OnePlus 15R च्या किमतीत वाढ; कधीपासून लागू होणार नवीन किंमत
OnePlus चा लोकप्रिय फोन, OnePlus 15R च्या किमतीबाबत मोठी बातमी आली आहे. या फोनची किंमत लवकरच वाढणार आहे.

Published : February 25, 2026 at 1:25 PM IST
मुंबई: OnePlus 15R डिसेंबर 2025 मध्ये भारतात लाँच करण्यात आला होता.हा फोन कंपनीचा नवीनतम परफॉर्मन्स-केंद्रित स्मार्टफोन म्हणून सादर करण्यात आला होता. OnePlus च्या फ्लॅगशिप लाइनअप अंतर्गत, OnePlus 15R भारतात 50,000 पेक्षा कमी किंमत श्रेणीत लाँच करण्यात आला. मात्र, कंपनी आता या फोनची किंमत वाढण्याचा विचार करत आहे. कारण त्यांचा स्पर्धक, iQOO नं काल त्यांचा नवीन फोन, iQOO 15R लाँच केला. iQOO 15R ची किंमत OnePlus 15R च्या जवळपास आहे. टिपस्टर अभिषेक यादव यांच्यानुसार, पुढील महिन्याच्या सुरुवातीला OnePlus 15R ची किंमत वाढणार आहे.
🚨 EXCLUSIVE: OnePlus 15R New MOP Pricing Confirmed (From March 1, 2026)
— Abhishek Yadav (@yabhishekhd) February 24, 2026
• 12GB + 256GB — ₹51,999
• 12GB + 512GB — ₹56,999
Price revision going live from March 1 across channels. https://t.co/QSNQX5ZLPQ
OnePlus 15R च्या किमतीत वाढ
सूत्रांचा हवाला देत, टिपस्टर अभिषेक यादव यांनी X वरील एका पोस्टमध्ये दावा केला आहे की OnePlus 15R ची किंमत लवकरच वाढणार आहे. त्यांनी किंमतीची सविस्तर माहिती देखील दिली आहे. 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 51,999 रुपयांनी वाढणार असल्याचा त्यांचा दावा आहे. दरम्यान, ग्राहकांना 12 जीबी + 512 जीबी रॅम आणि स्टोरेज असलेल्या हँडसेटसाठी 56,999 रुपये मोजावे लागणार आहेत. दुसऱ्या टिपस्टरनंही असाच दावा केला आहे, परंतु त्यांच्या दाव्यांनुसार, OnePlus 15R ची किंमत सुमारे 3,000 ते 4,000 रुपयांपर्यंत वाढू शकते. नवीन दाव्यांनुसार, OnePlus 15R बाबतची परिस्थिती सर्व बाजारपेठांमध्ये स्पष्ट होईल आणि वाढलेल्या किमती आजपासून लागू होतील. मात्र, OnePlus कडून याबाबत अद्यापही कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीय. ही माहिती लीकवर आधारीत आहे.
OnePlus 15R फोनची किंमत
OnePlus 15R भारतात 47,999 च्या सुरुवातीच्या किमतीत 12GB + 256GB व्हेरिएंटसाठी लाँच करण्यात आला होता. 12GB + 512GB कॉन्फिगरेशनची किंमत 52,999 होती. ऑफरचा भाग म्हणून, ग्राहकांना अॅक्सिस आणि HDFC बँक कार्डवर सूट मिळत होती, ज्यामुळे या मध्यम-फ्लॅगशिप फोनची प्रभावी किंमत अनुक्रमे 44,999 आणि 47,999 पर्यंत कमी होती.
हे वाचलंत का :

