ETV Bharat / technology

नासाच्या आर्टेमिस II मोहिमेसाठी तारीख पे तारीख : हेलियमच्या समस्येमुळं पुन्हा विलंब

हेलियमच्या समस्येमुळं नासाच्या आर्टेमिस II मोहिमेला (Artemis II mission ) पुन्हा विलंब झाला आहे. SLS रॉकेटच्या अप्पर स्टेजमध्ये हेलियम प्रवाहात समस्या आल्यानं मोहिमेला विलंब झालाय.

Nasa Artemis II mission
नासा आर्टेमिस II मोहीम (Nasa)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : February 23, 2026 at 12:34 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

नवी दिल्ली : अमेरिकन अंतराळ संस्था नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (NASA) नं आपल्या क्रूड (मानवीय) चंद्र मोहीमा आर्टेमिस II तात्पुरती (Artemis II mission delayed again) स्थगित केली. रविवारी, 22 फेब्रुवारी 2026 रोजी नासानं सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितलं की, रॉकेटच्या अप्पर स्टेजमध्ये हेलियमच्या प्रवाहात समस्या आढळल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. रॉकेटला लॉंच पॅडवरून 24 फेब्रुवारी रोजी हलवण्यात येणार आहे.

समस्या आणि रोलबॅकची तयारी
नासाच्या ब्लॉग पोस्टनुसार, आर्टेमिस II साठीचं (Artemis II mission) एसएलएस (Space Launch System) रॉकेट आणि ओरियन स्पेसक्राफ्ट केनेडी स्पेस सेंटर, फ्लोरिडातील लॉंच पॅडवरून व्हेईकल असेंबली बिल्डिंग (VAB) मध्ये परत नेलं जाईल. ही प्रक्रिया सुमारे चार मैलांची आणि अनेक तासांची आहे. ही प्रक्रिया हवामानानुसार 24 फेब्रुवारीपासून सुरू होईल.21 फेब्रुवारीच्या रात्री डेटामध्ये SLS रॉकेटच्या इंटरिम क्रायोजेनिक प्रोपल्शन स्टेजमध्ये हेलियमच्या प्रवाहात व्यत्यय आढळला होता. हेलियम प्रवाह रॉकेटच्या लिक्विड ऑक्सिजन आणि लिक्विड हायड्रोजन टाक्यांना दाब देण्यासाठी आवश्यक आहे, ज्यामुळं इंजिन योग्यरित्या कार्यरत राहतं आणि योग्य पर्यावरणीय परिस्थिती राखली जाते. ही समस्या वेट ड्रेस रिहर्सल दरम्यान उद्भवली नव्हती, परंतु नॉर्मल ऑपरेशन्समध्ये ती ओळखली गेलीय.

हेलियम प्रवाहात व्यत्यय
नासाचे प्रशासक जॅरेड इसाकमॅन यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केलं होतं की, हेलियम प्रवाहातील व्यत्ययामुळं मार्चची लॉंच मोहिमत आता प्रभावित होतेय. त्यांनी सांगितलं, " आमची टीम समस्या सोडवण्यासाठी काम करत आहेत आणि VAB मध्ये रोलबॅकची तयारी करत आहेत." या मोहिमेच्या प्रेक्षपणासाठी मार्च 6 ते 9 आणि 11 या तारखा ठरवण्यात आल्या होत्या, परंतु ही समस्या आल्यानं आता प्रेक्षपण होणार नाहीय. आर्टेमिस II ही अपोलोनंतरची पहिली क्रूड मोहीम आहे, जी लो अर्थ ऑर्बिटपलीकडं जाईल. या 10 दिवसांच्या प्रवासात तीन नासाचे अंतराळ यात्री आणि एक कॅनेडियन अंतराळ यात्री ओरियन कॅप्सूलमध्ये चंद्राभोवती फिरतील आणि पृथ्वीवर परत येतील.

मोहिमेचं महत्त्व
या मोहिमेत यापूर्वी हायड्रोजन लीक आणि इतर समस्या आल्या होत्या. तरीही, नासा दुरुस्ती आणि डेटा विश्लेषणानंतर लवकरात लवकर लॉंच करण्याचा प्रयत्न करेल. आर्टेमिस प्रोग्राम चंद्रावर मानवीय उपस्थिती पुन्हा स्थापित करण्यासाठी आणि मंगळ मोहिमेच्या तयारीसाठी महत्त्वाची आहे.

हे वाचलंत का :

  1. आर्टेमिस II च्या प्रक्षेपणापूर्वी क्रू क्वारंटाइनमध्ये
  2. नासा आर्टेमिस II मोहीम चार आठवड्यांनी पुढे ढकलली
  3. नासाच्या आर्टेमिस II चंद्र मोहिमेला इंधन गळतीमुळे धक्का, मोहिमेच्या वेळापत्रकावर परिणाम?