मोटोरोला सिग्नेचरचा पहिला टीझर अधिकृतपणे जारी, लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे आणि कसं पाहावं?
मोटोरोला सिग्नेचर प्रीमियम स्मार्टफोन भारतात 7 जानेवारी 2026 रोजी लॉंच होणार आहे. फॅब्रिक फिनिश, पेरिस्कोप लेन्स आणि दमदार स्पेक्ससह हा फोन लक्झरी सेगमेंटमध्ये धूम करेल.

Published : January 1, 2026 at 9:53 AM IST
मुंबई : 2026 च्या सुरुवातीला स्मार्टफोन बाजारात धमाका होणार आहे. मोटोरोला कंपनीनं आपल्या नवीन प्रीमियम सिग्नेचर सीरिजच्या स्मार्टफोनची भारतात लॉन्चिंग (Motorola Signature Launch) अधिकृतपणे जाहीर केली आहे. हा फोन मोटोरोलाच्या एज सीरिजपेक्षा वरच्या स्तरावर असलेला लक्झरी आणि प्रीमियम डिव्हाइस म्हणून सादर केला जाणार आहे. कंपनीनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर टीझर पोस्ट करून (Motorola Signature teaser) चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. हा फोन फॅब्रिक फिनिश डिझाइन, पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स आणि दमदार स्पेसिफिकेशन्ससह येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. हा फोन भारतात 7 जानेवारी 2026 रोजी हा फोन लॉंच होईल, ज्यामुळं नववर्षाच्या सुरुवातीला स्मार्टफोनप्रेमींना एक नवीन पर्याय मिळेल.
We’re rewriting the rules of design… Can you guess what’s coming? 👀
— motorola (@Moto) December 31, 2025
Live stream it: https://t.co/GKYwzVUMgx#LenovoTechWorld pic.twitter.com/dJmBBG2p7a
मोटोरोला सिग्नेचरची भारतात लॉंच तारीख आणि इव्हेंट तपशील
मोटोरोला इंडियानं एक्सवर केलेल्या अधिकृत पोस्टनुसार, सिग्नेचर फोनची भारतातील लॉन्चिंग 7 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. कंपनीनं "प्रीमियम डिझर्व्ह्स इट्स सिग्नेचर" अशा शब्दांचा वापर करून हा फोन खास आणि वेगळा असल्याचं सांगितलं आहे. फ्लिपकार्टवरही या फोनची मायक्रोसाइट लाइव्ह झाली आहे, ज्यावरून हा फोन विशेषतः भारतासाठी महत्त्वाचा असल्याचं दिसतं. ग्लोबल लॉंच 6 जानेवारीला होऊ शकतं, पण भारतात एक दिवसानं तो उपलब्ध होईल. हा इव्हेंट ऑनलाइन स्ट्रीम केला जाईल आणि फ्लिपकार्टवरून विक्री सुरू होईल अशी अपेक्षा आहे. तुम्ही हा कार्यक्रम थेट युट्यूबवर (https://www.youtube.com/live/yfCoOHre410) पाहू शकता.
अपेक्षित स्पेसिफिकेशन्स आणि वैशिष्ट्ये
मोटोरोला सिग्नेचर फोन प्रीमियम सेगमेंटमध्ये स्पर्धा करणारा असल्यानं त्याच्या स्पेसिफिकेशन्स खूप दमदार असतील.
लीक आणि टीझरनुसार, फोनच्या मागील पॅनेलवर फॅब्रिक फिनिश असेल, ज्यामुळं तो स्लिक आणि लाइटवेट दिसेल. फ्लॅट डिस्प्लेसह स्लिम बेझेल्स आणि मेटल फ्रेम असतील. डाव्या बाजूला अतिरिक्त बटन असेल, जे कॅमेरा कंट्रोल किंवा एआय फीचर्ससाठी वापरले जाईल. स्टायलस सपोर्टचीही शक्यता आहे.
कॅमेरा
ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स असेल, ज्यामुळं झूम आणि फोटोग्राफीमध्ये उत्कृष्ट परफॉर्मन्स मिळेल. मुख्य सेन्सर 50 मेगापिक्सेलचा असू शकतो.
प्रोसेसर आणि परफॉर्मन्स
स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 चिपसेट, 16 जीबी रॅम आणि अँड्रॉइड 16 ऑपरेटिंग सिस्टीम असण्याची शक्यता आहे.
बॅटरी आणि इतर
मोठी बॅटरी (किमान 6,500 mAh) आणि जलरोधक डिझाइन अपेक्षित आहे. हा फोन मोटोरोला एज 70 अल्ट्राचा रिब्रँडेड व्हर्जन असू शकतो, ज्यामुळं तो फ्लॅगशिप स्तरावर असेल.
किंमत आणि स्पर्धा
या फोनची किंमत सुमारे 50,000 रुपये किंवा त्याहून अधिक असू शकते, ज्यामुळं तो शाओमी, वनप्लस आणि रिअलमीसारख्या ब्रँड्सशी थेट स्पर्धा करेल. 2026 च्या सुरुवातीला अनेक प्रीमियम फोन लॉंच होत असल्यानं बाजारात मोठी स्पर्धा दिसेल. मोटोरोला सिग्नेचर फोन डिझाइन आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत वेगळा ठरणार असल्यानं चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 7 जानेवारीपर्यंत अधिक तपशील समोर येतील.
हे वाचलंत का :

