नासाच्या क्युरिऑसिटी रोव्हरनं मंगळावरील प्राचीन पाण्याच्या खुणा उघड करणारे आकर्षक रंगीत पॅनोरामा चित्रित केले
नासाच्या क्युरिऑसिटी रोव्हरनं मंगळावरील माउंट शार्पच्या उंचावरून अप्रतिम रंगीत पॅनोरामा चित्रित केलाय. हे चित्र प्राचीन पाण्याच्या खुणा उघड करतेंय.

Published : January 10, 2026 at 12:11 PM IST
हैदराबाद : नासाच्या क्युरिऑसिटी रोव्हरनं माउंट शार्पच्या उंचावरून मंगळ ग्रहाच्या भूप्रदेशाचे एक अप्रतिम नवीन पॅनोरामा चित्रित केला आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये घेतलेल्या या प्रतिमेत मंगळाच्या एका दिवसात (सोल) सूर्यप्रकाश कसा बदलतो याचं सुंदर दर्शन घडतं. रोव्हरनं सकाळी आणि दुपारी घेतलेल्या प्रतिमा एकत्र करून उबदार आणि थंड रंगांचा समन्वय साधला आहे. परिणामी, मंगळावरील खडकाळ प्रदेशाचे पोस्टकार्डसारखे दृश्य तयार झालं आहे. हे दृश्य रोव्हर गेल्या अनेक वर्षांपासून घेत असलेल्या प्रदेशाचे आहे. यामुळं मंगळाच्या प्राचीन इतिहासातील रहस्ये उलगडण्याचा प्रयत्न होतोय.
रंगीत पॅनोरामाचे वैशिष्ट्य आणि त्याचे महत्त्व
नासाच्या अहवालानुसार, हे पॅनोरामा गेल्या दोन मंगळ दिवसांत (सोल्स) घेतलेल्या काळ्या-पांढऱ्या प्रतिमांपासून तयार करण्यात आला आहे. नंतर या प्रतिमांना विविध प्रकाश परिस्थिती दाखवण्यासाठी रंग दिले गेले. रोव्हर त्यावेळी “बॉक्सवर्क फॉर्मेशन” नावाच्या क्षेत्रावरील एका उंच कड्यावर होता. या भागात प्राचीन काळात खडकांतील भेगाांमधून वाहणाऱ्या भूजलाने खनिजयुक्त नमुने तयार केले होते, जे आजही टिकून आहेत. रंगीत प्रतिमा वैज्ञानिकांना पृष्ठभागावरील वेगवेगळ्या पोत आणि वैशिष्ट्ये स्पष्टपणे ओळखण्यास मदत करतात. वाऱ्याच्या सततच्या धूपीमुळं या भागातील कठोर खनिजाच्या नसा उघड्या पडल्या आहेत. या नसा प्राचीन पाण्याच्या अस्तित्वाच्या महत्त्वाच्या खुणा दर्शवताय. पॅनोरामात क्युरिऑसिटीच्या स्वतःच्या चाकांच्या खुणा दिसतात, ज्या माउंट शार्पच्या चढाईचे साक्षीदार आहेत.
जलमय भूतकाळाचा शोध
या रोहरच्या लँडिंगला 13 वर्षांहून अधिक काळ लोटला तरी क्युरिऑसिटी रोव्हर अजूनही कार्य करतोय. या भागात रोव्हरनं “नेवादो सजामा” आणि “व्हाले दे ला लुना” नावाच्या ठिकाणांवरील खडकांमध्ये ड्रिलिंग केलं आहे. हे नमुने मंगळाच्या प्राचीन पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. रोव्हर स्वायत्तपणे काम करतो, एकाच वेळी अनेक कार्ये पार पाडतो आणि मंगळाच्या हवामानात झालेल्या बदलांचा – विशेषतः तो जलमय ते थंड आणि कोरडा कसा झाला? याचा शोध घेत आहे. हे नवे पॅनोरामा केवळ वैज्ञानिकांसाठीच नव्हे तर सामान्यांसाठीही मंगळाचं सौंदर्या आणि गूढ गोष्टीचं रहस्य उलगडतेय.
हे वाचलंत का :

