ETV Bharat / technology

महिंद्रा उदो : महिंद्रा यूडीओ ई ऑटो लाँच, 200 किमी रेंजसह विमानासारखं डिझाइन

महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटीने ‘उदो’ नावाचा पूर्णतः इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा लाँच केला आहे. विमानासारख्या डिझाइनचा हा ‘ऑटोप्लेन’ 200 किमी रेंज, पायलट सीटसह येतो.

Mahindra UDO e Auto,  UDO e Auto
महिंद्रा उदो (Mahindra)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : February 13, 2026 at 10:01 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई: महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटीनं इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा ‘उदो’ लाँच केला (Mahindra UDO e Auto) आहे. विमानाच्या डिझाइननं प्रेरित असलेला हा ‘ऑटोप्लेन’ 200 किमी रेंज, चालक, प्रवाशांसाठी विविध सुविधा घेऊन लॉंच झाला आहे. या ऑटोची प्रारंभिक किंमत फक्त 3.59 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.

आकर्षक डिझाइन
पारंपरिक ऑटो रिक्षांचे डिझाइन गेल्या अनेक दशकांत फारसं बदलेलं नाही, पण महिंद्रा उदोचं डिझाइन पूर्णपणे वेगळं आहे. ‘UDO’ ( UDO e Auto ) शब्दातचा अर्थ मराठी आणि हिंदीत ‘उडणे’ असा अर्थ होतो. त्यानुसार या ऑटोला विमानासारखा आकार दिला आहे. आकर्षक हेडलॅम्प्स, स्टायलिश मिरर, मोठी विंडशील्ड आणि एरोडायनामिक बॉडी यामुळं उदो रस्त्यावर सर्वांच लक्ष वेधून घेतोय. या ऑटोला पहिल्यांदाच फुल मोनोकोक बॉडी वापरली असून यामुळं त्याला अधिक मजबती आणि स्थिरता मिळते.

‘पायलट’ स्तरावरील आराम
ऑटो चालकांना दिवसभरात अनेक तास बसावं लागतं, त्यामुळं थकवा हा मोठा प्रश्न असतो. महिंद्रा उदो यावर उपाय म्हणून चालकाला ‘पायलट सीट’ देतं. ही सीट सामान्य ऑटो सीटपेक्षा जवळपास 20 टक्के जाड आहे. यात प्रवाशांसाठीही भरघोस जागा (space) आहे. प्रवाशासाठी यात अधिक लेग रूम आणि हेड रूम, रुंद सीटिंग, इंडिपेंडंट रियर सस्पेन्शन आणि ड्युअल फोर्क फ्रंट सस्पेन्शनमुळं खडबडीत रस्त्यावरही मऊ राइड मिळते.

200 किमी खरी रेंज आणि दमदार परफॉर्मन्स
उदो 11.7 किलोवॅट तास क्षमतेच्या IP67 रेटेड लिथियम-आयन बॅटरीवर (UDO ) चालतो. हा ऑटो 200 किमी तर ARAI प्रमाणित 255 किमी रेंज देतो.10 किलोवॅट पीक पॉवर आणि 52 एनएम टॉर्क देणाऱ्या PMS मोटरसह तीन ड्राइव्ह मोड रेंज, राइड आणि रेस मिळताय.रेस मोडमध्ये कमाल वेग 55 किमी/तास मिळतो, ज्यामुळं चालक दिवसाला अधिक ट्रिप पूर्ण करून जास्त कमाई करू शकतात.

शहरातील वाहतुकीसाठी स्मार्ट सुविधा
उदोमध्ये अनेक सेगमेंट-फर्स्ट फीचर्स आहेत.रिव्हर्स थ्रॉटल, क्रिप मोड (ट्रॅफिकमध्ये सोयीस्कर), हिल होल्ड असिस्ट ,रिजेनरेटिव्ह ब्रेकिंग या सुविधांमुळं शहरातील स्टॉप-गो ट्रॅफिकमध्ये चालकाचा ताण कमी होतो.

सुरक्षेला प्राधान्य
उदोमध्ये मजबूत ड्रम ब्रेक्स, 30.48 सेंमी ट्यूबलेस टायर्स आणि IP67 संरक्षण असल्यानं धूळ किंवा खराब हवामानातही चांगली रेंज मिळते. महिंद्रा 6 वर्षे किंवा 1.5 लाख किमी वॉरंटी आणि 1 लाख किमीपर्यंत मोफत सर्व्हिसिंग देते. तसंच उदय नेक्स्ट योजने अंतर्गत 20 लाखांपर्यंत अपघाती विमा आणि इतर लाभ आपोआप मिळतात. भारत हा जगातील सर्वात मोठा इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर बाजार आहे. महिंद्रा उदो केवळ स्वस्त ऑटो नसून चालक आणि प्रवाशांचा आराम आणि कार्यक्षमतेवर भर देतो. झहीराबाद प्लांटमध्ये रोबोटिक उत्पादन लाइन आणि ऑटोमेटेड बॅटरी असेंब्लीद्वारे तयार होणारा उदो शहरातील ऑटो रिक्षांचे स्वरूप बदलण्याची शक्यता आहे.

हे वाचलंत का :

  1. टाटा कर्व्ह ईव्ही 2026 : स्टायलिश एसयूव्ही-कूपे डिझाइनसह येणार प्रीमियम इलेक्ट्रिक कार
  2. एप्रिलिया RS 457 आणि Tuono 457 MY26 मॉडेल्स लाँच: GST 2.0 नंतर किंमतीत मोठी कपात, नवीन रंग पर्याय
  3. दुबईमध्ये चालकविरहित टॅक्सी सुरू, 40 हून अधिक विशेष सेन्सर्स