मेटा भारतात आपलं पहिलं एआय (AI) डेटा सेंटर सुरू करणार; रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत भागीदारी
मार्क झुकरबर्ग यांची कंपनी मेटा आता भारतात आपलं पहिलं एआय डेटा सेंटर सुरू करणार आहे. यासाठी कंपनीनं रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत भागीदारी केलीय.

Published : June 10, 2026 at 2:57 PM IST
मुंबई : फेसबुकची मूळ कंपनी, मेटा, भारतात आपलं पहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) डेटा सेंटर सुरू करणार आहे. यासाठी मेटानं रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत भागीदारी केली असून, हे डेटा सेंटर गुजरातच्या जामनगर येथे उभारलं जाईल. रिलायन्स इंडस्ट्रीज जामनगरमध्ये हे केंद्र उभारणार असून, त्यानंतर मेटा तेथे आपले कामकाज सुरू करेल. हे AI डेटा सेंटर भारताच्या AI मोहिमेला चालना देईल.मेटा आणि रिलायन्सच्या भागीदारीतून उभारण्यात येत असलेल्या या AI डेटा सेंटरची क्षमता सुरुवातीला 168 मेगावॅट असेल. नंतर त्यात विस्तार केला जाईल. वृत्तानुसार, हे केंद्र पुढील दोन वर्षांत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
रिलायन्स उभारणार मेटा AI डेटा सेंटर : रिलायन्स हे डेटा सेंटर उभारणार असून, मेटा आपल्या AI प्रणालींना आधार देण्यासाठी त्याचा वापर करेल. हा आधार फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपसारख्या उत्पादनांना शक्ती देतो. हा प्रकल्प मार्क झुकरबर्गच्या मोठ्या संकल्पनेलाही पुढ नेईल.
सर्वसमावेशक सेवा प्रदान : याबाबत मार्क झुकरबर्ग म्हणाले की, यामुळं AI चा विस्तार करण्यास मदत होईल.झुकरबर्ग यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की,भारतातील पहिलं एआय डेटा सेंटर उभारण्यासाठी रिलायन्ससोबत भागीदारी केल्याचा आम्हाला अभिमान आहे. जामनगर येथे उभारलं जाणारे हे डेटा सेंटर, जागतिक एआय पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यास आणि भारतीय अर्थव्यवस्थेतील आमच्या गुंतवणुकीला अधिक बळकट करण्यास मदत करेल. रिलायन्स इंडस्ट्रीज या डेटा सेंटरला सेवा पुरवेल. या भागीदारीअंतर्गत, रिलायन्स इंडस्ट्रीज डेटा सेंटरच्या संपूर्ण सर्वसमावेशक सेवा प्रदान करेल. यामध्ये डेटा सेंटर डिझाइन, विकास, युटिलिटी व्यवस्थापन, नवीकरणीय ऊर्जा पुरवठा, नेटवर्क कनेक्टिव्हिटी आणि पूर्णपणे व्यवस्थापित परिचालन सेवांचा समावेश आहे.
रिलायन्सचं स्थान आणखी मजबूत : या भागीदारीअंतर्गत, रिलायन्स भारतातील हायपरस्केल एआय पायाभूत सुविधांसाठी प्रदाता म्हणून आपलं स्थान अधिक मजबूत करेल. ग्राहकांना एकाच कंपनीमार्फत सर्व प्रमुख डेटा सेंटर सेवा पुरवल्या जातील.
हे वाचलंत का :

