सपोर्ट करते. रोजच्या वापरात दीर्घकाळ टिकणारी बॅटरी आणि जलद चार्जिंग हा या फोनचा मोठा प्लस पॉइंट आहे.
सॉफ्टवेअर आणि कनेक्टिव्हिटी
हा फोन अँड्रॉइड 16 वर आधारित कलरओएस 16 सह येतो. ब्ल्यूटूथ 5.4, वाय-फाय 6, एनएफसी आणि एक्स1 चिपसह उत्तम कनेक्टिव्हिटी आहे.

किंमत आणि उपलब्धता
तैवानमध्ये 12 जीबी + 512 जीबी व्हेरिएंटची किंमत टीडब्ल्यूडी 24,990(अंदाजे 71,000 रुपये) आहे. ट्वायलाइट गोल्ड आणि डेजर्ट ब्राउन कलरमध्ये हा फोन उपलब्ध आहे. भारतातील लॉंचबाबत अद्याप अधिकृत कोणतीही माहिती नाहीय.
हे वाचलंत का :
- 'या' आठवड्यात नविन स्मार्टफोनचा धमाका, रेडमी, रियलमी, पोको, मोटोरोला आणि ओप्पोची धमाल
- Moto X70 Air Pro : स्लिम फ्लॅगशिपचा प्रो व्हर्जन लवकरच होणार लाँच
- Realme 16 Pro series : ची किंमत आणि वैशिष्ट्ये लीक
Conclusion:

