MIVI स्मार्टफोनचा भारत बाजारात प्रवेश: फ्लिपकार्टवर मायक्रोसाइट लाइव्ह, किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी
एमव्ही ब्रँड आपला पहिला स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच करणार आहे. फ्लिपकार्टवर मायक्रोसाइट लाइव्ह झाली आहे. किंमत 15 हजारांखाली असून स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि ग्रीन कलर असेल.

Published : August 27, 2026 at 2:59 PM IST
मुंबई : भारतीय स्मार्टफोन बाजारात नव्या ब्रँड्सची एंट्री (MIVI smartphone ) झालीय. ऑडिओ प्रॉडक्ट्ससाठी प्रसिद्ध असलेला एमव्ही (MIVI) आता आपला पहिला स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. फायर-बोल्टनं बोल्ट या सब-ब्रँडद्वारे बाजारात प्रवेश केल्याप्रमाणे एमव्हीही आपला पोर्टफोलिओ विस्तृत करत आहे. काही दिवसांपूर्वी फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनचा बॅनर दिसला होता आणि आता मायक्रोसाइटही लाइव्ह झाली आहे.
Beauty with a Snapdragon 5G heartbeat.
— Mivi (@MiviOfficial) August 27, 2026
September 2026 pic.twitter.com/kSdokELbfE
स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, ग्रीन कलर आणि 15 हजारांखाली किंमत : एमव्ही स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन प्रोसेसरवर आधारित असेल, अशी पुष्टी झाली आहे. पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे, हा फोन ग्रीन रंगात आणि गोलाकार कोपऱ्यांसह येणार आहे. कंपनी लवकरच लाँच डेट जाहीर करेल आणि मुख्य वैशिष्ट्यांची टीझिंगही सुरू करू शकते. किंमत श्रेणीबाबत सांगायचं झालं तर, एमव्ही फोन भारतीय बाजारात 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध होईल. एमव्ही आतापर्यंत परवडणाऱ्या ऑडिओ प्रॉडक्ट्स आणि प्रगत तंत्रज्ञानासाठी ओळखली जाते. त्यामुळं त्यांच्या पहिल्या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना काय मिळेल, याबाबत उत्सुकता आहे.
Wait… MIVI is launching a smartphone under ₹15K with a Snapdragon chipset ?👀
— Sanju Choudhary (@saaaanjjjuuu) August 27, 2026
Key highlights:
• No bloatware, first device with stock Android only
• First device with in house designed PCBA
• An affordable 5G option
I genuinely have high hopes from Mr. Himanshu sir.
Just… pic.twitter.com/c9E0eWLWBW
नव्या ब्रँड्सचा भारतात प्रवेश : गेल्या काही महिन्यांत भारतीय स्मार्टफोन बाजारात एआय+ आणि बोल्टसारख्या नव्या ब्रँड्सनी प्रवेश केला आहे. एमव्हीही याच मार्गावर आहे. मेमरी आणि स्टोरेजच्या वाढत्या किमतींमुळं मोठ्या ब्रँड्सना बजेट सेगमेंटमध्ये किंमत कमी ठेवणं कठीण झालं आहे. त्यामुळे हे नवे ब्रँड मिड-रेंज स्मार्टफोन शोधणाऱ्या खरेदीदारांना लक्ष्य करत आहेत. एमव्हीनं आपल्या स्मार्टफोनद्वारे परवडणाऱ्या किंमतीत चांगली कामगिरी आणि डिझाईन देण्याची अपेक्षा आहे. फ्लिपकार्टवरील मायक्रोसाइट आणि किंमत टिपिंगमुळं बाजारात चर्चा सुरू झाली आहे. कंपनी लवकरच अधिक तपशील आणि लाँच डेट जाहीर करेल, अशी शक्यता आहे. भारतीय ग्राहकांना नवा पर्याय मिळणार असल्यानं स्पर्धा आणखी तीव्र होईल.
हे वाचलंत का :

