ETV Bharat / technology

मोटोरोला एज 70 प्रो प्लस भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

मोटोरोलानं भारतात एज 70 प्रो प्लस लाँच केला. पेरिस्कोप कॅमेरा, 6500mAh बॅटरी आणि Dimensity 8500 Extreme सह हा दमदार फोन भारतात उपलब्ध झाला आहे.

Motorola Edge 70 Pro+
मोटोरोला एज 70 प्रो प्लस (Motorola)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : June 4, 2026 at 12:21 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : मोटोरोला कंपनीनं आपल्या एज 70 सीरीजमध्ये नवीनतम आणि सर्वात प्रीमियम स्मार्टफोन Motorola Edge 70 Pro+ भारतात लाँच केला आहे. हा फोन विद्यमान Edge 70, Edge 70 Fusion आणि Edge 70 Pro या मॉडेल्समध्ये सामील झाला आहे. विशेष म्हणजे, Edge 70 Pro+ मध्ये पहिल्यांदाच पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स देण्यात आली आहे, ज्यामुळं फोनची कॅमेरा क्षमता वाढली आहे.45,000 पेक्षा जास्त किंमत असलेला हा फोन एज सीरीजसाठी एक नवा मीलस्टोन आहे. प्रीमियम सेगमेंटमध्ये मोटोरोलाने पहिल्यांदा इतक्या मजबूत एन्ट्री केली आहे.

मोटोरोला एज 70 प्रो+ किंमत आणि उपलब्धता : मोटोरोला एज 70 प्रो+ (12GB RAM + 256GB स्टोरेज) या एकमेव मेमरी व्हेरिएंटमध्ये लॉंच झाला आहे. या फोनची किंमत 47,999 ठेवण्यात आली आहे. हा फोन तीन आकर्षक रंगात Chicory Coffee, Zinfandel आणि Stormy Sea मध्ये उपलब्ध आहे. फोनचा पहिला सेल 11 जून रोजी दुपारी 12 वाजता Flipkart, Motorola.in आणि प्रमुख रिटेल स्टोर्सवर होणार आहे. खरेदीदारांसाठी 3,000पर्यंत बँक कॅशबॅक, एक्सचेंज ऑफर आणि आकर्षक EMI पर्याय उपलब्ध आहेत. यामुळं फोन अधिक परवडणारा होईल.

मोटोरोला एज 70 प्रो+ स्पेसिफिकेशन्स : फोनमध्ये 6.8 इंचाचा 1.5K ‘Extreme AMOLED’ डिस्प्ले देण्यात आला आहे. 144Hz रिफ्रेश रेट, 5,200 निट्स पीक ब्राइटनेस आणि Gorilla Glass 7i संरक्षण यामुळं डिस्प्ले अत्यंत तेजस्वी, रंगीत आणि टिकाऊ आहे. मल्टिमीडिया आणि गेमिंगसाठी हा डिस्प्ले उत्कृष्ट अनुभव देईल.

Motorola Edge 70 Pro+
मोटोरोला एज 70 प्रो प्लस रंग पर्याय (Motorola)

प्रोसेसर आणि परफॉर्मन्स: MediaTek Dimensity 8500 Extreme चिपसेट LPDDR5X RAM आणि UFS 4.1 स्टोरेजसोबत येतो. Edge 70 Pro मध्ये देखील हाच चिपसेट उत्कृष्ट परफॉर्मन्स देत आहे. 4600mm² च्या व्हेपर चेंबरमुळं फोन गेमिंग आणि हेवी वापरातही थंड राहतो.

Motorola Edge 70 Pro+
मोटोरोला एज 70 प्रो प्लस प्रोसेसर (Motorola)

कॅमेरा: सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे 50MP क्वाड कॅमेरा सेटअप. यात Sony LYT-710 प्रायमरी सेन्सर, 50MP अल्ट्रावाइड (ऑटोफोकससह), 50MP पेरिस्कोप लेन्स (3.5x ऑप्टिकल झूम) आणि 50MP फ्रंट कॅमेरा (ऑटोफोकस) समाविष्ट आहे. AI-powered Super Zoom Pro 50x पर्यंत सपोर्ट करतो. सर्व लेन्सवर 4K 60fps व्हिडिओ रेकॉर्डिंग, व्हिडिओ HDR, ऑटो मॅक्रो आणि AI लो-लाइट इमेजिंग उपलब्ध आहे. हा फोन Realme 16 Pro+ सारख्या प्रतिस्पर्ध्यांशी मुकाबला करण्यास सक्षम आहे.

Motorola Edge 70 Pro+
मोटोरोला एज 70 प्रो प्लस कॅमेरा (Motorola)

बॅटरी आणि चार्जिंग: 6,500mAh मोठी बॅटरी 90W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. एक दिवस सहज वापर आणि हलक्या वापरात आणखी जास्त टिकणारी बॅटरी फोनला वेगळेपणा देते.

Motorola Edge 70 Pro+
मोटोरोला एज 70 प्रो प्लस बॅटरी (Motorola)

सॉफ्टवेअर आणि ड्युरेबिलिटी:Android 16 आउट-ऑफ-द-बॉक्स, 3 वर्ष OS अपग्रेड्स आणि 5 वर्ष सिक्युरिटी पॅचेस मिळतं. IP68 + IP69 रेटिंग, MIL-810H मिलिटरी स्टँडर्ड, Dolby Atmos, Hi-Res Audio आणि Spatial Audio सारखी वैशिष्ट्ये फोनला प्रीमियम फील देतात.

Motorola Edge 70 Pro+
मोटोरोला एज 70 प्रो प्लस (Motorola)

हे वाचलंत का :

  1. Lava Bold N2 5G भारतात लाँच; 6.75 -इंचाचा डिस्प्ले आणि 6,000mAh बॅटरीची वैशिष्ट्ये
  2. realme P4R 5G भारतात 10 जून रोजी होणार लाँच, 8000mAh बॅटरीसह 144Hz डिस्प्ले
  3. इटेलनं लाँच केला 'इटेल एक्वा' फीचर फोन: IP67 रेटिंगसह मजबूत आणि किफायतशीर पर्याय