मेटा कंपनीनं सुरू केली AI आधारित वय ओळख प्रणाली; किशोरवयीनांसाठी कडक सुरक्षाव्यवस्था
मेटानं किशोरवयीन आणि 13 वर्षांखालील मुलांसाठी AI आधारित वय ओळख प्रणाली (AI Based Age Verification System) सुरू केलीय.

Published : May 6, 2026 at 1:26 PM IST
मुंबई : सोशल मीडियाच्या आघाडीच्या कंपनी मेटानं (Meta) किशोरवयीन आणि 13 वर्षांखालील मुलांना प्लॅटफॉर्मवरून रोखण्यासाठी नवीन AI-आधारित साधन विकसित (AI Based Age Verification System) केले आहे. हे साधन वापरकर्त्यांच्या फोटो आणि व्हिडिओचे विश्लेषण करून त्यांचं खरे वय शोधण्यास मदत करेल. यामुळं जे वापरकर्ते खोटं वय दाखवून प्लॅटफॉर्मचा वापर करतात, त्यांना ओळखणं सोपं होणार आहे.
AI व्हिज्युअल अॅनालिसिस: नवीन तंत्रज्ञान मेटानं आपल्या न्यूज रूम पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे. कंपनीनं ‘AI Visual Analysis’ नावाचं हे नवीन साधन विकसित केले आहे. हे चेहरा ओळखणारं तंत्रज्ञान (Facial Recognition) नाही, तर फक्त वय संबंधित संकेतक (cues) शोधतं. उंची, हाडांची रचना, शरीराची घडण इत्यादी घटकांच्या आधारे वयाचा अंदाज बांधला जातो. हे विश्लेषण केवळ एकट्यानं वापरलं जात नाही. त्याची पुष्टी संदर्भात्मक माहिती (comments, captions, इंटरॅक्शन) यांच्याशी करून घेतली जाते. यामुळं चुकीचे निष्कर्ष टाळले जातील. जर प्रणाली चुकीचे ओळखल्यास वापरकर्ता आयडी सादर करून आपलं वय सिद्ध करू शकतो. मेटाच्या नियमांनुसार 13 वर्षांखालील कोणालाही फेसबुक किंवा इन्स्टाग्राम वापरता येणार नाही. 13 ते 17 वर्षे वयोगटातील वापरकर्त्यांना आपोआप ‘Teen Account’ मध्ये ठेवले जाईल. या खात्यात अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था असतील आणि वयानुरूप अनुभव उपलब्ध होईल.
आंतरराष्ट्रीय विस्तार : पूर्वी ही स्वयंचलित ‘Teen Account’ प्रणाली केवळ इन्स्टाग्रामवर ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्रिटन आणि अमेरिकेत उपलब्ध होती. आता ती युरोपियन युनियनच्या 27 देशांमध्ये आणि ब्राझीलमध्ये विस्तारित करण्यात येत आहे. तसंच प्रथमच फेसबुकवरही अमेरिकेत ही सुविधा सुरू होत आहे. युरोपियन युनियन आणि ब्रिटनमधील फेसबुक वापरकर्त्यांना जून महिन्यापासून ही सुविधा मिळणार आहे. मेटा गेली अनेक वर्षे किशोरवयीन वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करत आहे. नवीन AI तंत्रज्ञानामुळं ही प्रक्रिया अधिक अचूक आणि प्रभावी होणार आहे.
हे वाचलंत का :

