ETV Bharat / technology

जिओहॉटस्टारची जागतिक झेप! युके, कॅनडा आणि सिंगापूरमध्ये आंतरराष्ट्रीय स्ट्रीमिंग सेवा सुरू

जिओहॉटस्टारनं युके, कॅनडा आणि सिंगापूरमध्ये आपली आंतरराष्ट्रीय स्ट्रीमिंग सेवा सुरू केली असून एक लाख साठ हजार तासांपेक्षा जास्त भारतीय कंटेंट जागतिक प्रेक्षकांसाठी उपलब्ध झाला आहे.

JioHotstar
JioHotstar (Jio)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : September 2, 2026 at 12:58 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : बुधवारी जिओहॉटस्टारनं युनायटेड किंगडम, कॅनडा आणि सिंगापूरमध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय स्ट्रीमिंग सेवेची घोषणा केली. ही भारताबाहेरची पहिली मोठी कंपनीची झेप असून जागतिक मनोरंजन प्लॅटफॉर्म बनण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल आहे. दक्षिण आशियाई डायस्पोरासोबतच विविध भाषा आणि संस्कृतींमध्ये रुची असणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना आकर्षित करण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे.

मोठी कंटेंट लायब्ररी : नवीन सेवेद्वारे या तीन देशांतील प्रेक्षकांना 12हून अधिक भाषांमधील आणि विविध शैलींमधील 1 लाख 60 हजार तासांपेक्षा जास्त कंटेंट उपलब्ध होणार आहे. टेलिव्हिजन मालिका, चित्रपट, प्रादेशिक कार्यक्रम, नॉन-फिक्शन, बालकार्यक्रम आणि अॅनिमे अशा सर्व प्रकारच्या सामग्रीला एकाच प्लॅटफॉर्मवर आणलं जाणार आहे.

वैयक्तिक अनुभव आणि सुविधा : आंतरराष्ट्रीय ऑफरमध्ये भारतीय मनोरंजनासोबत वैयक्तिक शिफारसी, इंटरॅक्टिव्ह फीचर्स, लवचिक सदस्यता पर्याय आणि वापरकर्ता-केंद्रित अनुभव एकत्रित केला आहे. प्रेक्षकांना सोयीस्कर आणि आकर्षक स्ट्रीमिंग अनुभव देण्यावर भर दिला जाणार आहे.

नवीन कंटेंटची भर : कंपनी दरवर्षी 30 हजार तासांपेक्षा जास्त नविन कंटेंट जोडणार आहे. आंतरराष्ट्रीय लॉंच स्लेटमध्ये नवीन ओरिजिनल्स, ब्लॉकबस्टर चित्रपटांचे प्रीमियर आणि लोकप्रिय टेलिव्हिजन फ्रँचायझींचा समावेश आहे. यामुळं प्रेक्षकांना सतत नवीन आणि रोमांचक सामग्री मिळत राहील.

लक्ष्य प्रेक्षक आणि भविष्यातील योजना : ही सेवा प्रामुख्यानं दक्षिण आशियाई समुदायाला लक्ष्य करत असली, तरी विविध भाषा, कथा आणि संस्कृतींमध्ये रुची असणाऱ्या व्यापक आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांनाही आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. जिओहॉटस्टार जागतिक स्तरावर भारतीय कथांकथन आणि मनोरंजनाला नवी उंची देण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे.

हे वाचलंत का :

  1. नथिंग फोनची किंमत पुन्हा वाढली! फोन (4a), (4a) Pro आणि (4b) च्या नव्या किंमती तपासा!
  2. Vivo T5 5G : भारतात 50MP कॅमेरा आणि 7,050mAh बॅटरीसह लाँच...
  3. ॲपलचे नवीन सीईओ जॉन टर्नस यांची 'X' वर दमदार एन्ट्री! सुरुवात एका साध्या 'हॅलो'नं