ETV Bharat / technology

Nothing Phone 4b आणि आरसीबी एडिशन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत...

नथिंग कंपनीनं भारतात पहिला 'बी' सीरीज Nothing Phone 4b लाँच केला. आरसीबी एडिशनसह तो उपलब्ध झालाय.

Nothing Phone 4b
Nothing Phone 4b (Flipkart/Nothing)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : July 7, 2026 at 3:08 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : नथिंग कंपनीनं आपल्या पहिल्या 'बी' सीरीज स्मार्टफोन नथिंग फोन (४बी) ची (Nothing Phone 4b ) भारतात औपचारिक घोषणा केली आहे. कंपनीनं स्टँडर्ड मॉडेलसोबतच Nothing Phone 4b आरसीबी एडिशन देखील सादर केला असून, तो बेंगळुरू येथील नथिंगच्या फ्लॅगशिप स्टोअरमध्ये लिमिटेड ड्रॉप इव्हेंटद्वारे उपलब्ध झाला आहे. दरम्यान, स्टँडर्ड Nothing Phone 4b पुढील आठवड्यात तीन रंगांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

Nothing Phone 4b
Nothing Phone 4b (Flipkart)

Nothing Phone 4b किंमत आणि उपलब्धता : भारतात Nothing Phone 4b ची किंमत 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरियंटसाठी 34,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. तर 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज असलेल्या टॉप व्हेरियंटची किंमत 38,999 रुपये आहे. कंपनी बँक डिस्काउंट (7.5टक्के) आणि एक्सचेंज बोनसची ऑफर देखील देत आहे. फोन 14 जुलै रोजी फ्लिपकार्ट आणि क्रोमा, रिलायन्स डिजिटल, विजय सेल्ससारख्या ऑफलाइन स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. ब्लॅक, ब्लू आणि व्हाइट या तीन आकर्षक कलर ऑप्शन्समध्ये हा फोन उपलब्ध असेल. आरसीबी एडिशन मात्र केवळ बेंगळुरू स्टोअरमध्येच मर्यादित प्रमाणात मिळणार आहे.

Nothing Phone 4b
Nothing Phone 4b (Flipkart)

Nothing Phone 4b वैशिष्ट्ये आणि स्पेसिफिकेशन्स : Nothing Phone 4b हे ड्युअल सिम सपोर्ट असलेला हँडसेट आहे. तो Android 16 आधारित Nothing OS 4.1वर चालतो. कंपनी तीन वर्षांच्या OS अपग्रेड्स आणि सहा वर्षांच्या सिक्युरिटी अपडेट्सचे आश्वासन देत आहे. फोनमध्ये 6.77 इंच Full-HD+ Samsung Super AMOLED डिस्प्ले आहे. यात 120Hz रिफ्रेश रेट, 1000Hz इन्स्टंट सॅम्पलिंग रेट, 480Hz PWM डिमिंग, 2000निट्स पीक ब्राइटनेस आणि AGC DT-Star 2 प्रोटेक्शन आहे. डिव्हाइसला IP64 डस्ट आणि स्प्लॅश रेझिस्टन्स रेटिंग मिळाली आहे.परफॉर्मन्ससाठी 4nm प्रोसेसवर आधारित Qualcomm Snapdragon 6 Gen4 चिपसेट वापरण्यात आला आहे. यासोबत Adreno 810 GPU, Qualcomm Hexagon NPU आणि AI इंजिन आहे. 8 जीबी LPDDR4x RAM आणि 256 जीबीपर्यंत UFS 2.2 स्टोरेज उपलब्ध आहे. थर्मल मॅनेजमेंटसाठी 4,400sq mm क्षेत्रफळ असलेले व्हेपर चेंबर कूलिंग सोल्युशन दिलं आहे.

Glyph इंटरफेस आणि कॅमेरा : नथिंगचा signature Glyph Bar या फोनच्या मागील बाजूला 45 मिनी-LEDsसह उपलब्ध आहे. यात चार इंडिव्हिज्युअली अॅड्रेसेबल झोन, Glyph Timer, Essential Notifications, Live Updates, Volume Indicator, Glyph Torch, Flip to Glyph आणि Flip to Record सारखी वैशिष्ट्ये आहेत.

Nothing Phone 4b
Nothing Phone 4b (Flipkart)

ड्युअल रियर सेटअप : कॅमेरा विभागात ड्युअल रियर सेटअप आहे. 50 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर (f/1.8, OIS + EIS) आणि 8 मेगापिक्सल अल्ट्रावाइड (119.5डिग्री FOV) कॅमेरा आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 4K/30fps व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट उपलब्ध आहे.

बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी :6,000mAh बॅटरी 33W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 7.5W रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते. 0 ते 100 टक्के चार्जिंगसाठी सुमारे 80 मिनिटे लागतील असं कंपनीचं म्हणणं आहे. कनेक्टिव्हिटीमध्ये 5G, Wi-Fi 6, Bluetooth 6.0, USB Type-C आणि GPS सह विविध सॅटेलाइट सपोर्ट आहे. इन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर सुरक्षा देतो. फोनचं वजन सुमारे 210 ग्रॅम आहे.

Nothing Phone 4b
Nothing Phone 4b (Flipkart)

नथिंग फोन (4बी) मिड-रेंज सेगमेंटमध्ये आकर्षक डिझाइन, Glyph इंटरफेस आणि मजबूत स्पेसिफिकेशन्स घेऊन आला आहे. आरसीबी फॅन्ससाठी विशेष एडिशन आणि वाजवी किंमत यामुळं हा फोन लवकरच लोकप्रिय होण्याची शक्यता आहे.

Nothing Phone 4b
Nothing Phone 4b (Nothing)

हे वाचलंत का :

  1. रिअलमीने भारतात स्मार्टफोनच्या किमती वाढवल्या; ग्राहकांना मोठा धक्का
  2. पाच वर्षांनंतर ॲपलची भारतात ॲप स्टोअर आणि आयक्लाउडसाठी पुन्हा कार्ड पेमेंट सुविधा सुरू
  3. इन्स्टाग्रामनं बाल लैंगिक शोषणसंदर्भातील आक्षेपार्ह जाहिराती आणि मजकूर तात्काळ काढून टाकावा; केंद्र सरकारचा मेटाला आदेश