नवी किआ सेल्टॉस भारतात लाँच: किंमत, वैशिष्ट्ये आणि तपशील
किआ इंडियानं नवी सेल्टॉस लाँच केलीय. अधिक प्रीमियम डिझाइन, फीचर्स आणि मोठ्या आकारासह ती येतेय.

Published : January 2, 2026 at 12:31 PM IST
मुंबई : किआ इंडियानं भारतीय बाजारात नवी सेल्टॉस लाँच केली आहे. ही दुसऱ्या जनरेशनची सेल्टॉस आहे, ज्याची सुरुवातीची किंमत 10.99लाख रुपये (एक्स-शोरूम) असून टॉप व्हेरिएंटची किंमत 19.99 लाख रुपये पर्यंत जाते. या गाडीचं यापूर्वी अनावरण झालं होतं आणि 11 डिसेंबरपासून 25,000 रुपयांच्या टोकन रकमेसह बुकिंग सुरू झालं होतं. कंपनीच्या घोषणेनुसार, डिलिव्हरी जानेवारी मध्यापासून सुरू होतील. ही एसयूव्ही आता अधिक मोठी, प्रीमियम आणि फीचरपूर्ण झाली आहे.
नव्या किआ सेल्टॉसची किंमत (रुपये लाखात, एक्स-शोरूम)नवी किआ सेल्टॉस पाच मुख्य ट्रिम्समध्ये उपलब्ध आहे: एचटीई, एचटीके, एचटीएक्स, जीटीएक्स आणि एक्स-लाइन. बेस मॉडेल एचटीई आहे तर टॉप एंड जीटीएक्स आणि एक्स-लाइन आहेत. विविध इंजिन आणि ट्रान्समिशननुसार किंमती खालीलप्रमाणे आहेत (रुपये लाखात, एक्स-शोरूम):
| इंजिन / ट्रान्समिशन | HTE | HTE (O) | HTK | HTK (O) | HTX | HTX (A) | GTX | GTX (A) / X-Line |
|---|---|---|---|---|---|---|---|---|
| 1.5-litre NA petrol MT | 10.99 | 12.09 | 13.09 | 14.19 | 15.59 | 16.69 | व्हेरिएंटमध्ये पर्याय उपलब्ध नाही | - म्हणजे (व्हेरिएंटमध्ये पर्याय उपलब्ध नाही) |
| 1.5-litre NA petrol CVT | - | 13.39 | 14.39 | 15.49 | 16.89 | 17.99 | 18.39 | 19.49 |
| 1.5-litre turbo-petrol iMT | - | 12.89 | 13.89 | 14.99 | - | - | - | - |
| 1.5-litre turbo-petrol DCT | - | - | - | 16.29 | 17.69 | 18.79 | 19.19 | 19.99 |
| 1.5-litre diesel MT | 12.59 | 13.69 | 14.69 | 15.79 | 17.19 | 18.29 | - | - |
| 1.5-litre diesel AT | - | 14.99 | 15.99 | 17.09 | 18.49 | 19.59 | 19.79 | 19.99 |
ही किंमत जुन्या मॉडेलपेक्षा थोडी जास्त आहे, पण नव्या डिझाइन आणि फीचर्समुळं किंमत वाढल्याचं दिसून येतंय.

डिझाइन
नव्या सेल्टॉसचं डिझाइन किआच्या ग्लोबल स्टाइलिंगनुसार रिफ्रेश करण्यात आलं आहे. समोर टायगर नोज ग्रिल, व्हर्टिकल एलईडी लाइटिंग आणि उंच प्रोफाइल आहे. नवे 18 इंच अलॉय व्हील्स, कनेक्टेड टेललाइट्स आणि नवे बंपर्स आहेत. स्किड प्लेट्स गनमेटल फिनिशमध्ये आहेत, ज्यामुळं गाडी अधिक स्मार्ट दिसतेय.

परिमाणे
केथ्री प्लॅटफॉर्मवर आधारित ही सेल्टॉस आता या सीरीजमधील सर्वात मोठी आहे.तिची लांबी 4,460 मिमी, रुंदी 1,830 मिमी, उंची 1,63 मिमी आणि व्हीलबेस 2,690 मिमी (80 मिमी जास्त) आहे. यामुळं केबिनमध्ये अधिक जागा मिळते.

इंटिरियर आणि वैशिष्ट्ये
इंटिरियरमध्ये नवे डॅशबोर्ड, ड्युअल-टोन हायलाइट्स आणि लेदरेट अपहोल्स्ट्री आहे. फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील आणि 30 इंचाच्या ड्युअल कर्व्ड स्क्रीन्स आहेत. फीचर्समध्ये ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, वेंटिलेटेड सीट्स, वायरलेस चार्जर, वायरलेस अँड्रॉइड ऑटो/ऍपल कारप्ले, हेड्स-अप डिस्प्ले (एचयूडी), पॉवर्ड ड्रायव्हर सीट, बोस 8-स्पीकर ऑडिओ, अॅम्बियंट लाइटिंग आणि रिअर रिक्लायनिंग सीट्स आहेत. सुरक्षेसाठी 6 एअरबॅग्स स्टँडर्ड, ईएसपी, हिल-स्टार्ट असिस्ट, ऑल-व्हील डिस्क ब्रेक्स, 360-डिग्री कॅमेरा, लेव्हल 2 एडीएएस (लेन कीप असिस्ट, अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल) आणि स्नो, मड, सँड मोड्स आहेत.

पॉवरट्रेन
यात तीन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. 1.5 -लिटर एनए पेट्रोल (115 एचपी, 144 एनएम), 1.5 -लिटर टर्बो-पेट्रोल (160 एचपी, 253 एनएम) आणि 1.5-लिटर डिझेल (116 एचपी, 250 एनएम). ट्रान्समिशनमध्ये एमटी, आयव्हीटी, आयएमटी आणि डीसीटी आहेत. सेल्टॉसला टाटा सिएरा, ह्युंदाई क्रेटा, मारुती सुझुकी विक्टोरिस, मारुती सुझुकी ग्रँड विटारा, टोयोटा अर्बन क्रूझर हायरीडर, होंडा एलिव्हेट इत्यादींशी स्पर्धा करावी लागणार आहे. नवी सेल्टॉस अधिक प्रीमियम आणि टेक्नॉलॉजीपूर्ण झाली आहे, ज्यामुळं कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये ती मजबूत दावेदार ठरेल, अशी शक्यता आहे.

हे वाचलंत का :

