ETV Bharat / technology

नथिंग OS 4.0 अधिकृतपणे लाँच: अँड्रॉइड १६ वर आधारित अपडेट २१ नोव्हेंबरपासून सुरू

नथिंगने अँड्रॉइड 16 वर आधारित Nothing OS 4.0 आजपासून (21 नोव्हेंबर) लाँच केले. AI फीचर्स, एक्स्ट्रा डार्क मोड व नवीन कस्टमायझेशनसह टप्प्याटप्प्यानं अपडेट सुरू!

Nothing OS 4.0
नथिंग OS 4.0 (Nothing)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : November 21, 2025 at 3:12 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : लंडनस्थित स्मार्टफोन ब्रँड नथिंगनं अखेर त्यांचे बहुप्रतिक्षित अँड्रॉइड 16-आधारित सॉफ्टवेअर अपडेट Nothing OS 4.0 अधिकृतपणे लाँच केले आहे. आजपासून (21 नोव्हेंबर 2025) हे स्थिर अपडेट टप्प्याटप्प्यानं वापरकर्त्यांना मिळणार आहे. गेल्या महिन्याभरापासून चालू असलेल्या ओपन बीटा प्रोग्रॅमच्या यशस्वी चाचणीनंतर कंपनीने हे अपडेट सर्वांसाठी उपलब्ध करून दिले आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेवर भर
नथिंगनं यावेळी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) केंद्रित सुविधांवर विशेष भर दिला आहे. नवीन इंटरफेस, सखोल कस्टमायझेशन आणि वापरकर्त्यांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन तयार केलेल्या फीचर्समुळं Nothing OS 4.0 हा कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठे अपडेट मानले जात आहे.

प्रमुख वैशिष्ट्ये

  • एक्स्ट्रा डार्क मोड : रात्रीच्या वेळी डोळ्यांचा ताण कमी करणारी अत्यंत गडद थीम.
  • पॉप-अप व्ह्यू: मल्टिटास्किंगसाठी फ्लोटिंग विंडो सुविधा.
  • 2×2 क्विक सेटिंग्ज टाइल्स: वारंवार वापरल्या जाणाऱ्या सेटिंग्जना जलद पोहोच.
  • नवीन लॉक स्क्रीन स्टाइल्स : दोन अतिरिक्त क्लॉक लेआउट आणि कस्टमायझेशन पर्याय.
  • लॉक ग्लिम्प्स विडगेट : लॉक स्क्रीनवर निवडक माहिती आणि महत्त्वाच्या नोटिफिकेशन्स.
  • कॅमेरा सुधारणा : नथिंग फोन 2 मालिकेला आता फोन 3 मधील ‘स्ट्रेच कॅमेरा मोड’ मिळणार, ज्यामुळं अधिक रुंद आणि शार्प फोटो येतात.

नथिंग फोन 3a मालिकेत प्रायव्हसीच्या दृष्टीने लॉक ग्लिम्प्स विडगेट डिफॉल्ट बंद ठेवलं आहे, वापरकर्ते हवं तर ते सुरू करू शकतात.

कोणत्या डिव्हाइसेसना मिळणार अपडेट?
सध्या नथिंग फोन (1), फोन (2), फोन (2a), फोन (2a) प्लस, फोन (3a) आणि फोन (3a) प्रो या सर्व डिव्हाइसेसना हा अपडेट टप्प्याटप्प्यानं मिळणार आहे. कंपनीनं सांगितल्याप्रमाणे, पहिल्या आठवड्यात मर्यादित वापरकर्त्यांना अपडेट मिळेल आणि नोव्हेंबर अखेरपर्यंत बहुतांश डिव्हाइसेसपर्यंत पोहोचेल.

नथिंगची AI धोरणात्मक वाटचाल
Nothing OS 4.0 सोबत कंपनीनं आपली AI-केंद्रित भविष्यकाळाची दिशा स्पष्ट केली आहे. भविष्यात येणाऱ्या अपडेट्समध्ये आणखी AI-आधारित स्मार्ट फीचर्स जोडली जाणार असल्याचे संकेत कंपनीचे संस्थापक कार्ल पेई यांनी दिले आहेत. नथिंगचे चाहते गेल्या काही महिन्यांपासून या अपडेटची आतुरतेनं वाट पाहत होते. आता अखेर तो क्षण आला आहे. तुमच्या नथिंग फोनवर अपडेट आलं का? सिस्टम अपडेट तपासून पहा..

हे वाचलंत का :

  1. सॅमसंग गॅलेक्सी टॅब A11+ : तीन AI फीचर्ससह लॉंच होणार
  2. चॅटजीपीटीमध्ये ग्रुप चॅट सुविधा सर्वांसाठी उपलब्ध : कसं वापरायचं?
  3. रियलमी P4x 5G लवकरच होणार भारतात लॉंच; फ्लिपकार्टवर मायक्रोसाइट लाइव्ह