ETV Bharat / technology

Nothing Phone 3a Lite : भारतात 'या' तारखेला होणार लॉंच, काय असेल खास?

Nothing Phone 3a Lite भारतात लवकरच लॉंच होणार आहे. 50MP कॅमेरा, Glyph डिझाइन सह जाणून घ्या किंमत...

Nothing Phone 3a Lite
Nothing Phone 3a Lite (Flipkart)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : November 17, 2025 at 1:31 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

हैदराबाद : लंडनस्थित स्मार्टफोन ब्रँड नथिंगनं आपला मिड-रेंज स्मार्टफोन Nothing Phone 3a Lite भारतात 27 नोव्हेंबर रोजी लॉंच करणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. गेल्या महिन्यात जागतिक पातळीवर लॉंच झालेल्या या फोनची भारतातील किंमत आणि विक्री तपशील लॉंच इव्हेंटमध्येच जाहीर केले जातील. Nothing Phone 3a ची ही एक स्वस्त आणि थोडी साधी आवृत्ती (watered-down variant) आहे, जी भारतीय ग्राहकांसाठी आकर्षक ठरू शकते.

काय असेल किंमत
जागतिक बाजारात या फोनची सुरुवातीची किंमत EUR 249 (अंदाजे 25,600) ठेवण्यात आली आहे. भारतात मात्र टॅक्स आणि इतर कारणांमुळं किंमत 25,000 ते 30,000 दरम्यान राहण्याची शक्यता आहे. फोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होईल. 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज. रंग पर्याय फक्त ब्लॅक आणि व्हाइट असेल.

Nothing Phone 3a Lite वैशिष्ट्ये
Nothing Phone 3a Lite मध्ये 6.77 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचं रिझोल्यूशन 1080x2392 पिक्सेल, 120Hz अॅडॉप्टिव्ह रिफ्रेश रेट, 480Hz टच सॅम्पलिंग रेट, 2160Hz PWM डिमिंग, HDR10+ सपोर्ट आणि पीक ब्राइटनेस 3000 निट्सपर्यंत आहे. डिस्प्लेवर पांडा ग्लासचे प्रोटेक्शन आहे.

ऑक्टा-कोर प्रोसेसर
परफॉर्मन्ससाठी यात MediaTek Dimensity 7300 Pro (4nm) ऑक्टा-कोर प्रोसेसर, Mali-G615 MC2 GPU, 8 जीबी LPDDR4X रॅम आणि UFS 2.2 स्टोरेज देण्यात आला आहे. हायब्रिड स्लॉटमुळं मायक्रोएसडी कार्डनं स्टोरेज 2 टीबीपर्यंत वाढवता येईल. फोन Android 15 वर चालतो आणि Nothing OS 3.5 स्किन दिली आहे. प्री-इंस्टॉल्ड Instagram आणि Facebook अॅप्स युनिन्स्टॉल करता येतील.

कॅमेरा
कॅमेर्‍याच्या बाबतीत, रिअरला 50 मेगापिक्सेल मुख्य सेन्सर (1/1.57 इंच, f/1.88, EIS), 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड (f/2.2) आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो (f/2.4) लेन्स आहेत. 4K 30fps व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि 10x डिजिटल झूम मिळतो. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सेल (f/2.45) फ्रंट कॅमेरा आहे, जो 1080p 60fps पर्यंत रेकॉर्ड करू शकतो.

बॅटरी
इतर फीचर्समध्ये इन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट स्कॅनर, USB Type-C ऑडिओ, बॉटम-फायरिंग स्पीकर, IP54 डस्ट आणि स्प्लॅश रेसिस्टन्स, 5G SA/NSA, Wi-Fi 6, Bluetooth 5.3, NFC यांचा समावेश आहे. बॅटरी 5000mAh ची असून 33W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो.

डिझाइन
डिझाइनच्या बाबतीत फोनाचा पारदर्शक ग्लास बॅक आणि सिग्नेचर Glyph इंटरफेस कायम ठेवण्यात आला आहे. फोनचे परिमाण 164x78x8.3 मिमी आणि वजन 199 ग्रॅम आहे. भारतीय मिड-रेंज सेगमेंटमध्ये Nothing Phone 3a Lite ला Samsung, Xiaomi, Realme आणि Vivo च्या फोनशी स्पर्धा करावी लागेल. नथिंगची अनोखी डिझाइन भाषा आणि क्लीन सॉफ्टवेअर अनुभव यामुळं हा फोन तरुण ग्राहकांना विशेष खास ठरू शकतो.

हे वाचलंत का :

  1. iQOO 15 ते Lava Agni 4 पर्यंत, जाणून घ्या आगामी लॉंच होणाऱ्या स्मार्टफोनची यादी
  2. पोको एफ8 मालिका लवकरच होणार लाँच : अँड्रॉइड 16 सह हाय-एंड फीचर्स
  3. Oppo Find X9, Find X9 Pro ची किंमत पुन्हा लीक, उद्या करणार भारतात धमाका