iQOO Neo 10 नवीन रंगांत उद्या होणार लॉंच; Alpine White आणि Black कलर ऑप्शन्सची घोषणा
iQOO Neo 10 च्या नवीन Alpine White आणि Black रंगांच्या आवृत्त्या भारतात 30 एप्रिलला Alpine White लाँच करण्याची घोषणा केली आहे.

Published : April 29, 2026 at 10:54 AM IST
मुंबई : iQOO Neo 10 स्मार्टफोन नवीन रंगाच्या पर्यायांसह भारतात लवकरच दाखल होणार आहे. विवोच्या सब-ब्रँड iQOO नं X (ट्विटर) वरुन दिलेल्या माहितीनुसार, 30 एप्रिल रोजी Alpine White कलर व्हेरिएंट लाँच करण्यात येणार आहे. यापूर्वी कंपनीनं Black कलर ऑप्शनचीही टीझिंग केली आहे.
The ultimate #PowerToWin launching in a ‘NEO’ avatar! Stay tuned for more. #BYD #iQOONeo10 pic.twitter.com/YFkKIzDrzZ
— Nipun Marya (@nipunmarya) April 28, 2026
iQOO Neo 10 नवीन कलरवेज : iQOO आणि iQOO India चे CEO Nipun Marya यांनी X वरुन एक पोस्टर शेअर करत Alpine White कलरमध्ये फोन दाखवला आहे. या नवीन रंगांसोबत Inferno Red आणि Titanium Chrome हे दोन रंग आधीपासूनच उपलब्ध आहेत. हा फोन आता Alpine White आणि Black रंगात येईल.
iQOO Neo 10 : मे 2025 मध्ये लाँच झालेल्या iQOO Neo 10 मध्ये Snapdragon 8s Gen 4 प्रोसेसर, 7,000mAh क्षमतेची मोठी बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा, 32-मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आणि IP65 रेटिंग देण्यात आली आहे.
iQOO Neo 10 मुख्य वैशिष्ट्ये (Specifications): या फोनमध्ये 6.78 इंच 1.5K AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन 144Hz रिफ्रेश रेट, 5,500 निट्स पीक ब्राइटनेस देतो. प्रोसेसरबाबत बोलायचं झाल्यास यात Snapdragon 8s Gen 4 + Q1 गेमिंग चिपसेट वापण्यात आला आहे. हा फोन 8GB पर्यंत 16GB LPDDR5X RAM + 128GB ते 512GB UFS 4.1 रॅम आणि स्टोरेज पर्यात उपलब्ध असेल.
iQOO Neo 10 कॅमेरा: मागील बाजूस 50MP Sony IMX882 मुख्य + 8MP अल्ट्रावाइड रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीप्रेमींसाठी यात 32MP चा कॅमेरा आहे.
iQOO Neo 10 बॅटरी: फोनला पॉवर देण्यासाठी 7,000mAh + 120W वायर्ड चार्जिंगचा मोठा सपोर्ट देण्यात आला आहे. तसंच फोनला थंड ठेवण्यासाठी 7,000mm² व्हेपर चेंबर कूलिंग मिळणार आहे. पाणी आणि धूळीपासून बचावासाठी फोनला IP65 डस्ट आणि स्प्लॅश रेझिस्टंट रेटींग मिळालं आहे.
- किंमत (Pricing)
8GB + 128GB: 34,999
16GB + 512GB:43,999
नवीन Alpine White व्हेरिएंटची किंमतही याच श्रेणीत राहण्याची शक्यता आहे.
हे वाचलंत का :

