नासानं आर्टेमिस कार्यक्रमांतर्गत मोहिमेत केला बदल; 'या' वर्षी उतरणार चंद्रावर...
नासा आर्टेमिस कार्यक्रमांतर्गत आणखी एक मोहीम जोडली आहे. आता 2027 मध्ये लो-अर्थ ऑर्बिटमध्ये चंद्र लँडरची चाचणी होईल आणि 2028 मध्ये चंद्रावर प्रत्यक्ष यान उतरेल.

Published : February 28, 2026 at 11:07 AM IST
हैदराबाद : अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासानं (NASA) त्याच्या आर्टेमिस कार्यक्रमात महत्त्वपूर्ण बदल जाहीर केला आहे. आर्टेमिस मोहिमेत आणखी एक अतिरिक्त मोहीम समाविष्ट करण्यात आली आहे. मूळ योजनेनुसार, आर्टेमिस II मोहीम चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणार होती आणि आर्टेमिस III मध्ये चंद्रावर मानव अतरणार होता. आता आर्टेमिस III ला कमी जोखीम असलेल्या लो-अर्थ ऑर्बिटमध्ये (पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत) पाठवलं जाईल, जिथं चंद्र उतरण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान आणि डॉकिंगची चाचणी करण्यात येणार आहे. नासाचे नवीन प्रशासक जॅरेड इसाकमन यांनी हे बदल जाहीर केले असून, यामुळं चंद्रावरील उतरण्याची मोहीम 2027 पर्यंत होईल, असं सांगितलं आहे.
President Trump gave the world the Artemis Program, and NASA and our partners have the plan to deliver. We will standardize architecture where possible, add missions and accelerate flight rate, execute in an evolutionary way, and safely return American astronauts to the Moon,… pic.twitter.com/Qjm6BD5Ipi
— NASA Administrator Jared Isaacman (@NASAAdmin) February 27, 2026
आर्टेमिस III
मूळ योजनेत आर्टेमिस III ही चंद्रावर उतरणारी पहिली मानवी मोहीम होती, जी 2028 मध्ये होणार होती. आता ही मोहीम 2027 मध्ये लॉंच होईल, पण चंद्रापर्यंत जाणार नाही. त्याऐवजी, अंतराळवीर Orion कॅप्सूलसह स्पेसएक्स आणि ब्लू ओरिजिनच्या चंद्र लँडरसोबत लो-अर्थ ऑर्बिटमध्ये फिरतील आणि डॉकिंग करतील. यात जीवन समर्थन प्रणाली, संप्रेषण, प्रोपल्शन आणि नवीन EVA सूट्सची चाचणी होईल. इसाकमन म्हणाले, "चंद्रावर जोखीम घेण्यापेक्षा पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत एकत्रित प्रणालींची चाचणी करणे, अधिक चांगलं आहे."
आर्टेमिस II अपडेट आणि SLS रॉकेट समस्या
आर्टेमिस II मोहीम चार अंतराळवीरांना चंद्राच्या दूरच्या बाजूला घेऊन जाईल आणि पृथ्वीवर परत आणेल. ही मोहीम आता एप्रिल 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे. यापूर्वी मार्चमध्ये होणार होती, पण SLS रॉकेटमध्ये हेलियम लीक आढळल्यानं तिला विलंब झाला. रॉकेटला केनेडी स्पेस सेंटरच्या व्हेईकल असेंबली बिल्डिंगमध्ये नेलं असून, दुरुस्ती सुरू आहे.
चंद्र लँडर
चंद्रावर लँडर प्रक्रियेची निवड अद्याप पूर्ण झालेली नाही. स्पेसएक्स (एलोन मस्क) आणि ब्लू ओरिजिन (जेफ बेजोस) यांनी लँडर विकसित करण्याचा करार केला आहे. स्टारशिप रॉकेटच्या विलंबामुळं नासानं दोन्ही कंपन्यांकडून वेगवान काम करण्याच्या सूचना केल्या आहेत. आर्टेमिस III मध्ये एक किंवा दोन्ही लँडरसोबत चाचणी होऊ शकते. चीन 2030 पर्यंत चंद्रावर उतरण्याची तयारी करत असून दक्षिण ध्रुवावर बेस तयार करण्यासाठी स्पर्धा सुरू झालीय. नासा आता आर्टेमिस IV आणि V मध्ये 2028 मध्ये एक किंवा दोन वेळा चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करेल.
हे वाचलंत का :

