Moto X70 Air Pro : स्लिम फ्लॅगशिपचा प्रो व्हर्जन लवकरच होणार लाँच
मोटोरोला कंपनीचं Moto X70 Air Pro स्लिम डिझाइनसह पेरिस्कोप कॅमेरा, 90W चार्जिंग आणि Snapdragon 7+ Gen 5 चिपसेट असलेलं प्रो व्हर्जन लवकरच लाँच होणार आहे.

Published : January 1, 2026 at 3:10 PM IST
मुंबई : मोटोरोला कंपनीनं नुकताच आपला नवीन स्मार्टफोन Moto X70 Air Pro चा टीझर जारी केला आहे. हा फोन Moto X70 Air च्या प्रो व्हर्जन म्हणून येत असून, अतिशय स्लिम डिझाइनसह अधिक शक्तिशाली कॅमेरा, जलद चार्जिंग आणि AI फीचर्स देणार आहे. चीनमध्ये प्रथम लाँच होणारा हा फोन जागतिक बाजारात Motorola Edge 70 Pro नावानं येईल. लाँच डेट अद्याप जाहीर नाही, पण जानेवारी 2026 मध्ये तो येण्याची शक्यता आहे.
ग्लोबल लाँच
हा फोन सर्वात आगोदर चीनमध्ये लॉंच होणार आहे. त्यानंतर जागतिक बाजारात, विशेषतः भारतात, तो Motorola Edge 70 Pro म्हणून लॉंच होण्याची अपेक्षा आहे. मोटोरोलाची नुकतीची स्ट्रॅटेजी पाहता, X सीरिज चीनपुरती मर्यादित राहते आणि एज सीरिज जागतिक बाजारासाठी असते.
Moto X70 Air Pro specifications
— Anvin (@ZionsAnvin) January 1, 2026
- 6.78-inch OLED (1264 x 2780p)
- Snapdragon 8 Gen 5
- 8GB / 12GB / 16GB RAM
- 256GB / 512GB / 1TB storage
- 5,100mah rated battery
- Front: 50MP
- Rear: 50MP + 50MP + 50MP (3x optical zoom)
- Android 16 | Hello UX
- In-screen fingerprint sensor
-… pic.twitter.com/7laK7Y7aVV
AI कॅमेरा
हा फोन AI-आधारित ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येईल, ज्यात पेरिस्कोप टेलिफोटो लेन्सचा समावेश आहे. Moto X70 Air मध्ये फक्त ड्युअल कॅमेरा होता, तर प्रो व्हर्जनमध्ये झूम परफॉर्मन्स सुधारेल. स्लिम बॉडीत पेरिस्कोप लेन्स बसवणे हे मोटोरोलाचे मोठे यश मानलं जाईल. AI फीचर्समुळं फोटोग्राफी आणखी स्मार्ट होईल.
जलद चार्जिंग आणि मोठी बॅटरी
चीनच्या 3सी सर्टिफिकेशननुसार, हा फोन 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट करेल. Moto X70 Air मध्ये 67W चार्जिंग होते, तर प्रो व्हर्जनमध्ये हे मोठे अपग्रेड आहे. बॅटरीची क्षमता अद्याप जाहीर नाही, पण ती मोठी असण्याची शक्यता आहे. स्लिम फोनमध्ये जलद चार्जिंग आणि चांगली बॅटरी हे मोठे फायदे ठरतील.
चिपसेट
गीकबेंच लिस्टिंगनुसार, हा फोन Snapdragon 7+ Gen 5 चिपसेटसह येईल, जो कार्यक्षमता आणि परफॉर्मन्समध्ये संतुलित असेल. काही लीकनुसार, हा फोन स्लिम डिझाइनसह पावर, कॅमेरा आणि बॅटरीतील कमतरता दूर करेल. Moto X70 Air Pro हा मोटोरोलाचा सर्वात महत्वाकांक्षी स्लिम फ्लॅगशिप ठरू शकतो. AI कॅमेरा, जलद चार्जिंग आणि प्रीमियम परफॉर्मन्स यामुळं तो हाय-एंड थिन फोन मार्केटमध्ये स्पर्धा करेल.
हे वाचलंत का :

