iQOO 15R भारतात लॉंच: 200MP कॅमेरा आणि 7600mAh बॅटरीसह 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट!
iQOO 15R भारतात लॉंच झालाय. यात Snapdragon 8 Gen 5 प्रोसेसर, 200MP कॅमेरा, 7600mAh बॅटरी आणि 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

Published : February 24, 2026 at 12:35 PM IST
मुंबई: भारतीय प्रीमियम स्मार्टफोन बाजारात iQOO कंपनीनं आज, 24 फेब्रुवारी 2026 रोजी आपला नवीन iQOO 15R स्मार्टफोन लॉंच केला आहे. हा फोन फ्लॅगशिप-लेव्हल परफॉर्मन्स, जबरदस्त गेमिंग फीचर्स आणि दीर्घ बॅटरी लाइफसह येतो. कंपनीनं हा स्मार्टफोन 'सब-फ्लॅगशिप' म्हणून सादर केला आहे. iQOO 15R स्मार्टफोनचा AnTuTu स्कोअर 3.58 दशलक्षांपेक्षा जास्त असल्यानं तो बाजारातील सर्वात शक्तिशाली पर्यायांपैकी एक आहे.

किंमत आणि उपलब्धता
हा फोन भारतात तीन व्हेरिएंटमध्ये लॉंच झाला आहे. iQOO 15R च्या 8GB + 256 GB व्हेरिएंटची किंमत 44,999 आहे. 12GB + 256 GB व्हेरिएंटची किंमत 47,999 आहे, तर टॉप 12GB + 512 GB व्हेरिएंटची व्हेरिएंटची किंमत 52,999 रुपये आहे. कंपनीनं या स्मार्टफोनचा सेगमेंटमध्ये सर्वोत्तम परफॉर्मन्स देणारा फोन म्हणून प्रचार केला आहे. हा फोन Amazon आणि iQOO अधिकृत स्टोअर्सवर उपलब्ध होणार आहे. रंग पर्यायांमध्ये Dark Knight आणि Triumph Silver उपलब्ध आहेत. लॉंच ऑफर्स आणि बँक डिस्काउंट्समुळं किंमत आणखी होतेय.

| Variant | Original Price | Discounted Price |
| 8GB + 256GB | Rs 44,999 | Rs 40,999 |
| 12GB + 256GB | Rs 47,999 | Rs 43,999 |
| 12GB + 512GB | Rs 52,999 | Rs 48,999 |
परफॉर्मन्स आणि गेमिंग
iQOO 15R मध्ये Qualcomm चा नवीन Snapdragon 8 Gen 5 ऑक्टा-कोर प्रोसेसर (Snapdragon 8 Gen 5 processor) आहे, जो 12 जीबी LPDDR5X RAM सोबत येतो. याशिवाय Supercomputing Chip Q2 चा समावेश आहे, जो फ्रेम इंटरपोलेशन तंत्रज्ञानासह BGMI सारख्या गेम्समध्ये 144fps पर्यंत स्मूथ गेमप्ले देतो. 6.59-इंचाचा 1.5K रिझोल्यूशन (1260x2750पिक्सेल) असलेला AMOLED डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेटसह येतो, ज्यामुळं गेमिंग आणि मल्टीमीडिया अनुभव उत्कृष्ट होतो. 6.5K IceCore VC कूलिंग सिस्टीममुळं दीर्घ गेमिंग सेशनमध्येही फोन गरम होत नाही.


कॅमेरा सेटअप
कॅमेरा विभागात iQOO 15R मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. मुख्य 200 मेगापिक्सेलचा वाइड-एंगल सेन्सर हाय-डिटेल फोटो आणि क्रॉपिंगसाठी उत्तम आहे. सोबत 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड लेन्स आहे. फ्रंटमध्ये 32 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असून, तो 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो आणि कमी प्रकाशात स्क्रीन फ्लॅश फीचर देतो.

बॅटरी आणि चार्जिंग
बॅटरी विभागात हा फोन सेगमेंटमध्ये अव्वल ठरतो. 7600mAh ची मोठी सिलिकॉन-कार्बन बॅटरी एका चार्जवर दोन दिवसांपर्यंत चालते, असा कंपनीचा दावा आहे. 100 वॅट Super Flash Charge सपोर्टमुळं फोन लवकर चार्ज होतो. फोनची जाडी फक्त 7.9 mm आहे, ज्यामुळं फोनला हँडल करणं सोपं जातं.


सॉफ्टवेअर आणि इतर फीचर्स
iQOO 15R Android 16 वर आधारित FunTouch OS 16 (जागतिक स्तरावर OriginOS 6) सह येतो. कंपनी चार वर्षांचे प्रमुख OS अपडेट्स आणि सहा वर्षांचे सुरक्षा पॅचेस देण्याचे आश्वासन देते. IP68 आणि IP69 रेटिंगमुळं फोन पाणी आणि धूळ प्रतिरोधक आहे.या फोनमध्ये अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरही मिळतोय. एकंदरीत, iQOO 15R हा गेमर्स, पावर युजर्स आणि बजेटमध्ये फ्लॅगशिप अनुभव हव्या असणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे.

| Features | Details |
| Display | 144Hz | xx-inch AMOLED |
| Processor | Snapdragon 8 Gen 3 |
| RAM + storage | 8GB + 256GB |
| 12GB + 256GB | |
| 12GB + 512GB | |
| Rear camera | 50MP (main) + 8MP (ultra-wide) |
| Front camera | 32MP |
| Battery | 7,600mAh |
| Charging capacity | 100W FlashCharge |
| Operating System (OS) | OriginOS 6 based on Android 16 |
| OS update | 4 years OS upgrade | 6 years security updates |
हे वाचलंत का :

