ETV Bharat / technology

लावा लवकरच भारतात लाँच करणार नवीन स्मार्टफोन : मागील बाजूस आयताकृती दुय्यम डिस्प्ले

लावा भारतात लवकरच नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. टीझरमध्ये मागील बाजूस आयताकृती दुय्यम डिस्प्ले, कॅमेरा आयलंडमध्ये 50MP एआय कॅमेर्‍यासह दिसतो.

Lava
लावाचा नविन फोन (Lava)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : January 9, 2026 at 5:19 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : देशांतर्गत स्मार्टफोन ब्रँड लावा भारतात एक नवीन हँडसेट लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीनं नुकताचं X (पूर्वीचे ट्विटर) या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर आगामी स्मार्टफोनचं टीझर शेअर केलं आहे. या टीझरमध्ये फोनच्या मागील बाजूचे एक खास डिझाइन दिसतंय. हा फोन दुहेरी रियर कॅमेर्‍यासह येणार असून, त्यात 50 मेगापिक्सेल AI कॅमेरा सेटअप असल्याचंही सूचित केलं आहे. लाँच डेट अजून जाहीर झालेली नाही, मात्र “लवकरच येत आहे” असं कंपनीनं म्हटलं आहे.

आगामी लावा स्मार्टफोनचे प्रमुख डिझाइन वैशिष्ट्य
टीझर इमेजमध्ये फोनच्या मागील पॅनेलवर आयताकृती दुय्यम स्क्रीन स्पष्ट दिसते, जी कॅमेरा आयलंडचा भाग बनलेली आहे. या आयलंडमध्ये दोन मोठे लेन्स रिंग्स आहेत, जे ड्युअल रियर कॅमेर्‍याचे संकेत देतात. पॅनेलवर embossed अक्षरांमध्ये “50MP AI Camera” असा उल्लेख आहे. फोनचा कडा गोलाकार परंतु तीक्ष्ण आहेत, तर कॅमेरा डेको थोडा उंचावलेला दिसतो. उजव्या बाजूला कोणतंही बटण दिसत नाहीत, यामुळं पॉवर आणि व्हॉल्यूम बटण्स डाव्या बाजूला असण्याची शक्यता आहे. हे डिझाइन Xiaomi च्या काही प्रीमियम मॉडेल्स (जसं Mi 11 Ultra) आठवण करून देतो, ज्यात मागील बाजूस दुय्यम डिस्प्ले आणि हाय-ब्राइटनेस स्क्रीन असते.

मागील मॉडेल्समध्ये दुय्यम डिस्प्लेची परंपरा
लावा गेल्या काही वर्षांत दुय्यम डिस्प्लेसह स्मार्टफोन्स आणत आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये लाँच झालेल्या Lava Agni 3 मध्ये 1.74 इंच AMOLED रियर डिस्प्ले आहे. तर डिसेंबर 2024 मधील Lava Blaze Duo मध्ये 1.58 इंच (228x460 पिक्सेल) AMOLED रियर स्क्रीन आहे, जी 336ppi पिक्सेल डेन्सिटी देते. या दोन्ही फोन्समध्ये दुय्यम डिस्प्लेचा उपयोग खूपच व्यावहारिक आहे. याच्या मदतीनं वापरकर्ते रियर कॅमेर्‍यानं सेल्फी काढू शकतात, म्युझिक प्लेबॅक कंट्रोल करू शकतात, टायमर किंवा अलार्म सेटिंग्ज बदलू शकतात आणि इतर क्विक अ‍ॅक्सेस फीचर्स वापरू शकतात. नवीन मॉडेलमध्येही असेच किंवा त्याहून अधिक फीचर्स अपेक्षित आहेत, विशेषतः आयताकृती आकारामुळं स्क्रीनचं वापर क्षेत्र वाढू शकतं.

अपेक्षित वैशिष्ट्ये आणि बाजारातील स्थान
हा नवीन फोन मिड-रेंज किंवा बजेट प्रीमियम सेगमेंटमध्ये येऊ शकतो, कारण लावानं अलीकडे Agni आणि Blaze मालिकेत असे इनोव्हेटिव्ह फीचर्स दिले आहेत. 50MP AI कॅमेर्‍यामुळं फोटोग्राफीवर विशेष भर असल्याचं दिसतं. दुय्यम डिस्प्ले हा युनिक सेलिंग पॉइंट ठरू शकतो, कारण भारतीय बाजारात असे फीचर्स असलेले फोन फारच कमी आहेत. लावा आपल्या “मेक इन इंडिया” धोरणामुळं लोकप्रिय आहे आणि आता डिझाइनमध्येही इनोव्हेशन आणत आहे. हा फोन लाँच झाल्यावर बजेट सेगमेंटमध्ये Xiaomi, Realme आणि Samsung ला टक्कर देऊ शकतो.

हे वाचलंत का :

  1. विवो X200T भारतात लवकरच लाँच होणार: दमदार स्पेसिफिकेशन्स लीक
  2. Realme 16 Pro vs Motorola Edge 60 Pro : 30 हजाराच्या सेगमेंटमध्ये कोणता स्मार्टफोन उत्तम?
  3. ओप्पो रेनो 15 मालिका भारतात लॉंच प्रो मिनी मॉडेलसह तीन व्हेरिएंट्स