ETV Bharat / technology

मोटोरोला एज 70 फ्यूजन स्पेसिफिकेशन्स कन्फर्म: 7,000mAh बॅटरी आणि 50MP सोनी LYT-710 कॅमेरा

मोटोरोला एज 70 फ्यूजन भारतात लवकरच लॉंच होतोय. 7,000mAh बॅटरी, 50MP सोनी LYT-710 कॅमेरा, 144Hz 1.5K क्वाड-कर्व्ड डिस्प्ले आणि Moto AI फीचर्स यात असेल.

Motorola Edge 70 Fusion
मोटोरोला एज 70 फ्यूजन (Motorola)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : February 24, 2026 at 3:47 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : मोटोरोलानं भारतात एज 70 फ्यूजन स्मार्टफोनच्या लाँचची जोरदार तयारी सुरू केली आहे. फ्लिपकार्टवर टीझर्स सुरू झाल्यानंतर कंपनीनं फोनच्या प्रमुख वैशिष्ट्यांची माहिती उघड केली आहे. हा फोन एज 70 सिरीजमधील दुसरं डिव्हाइस असेल. हा फोन मिड-रेंज सेगमेंटमध्ये सर्वात परवडणारा पर्याय ठरू शकतो. लाँचची तारीख अद्याप अधिकृतपणे जाहीर झाली नाही, पण मार्चच्या सुरुवातीला हा फोन भारतात येण्याची शक्यता आहे. कंपनी 2 मार्चला आणखी डिटेल्स उघड करणार आहे.

Motorola Edge 70 Fusion
मोटोरोला एज 70 फ्यूजन रंग पर्याय (Motorola)

कॅमेरा अपग्रेड
मोटोरोला एज 70 फ्यूजन 50MP सोनी LYT-710 सेन्सर असणारा जगातील पहिला स्मार्टफोन ठरणार आहे. हा सेन्सर कमी प्रकाशात अत्यंत स्पष्ट फोटो घेण्याचे, व्हिडिओमध्ये हायलाइट्स चांगल्या नियंत्रित करण्याचं आणि पँटोन-व्हॅलिडेटेड रंग, स्किन टोन्स ओळखू शकतो. मुख्य कॅमेरासोबत 13 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेन्स आहे, जी मॅक्रो आणि डेप्थसाठीही वापरता येते. सेल्फीसाठी 32 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. सर्व कॅमेरे 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट करतात. याशिवाय Moto AI फीचर्स जसं AI फोटो एन्हान्समेंट आणि अॅडॅप्टिव्ह व्हिडिओ स्टेबिलायझेशन उपलब्ध असतील.

Motorola Edge 70 Fusion
मोटोरोला एज 70 फ्यूजन ब्राइटनेस (Motorola)

डिस्प्ले
फोनमध्ये 1.5K रेझोल्यूशन असलेला 1454Hz रिफ्रेश रेटचा क्वाड-कर्व्ड डिस्प्ले आहे. याचा पीक ब्राइटनेस 5,200 निट्सपर्यंत पोहोचतो. हा फोन HDR10+ सपोर्टनं सुसज्ज असेल. हा मिड-रेंजमध्ये भारतातील एकमेव 144Hz 1.5K ट्रू कलर क्वाड-कर्व्ड डिस्प्ले असल्याचा दावा कंपनी करत आहे. स्क्रीनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 96.2% आहे, ज्यामुळं व्हिडिओ कंटेंट आणि गेमिंगसाठी उत्तम अनुभव मिळेल.

Motorola Edge 70 Fusion
मोटोरोला एज 70 फ्यूजन फीचर (Motorola)

बॅटरी आणि डिझाइन
सर्वात मोठे अपग्रेड म्हणजे 7,000mAh बॅटरी, जी एज सिरीजमधील सर्वात मोठी आहे. कंपनीचा दावा आहे की एका चार्जवर 52 तास फोनचा वापर शक्य आहे.या फोन 68W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. सिलिकॉन-कार्बन बॅटरीमुळं फोन फक्त 7.99mm पातळ असेल. रंग पर्यायमध्ये सिल्हूट,ब्लू सर्फ आणि कंट्री एअर, ज्यात लेदर-इन्स्पायर्ड बॅक पॅनल आहे.

Motorola Edge 70 Fusion
मोटोरोला एज 70 फ्यूजन बॅटरी (Motorola)

काय आहे अपेक्षा
एज 60 फ्यूजनच्या तुलनेत एज 70 फ्यूजनमध्ये बॅटरी क्षमता, पीक ब्राइटनेस, कॅमेरा सेन्सर आणि AI फीचर्समध्ये मोठी सुधारणा दिसतेय. हा फोन फक्त अपडेट नसून अधिक अॅम्बिशियस आणि फीचर-पॅक्ड उत्तराधिकारी आहे. बॅटरी लाइफ आणि कॅमेरा परफॉर्मन्स प्रायोरिटी असणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय ठरेल. एज 60 फ्यूजनची किंमत भारतात 20,999 रुपये होती, पण वाढत्या किमतींमुळं एज 70 फ्यूजन थोड्या जास्त किंमत सेगमेंटमध्ये येऊ शकतो. मिड-रेंजमध्ये बॅटरी, कॅमेरा आणि डिस्प्ले यांचा उत्तम कॉम्बिनेशन देणारा हा फोन असणार आहे.

हे वाचलंत का :

  1. iQOO 15R भारतात लॉंच: 200MP कॅमेरा आणि 7600mAh बॅटरीसह 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट!
  2. Xiaomi 17, Xiaomi 17 Ultra आणि Xiaomi Pad 8 : 28 फेब्रुवारीला होणार भारतात लॉंच
  3. सॅमसंग गॅलेक्सी S26 अल्ट्रा: बॅटरी आणि कॅमेरा स्पेसिफिकेशन्समध्ये बदल नाही; लीक झाले प्रमोशनल मटेरियल