ETV Bharat / technology

Moto G77 Power: 7000mAh बॅटरी आणि 3.5mm हेडफोन जॅकसह भारतात लाँच

Moto G77 Power भारतात 7000mAh बॅटरी, Dimensity 6400 आणि 3.5mm जॅकसह लॉंच झालाय.

Moto G77 Power
Moto G77 Power (Motorola)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : July 8, 2026 at 12:48 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : मोटोरोलानं भारतात नवीन स्मार्टफोन Moto G77 Power लॉंच केला आहे. 7000mAh ची मोठ्या बॅटरी, MediaTek Dimensity 6400 प्रोसेसर आणि 3.5mm हेडफोन जॅकसह हा फोन बजेट सेगमेंटमध्ये आकर्षक पर्याय ठरेल अशी अपेक्षा आहे.

किंमत आणि उपलब्धता : Moto g77 POWER च्या 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 23,999 रुपये आहे. 'RAM Boost' द्वारे याची RAM 24GB पर्यंत आणि मायक्रो-एसडी (microSD) कार्डद्वारे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते. Moto g77 POWER ची विक्री 13 जुलै 2026 पासून फ्लिपकार्ट (Flipkart), मोटोरोला (Motorola) आणि देशभरातील किरकोळ दुकानांमधून सुरू होईल. हा फोन तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे, PANTONE Nautical Blue, PANTONE Fuchsia Red आणि PANTONE Impenetrable. जिओ (Jio) वापरकर्ते 200 रुपये प्रति महिना दराने 15 ॲप्सचा समावेश असलेली 'OTT Pass' ऑफर घेऊ शकतात.

Moto G77 Power वैशिष्ट्ये आणि डिझाइन : Moto G77 Power मध्ये 6.72 इंचाचा मोठा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रेजोल्यूशन 2400 x 1080 पिक्सेल्स (Full HD+) आहे आणि 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. 120Hz टच सॅम्पलिंग रेट, Water Touch टेक्नॉलॉजी आणि 1050 निट्सपर्यंत ब्राइटनेससह हा डिस्प्ले सूर्यप्रकाशातही चांगला दिसतो. 20:9 आस्पेक्ट रेशो आणि 8-बिट कलर सपोर्टमुळं व्हिडिओ पाहणे आणि गेमिंगचा अनुभव उत्तम राहील. फोनचा डायमेंशन 166.23x 76.50x 8.89mm इतका आहे आणि वजन 215 ग्रॅम आहे. PMMA किंवा व्हेगन लेदर इन्स्पायर्ड रियर पॅनल, प्लास्टिक फ्रेम आणि Corning Gorilla Glass 7i प्रोटेक्शनसह हा फोन मजबूत आहे. IP64 डस्ट आणि वॉटर रेसिस्टंट प्रमाणपत्र आणि MIL-STD-810H ड्युरेबिलिटी स्टँडर्डमुळं रोजच्या वापरात टिकाऊ ठरेल.

Moto G77 Power परफॉर्मन्स आणि स्टोरेज : डिव्हाइस MediaTek Dimensity 6400 (6nm) चिपसेटवर चालेल, ज्यात Arm Mali-G57 MP2 GPU आहे. 4GB + 128GB आणि 8GB + 128GB असे दोन व्हेरियंट उपलब्ध असतील. microSD कार्डद्वारे १TB पर्यंत स्टोरेज वाढवता येईल. Android 16 आउट-ऑफ-बॉक्स देण्यात येईल. कंपनी एक OS अपग्रेड आणि तीन वर्षांच्या सिक्युरिटी पॅचेस देण्याचे आश्वासन देत आहे.

Moto G77 Power कॅमेरा सेटअप : मागील बाजूस 50MP Sony LYT-600 मुख्य सेन्सर (f/1.8, Quad Pixel, PDAF) आणि 8MP 120° अल्ट्रावाइड लेन्स आहे. फ्रंटमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा (f/2.2, Quad Pixel) देण्यात आला आहे. फोनमध्ये Dolby Atmos सपोर्ट असलेले स्टिरिओ स्पीकर्स, 3.5mm हेडफोन जॅक, FM रेडिओ आणि Hi-Res Audio प्रमाणपत्र आहे.

Moto G77 Power बॅटरी आणि चार्जिंग : Moto G77 Power ची सर्वात मोठी खासियत म्हणजे 7000mAh ची विशाल बॅटरी. कंपनीचा दावा आहे की एका चार्जवर 59 तास वापर मिळू शकतो. 30W TurboPower फास्ट चार्जिंग आणि 6W रिव्हर्स वायर्ड चार्जिंग सपोर्ट आहे. USB-C 2.0 पोर्ट वापरलं आहे.

Moto G77 Power कनेक्टिव्हिटी आणि सुरक्षा : 5G, 4G LTE, Bluetooth 5.4, ड्युअल-बँड Wi-Fi, GPS (सर्व प्रमुख सॅटेलाइट सिस्टम्स) उपलब्ध आहेत. सेन्सर्समध्ये अ‍ॅक्सेलरोमीटर, जायरोस्कोप, प्रॉक्सिमिटी, अॅम्बियंट लाइट, SAR आणि ई-कॉम्पास यांचा समावेश आहे. सिक्युरिटीसाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर, फेस अनलॉक, ThinkShield आणि Moto Secure फीचर्स आहेत.

Moto G77 Power दीर्घकाळ टिकणारी बॅटरी, आधुनिक प्रोसेसर, चांगला डिस्प्ले आणि 3.5mm जॅक यांसारख्या वैशिष्ट्यांसह बजेट फोन प्रेमींसाठी आकर्षक पर्याय असेल.

हे वाचलंत का :

  1. गुगलचा 'मेड बाय गुगल' कार्यक्रम: 12 ऑगस्टला पिक्सेल 11 (Pixel 11) सिरीज होणार लॉंच?
  2. सॅमसंग गॅलक्सी अनपॅक्ड इव्हेंटची 2026 तारीख जाहीर; Galaxy Z Fold 8, Flip 8, Watch 9 लवकरच होणार लॉंच?
  3. Nothing Phone 4b आणि आरसीबी एडिशन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत...