नथिंग सीएमएफ हेडफोन प्रो 13 जानेवारीला भारतात होणार लॉंच
Nothing CMF Headphones Pro 13 जानेवारी रोजी भारतात लॉंच होणार आहे. प्रीमियम वैशिष्ट्यांसह हे हेडफोन्स भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध होतील.

Published : January 8, 2026 at 3:21 PM IST
मुंबई: नथिंगनं आपले CMF Headphones Pro भारतात 13 जानेवारी 2026 रोजी लॉंच करण्याची अधिकृत पुष्टी केली आहे. 2025 मध्ये जागतिक बाजारात दाखल झालेले हे हेडफोन्स आता भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहेत. कंपनीनं यापूर्वी हेडफोन प्रो आणि वॉच 3 प्रो हे दोन्ही उत्पादनं लवकरच भारतात येणार असल्याचं जाहीर केलं होतं, मात्र सध्या फक्त हेडफोन प्रोची लॉंच तारीख निश्चित झाली आहे. किंमत आणि उपलब्धतेबाबतची अधिक माहिती लॉंचच्या वेळी समोर येईल.
CMF Headphones Pro वैशिष्ट्ये
सीएमएफ हेडफोन प्रो सप्टेंबर 2025 मध्ये निवडक जागतिक बाजारात लॉंच झाले होते. भारतात येणारी आवृत्तीही त्याच वैशिष्ट्यांसह येण्याची शक्यता आहे. हे हेडफोन्स फिजिकल कंट्रोल बटणे, बास आणि ट्रेबल लेव्हल समायोजित करण्यासाठी समर्पित स्लायडर, व्हॉल्यूम आणि प्लेबॅकसाठी रोलर तसंच कस्टमायझेबल बटणासह येतात. हे कस्टमायझेबल बटण ANC मोड बदलणे, मायक्रोफोन म्यूट करणे किंवा ChatGPT सारखे AI शॉर्टकट सक्रिय करण्यासाठी वापरता येतं.
Hi-Res ऑडिओला सपोर्ट
ईयर कप्सचा डिझाइन युजर-रिप्लेसेबल आहे, म्हणजे ईयर कुशन्स अतिरिक्त हार्डवेअरशिवाय सहज बदलता येतात. ऑडिओसाठी 40 मिमी कस्टम डायनॅमिक ड्रायव्हर आहे, जो LDAC आणि Hi-Res ऑडिओला सपोर्ट करतो आणि 990 kbps पर्यंत बिटरेट देतो. निकेल-प्लेटेड कंपोनंट्समुळं डिस्टॉर्शन कमी राहतं, असं कंपनीचं म्हणणं आहे. Audiodo सोबत विकसित केलेले Personal Sound ट्यूनिंग वैयक्तिक ऐकण्याच्या क्षमतेनुसार आणि फिटनुसार ऑडिओ समायोजित करतं. सिनेमॅटिक आणि कॉन्सर्ट मोडद्वारे स्पेशिअल ऑडिओ अनुभव मिळतो.
अॅडॅप्टिव्ह ANC
नॉइज कॅन्सेलेशनसाठी 40 dB पर्यंत अॅडॅप्टिव्ह ANC आहे, जे तीन हायब्रिड मायक्रोफोन्स आणि एन्व्हायर्नमेंटल नॉइज कॅन्सेलेशनद्वारे 99 टक्के पर्यंत बाहेरील आवाज कमी करतं. ट्रान्स्परन्सी मोड आणि अॅडॅप्टिव्ह ANC आजूबाजूच्या वातावरणानुसार आपोआप समायोजित होतात. ब्ल्यूटूथ 5.4, LDAC सपोर्ट आणि गेमिंग-व्हिडिओसाठी लो-लॅटन्सी मोड उपलब्ध आहे. बॅटरी लाइफ उल्लेखनीय आहे, ANC बंद असताना 100 तास आणि चालू असताना 50 तास प्लेबॅक मिळू शकतो, असं कंपनीचं म्हणणे आहे. USB-C द्वारे 5 मिनिटे चार्ज केल्यास सुमारे 5 तास तुम्ही गाणी ऐकू शकतात. तसंच याची वॉटर रेसिस्टन्स रेटिंग IPX2 आहे.
सीएमएफ वॉच 3 प्रो
कंपनीची स्मार्टवॉच वॉच 3 प्रो जुलै 2025 मध्ये जागतिक बाजारात लॉंच झाली होती. यात 1.43 इंच गोलाकार AMOLED डिस्प्ले (466×466 रिझॉल्यूशन, 60Hz रिफ्रेश रेट, 670निट्स पीक ब्राइटनेस) आहे. 120 पेक्षा जास्त वॉच फेसेस आणि कस्टमायझेशन पर्याय उपलब्ध आहेत.
350 mAh बॅटरी
आरोग्य आणि फिटनेससाठी सतत हृदयगती मॉनिटरिंग, झोप ट्रॅकिंग, ब्लड ऑक्सिजन, स्ट्रेस मॉनिटरिंग आणि मासिक पाळी ट्रॅकिंग आहे. Nothing X अॅपद्वारे संपूर्ण डेटा, म्युझिक कंट्रोल आणि रिमोट कॅमेरा शटर मिळतं. जेश्चर कंट्रोल्स, ब्ल्यूटूथ कॉलिंग, ब्ल्यूटूथ 5.3 आणि ड्युअल-बँड GPS आहे. गाइडेड ब्रीदिंग, अॅनिमेटेड वॉर्म-अप आणि ChatGPT सपोर्टही आहे. 350 mAh बॅटरी सामान्य वापरात 13 दिवस, अधिक वापरात 10 दिवस आणि AOD चालू असताना 4 दिवस टिकते. IP68 रेटिंग आणि मेटल बॉडी-सिलिकॉन स्ट्रॅपसह हे वॉच प्रीमियम दिसतं. सीएमएफ बाय नथिंगची ही उत्पादने परवडणाऱ्या किंमतीत प्रीमियम वैशिष्ट्ये देतात, ज्यामुळं भारतीय बाजारात त्यांना चांगली मागणी मिळण्याची शक्यता आहे.
हे वाचलंत का :

