ETV Bharat / technology

नथिंग फोनची किंमत पुन्हा वाढली! फोन (4a), (4a) Pro आणि (4b) च्या नव्या किंमती तपासा!

नथिंग फोन (4a), (4a) Pro आणि (4b) च्या किंमती भारतात पुन्हा वाढल्या. 2 सप्टेंबर 2026 पासून नव्या किंमती लागू झाल्या आहेत.

Nothing Phone 4a Pro
Nothing Phone 4a Pro (Nothing)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : September 2, 2026 at 12:16 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : स्मार्टफोन बाजारात किंमत वाढण्याची स्पर्धा सध्या जोरात सुरू आहे. याच ट्रेंडनुसार नथिंग कंपनीनं भारतात आपल्या तीन लोकप्रिय स्मार्टफोन मॉडेल्सच्या किंमती पुन्हा वाढवल्या आहेत. नथिंग फोन (4a) (Nothing Phone 4a) , नथिंग फोन (4a) Pro (Nothing Phone 4a Pro) आणि नथिंग फोन (4b) (Nothing Phone 4b) या मॉडेल्सच्या नवीन किंमती 2 सप्टेंबर 2026 पासून लागू झाल्या आहेत. या वाढीमुळं खरेदीदारांना थोडा फटका बसणार आहे, पण कंपनीनं अद्याप अधिकृत कारण सांगितलेलं नाही.

फोन (4a) च्या तीन व्हेरिएंट्सची किंमत कशा बदलल्या? : नथिंग फोन (4a) च्या तीन वेगवेगळ्या स्टोरेज आणि रॅम कॉन्फिगरेशनमध्ये वेगवेगळी वाढ झाली आहे. 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज असलेला बेस व्हेरिएंट आता 44,999 ला मिळेल. पूर्वी हा 42,999 होता, त्यामुळं यात 2,000 ची वाढ झाली आहे. 8 जीबी + 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 46,999 वरून 49,999 झाली आहे, म्हणजे 3,000 ची मोठी वाढ. तर टॉप-एंड 12 जीबी + 256 जीबी व्हेरिएंटमध्ये फक्त 1,000 ची वाढ होऊन आता तो 50,999 ला उपलब्ध आहे. यामुळं बेस मॉडेलच आता 45,000 च्या जवळ पोहोचले आहे आणि मध्यम व्हेरिएंट 50,000 च्या जवळपास मिळेल.

Nothing Phone 4a
Nothing Phone 4a (Nothing)

फोन (4a) Pro : नथिंग फोन (4a) Pro मध्ये आणखी मोठी किंमतवाढ केलीय. याचं 8 जीबी + 128 जीबी व्हेरिएंट पूर्वी 49,999 होता, आता ते 54,99 झालं आहे. ही 5,000 ची वाढ खूपच लक्षणीय आहे. दुसऱ्या व्हेरिएंटमध्ये, म्हणजे 8 जीबी + 256 जीबी मध्ये 3,000 ची वाढ होऊन किंमत 57,999 झाली आहे. या बदलांमुळं दोन्ही कॉन्फिगरेशन्स प्रीमियम किंमत श्रेणीत आणखी मजबूत झाल्या आहेत आणि बेस मॉडेलही आता पन्नास हजारांच्या वर गेलं आहे.

फोन (4b) च्या सुरवातीच्या किंमतीत मोठा फटका : नथिंग फोन (4b) च्या 8 जीबी + 128 जीबी व्हेरिएंटची किंमत पूर्वी 34,999 होती, ती आता 39,999 झाली आहे. ही 5,000 ची वाढ या मॉडेलला 40,000 च्या जवळ नेऊन ठेवते. सब-40 हजार रुपयांच्या सेगमेंटमध्ये विचार करणाऱ्या खरेदीदारांसाठी ही किंमतवाढ खास लक्षवेधी ठरते.

नवीन किंमती आजपासून लागू, कारण काय? : ही सर्व सुधारित किंमती (MOP) 2 सप्टेंबर 2026 पासून लागू झाल्या आहेत. सर्वाधिक वाढ 5,000 इतकी आहे, जी फोन (4a) Pro च्या बेस व्हेरिएंट आणि फोन (4b) मध्ये दिसते. कंपनीनं अधिकृतपणे काही कारण दिलेलं नसलं तरी, संपूर्ण स्मार्टफोन उद्योगात मेमरी चिपच्या किंमतीत होणाऱ्या वाढीमुळं अशा प्रकारच्या किंमत सुधारणा वारंवार होत आहेत. या ट्रेंडमुळं सर्व श्रेणीतील फोन महाग होत आहेत. खरेदीदारांनी आता नवीन किंमती लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. नथिंगचं फोन डिझाइन आणि फिचर्ससाठी ओळखलं जातात, पण किंमतीत वाढ झाल्यानं स्पर्धा आणखी कठीण झाली आहे.

नथिंग फोनची किंमतवाढ : व्हेरिएंटनुसार जुन्या आणि नविन किंमती...

मॉडेलव्हेरिएंटजुनी किंमतनवीन किंमतवाढ
Nothing Phone (4a)8GB + 128GB₹42,999₹44,999₹2,000
8GB + 256GB₹46,999₹49,999₹3,000
12GB + 256GB₹49,999₹50,999₹1,000
Nothing Phone (4a) Pro8GB + 128GB₹49,999₹54,999₹5,000
8GB + 256GB₹54,999₹57,999₹3,000
Nothing Phone (4b)8GB + 128GB₹34,999₹39,999₹5,000

2 सप्टेंबर किंमतवाढ लागू : सर्व नवीन किंमती 2 सप्टेंबर 20026 पासून लागू आहेत.

हे वाचलंत का :

  1. ॲपलचे नवीन सीईओ जॉन टर्नस यांची 'X' वर दमदार एन्ट्री! सुरुवात एका साध्या 'हॅलो'नं
  2. फिलिप्सचा पहिला स्मार्टफोन भारतात उद्या होणार लाँच; किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता
  3. विवो टी5एक्स आणि आयक्यूओओ झेड11एक्सची किंमत 4,000 रुपयांपर्यंत वाढली