Java 42 FJ All Stars : सहा नवीन रंगांसह भारतात लाँच!
जावा येझदी मोटरसायकल्सनं Java 42 FJ All Stars रेंज सहा नवीन रंगांसह भारतात लाँच केली. तीची किंमत 2,01,942 ते 2,15,942 रुपये आहे.

Published : August 28, 2026 at 5:33 PM IST
मुंबई : जावा येझदी मोटरसायकल्सनं Java 42 FJ All Stars रेंज भारतात लाँच केली आहे. या निओ-क्लासिक रोडस्टरसाठी सहा नवीन रंग पर्याय सादर करण्यात आले आहेत. तीची किंमत 2,01,942 रुपयांपासून सुरू होऊन 2,15,942 रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत आहेत. हे अपडेट मुख्यतः स्टायलिंगवर केंद्रित आहे. इंजिन, चेसिस आणि मुख्य इक्विपमेंटमध्ये कोणताही बदल नाही. जावा ऑल स्टार्स या नवीन इनिशिएटिव्हचा भाग म्हणून ही रेंज आली आहे.

सहा आकर्षक रंग आणि किंमती : जावा 42 एफजे ऑल स्टार्स हे ऑल स्टार्स अरोरा ग्रीन, ऑल स्टार्स रेड, ऑल स्टार्स मॅट ब्लॅक विथ रेड क्लॅड, ऑल स्टार्स मॅट ब्लॅक विथ ब्लॅक क्लॅड, ऑल स्टार्स नेबुला ब्लू आणि ऑल स्टार्स क्रोम या रंगांमध्ये उपलब्ध आहे. अरोरा ग्रीन आणि रेड हे एंट्री पॉइंट्स असून तीची किंमत 2,01,942 रुपये आहे. दोन्ही मॅट ब्लॅक व्हर्जन्स आणि नेबुला ब्लू प्रत्येकी 2,07,942 रुपये आहे. क्रोम फिनिश सर्वात महाग असून त्याची किंमत 2,15,942 रुपये आहे. या रंगांमुळं खरेदीदारांना अधिक पर्याय मिळाले.
Every mark has a story behind it.
— Jawa Motorcycles (@jawamotorcycles) August 26, 2026
The choices no one sees.
The standards you quietly hold.
The roads you choose when there’s an easier one.
Over time, these become more than choices.
They become a code.
And now, that code has a mark of its own.
Launching strike one - Jawa All… pic.twitter.com/doH9CmRm6z
निओ-क्लासिक डिझाइन आणि प्रीमियम लुक : बाईक जावा 42 एफजेचं निओ-क्लासिक डिझाइन तेचं आहे. यात रेट्रो-प्रेरित प्रमाण आणि स्पोर्टी स्टान्स यांचा संगम आहे. ब्रश्ड अॅल्युमिनियम फ्युएल-टँक पॅनेल्स हे प्रमुख वैशिष्ट्य असून बाईकाला प्रीमियम लुक देतं. क्रोम एडिशन पारंपरिक आणि चमकदार फिनिश शोधणाऱ्यांसाठी आकर्षक आहे. अरोरा ग्रीन, रेड आणि नेबुला ब्लू रंगाचा पर्याय आहे.
334 सीसी इंजिन : जावा 42 एफजे ऑल स्टार्समध्ये कोणताही मेकॅनिकल बदल नाही. 334 सीसी लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलेंडर डीओएचसी अल्फा2 इंजिन कायम आहे. हे 7,500 आरपीएमवर 29.17 पीएस पॉवर आणि 5,500 आरपीएमवर 29.62 न्यूटन-मीटर टॉर्क देतं. सिक्स-स्पीड गिअरबॉक्स आणि इलेक्ट्रॉनिक फ्युएल इंजेक्शन सिस्टमद्वारे पॉवर मागील चाकाकडं जातं. डबल-क्रॅडल फ्रेमवर बांधलेली ही बाईक 41 मिमी टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि गॅस-फिल्ड ट्विन रियर शॉक अॅब्झॉर्बर्स वापरतं, ज्यात फाइव-स्टेप प्रिलोड अॅडजस्टमेंट आहे. ब्रेकिंगसाठी 320 मिमी फ्रंट डिस्क आणि 240 मिमी रियर डिस्क आहेत, ज्यात ड्युअल-चॅनल एबीएस स्टँडर्ड आहे.

स्पेसिफिकेशन्स आणि मालकी हमी : फ्रंट टायर 100/90-18 आणि रियर 140/70 आर17 आहे. ग्राउंड क्लिअरन्स 178 मिमी, सीट हाईट 790 मिमी आणि कर्ब वेट 184 किलो आहे. तसंच ऑल-एलईडी लाइटिंग आणि फुली डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर याचा देखील समावेश आहे. जावाच्या ओनरशिप अॅश्युरन्स प्रोग्राममध्ये चार वर्षे/50,000 किमी स्टँडर्ड वॉरंटी, सहा वर्षांपर्यंत ऐच्छिक एक्स्टेंडेड वॉरंटी आणि आठ वर्षांपर्यंत रोडसाइड असिस्टन्स मिळतं.
हे वाचलंत का :

