ETV Bharat / technology

मुलानं आत्महत्याशी संबंधित शब्द सर्च केल्यास पालकांना मेटा पाठवणार अलर्ट

मेटानं इंस्टाग्रामवर किशोरवयीन मुलांच्या आत्महत्याशी (Instagram harm Alert) संबंधित वारंवार शोधांवर पालकांना अलर्ट पाठवण्याचं नवीन सुरक्षा वैशिष्ट्य जाहीर केलं आहे.

Instagram
इंस्टाग्राम (Etv Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : February 27, 2026 at 4:48 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : मेटा कंपनीनं इंस्टाग्रामवर किशोरवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वाचं नवीन वैशिष्ट्य जाहीर केलं आहे.एखाद्या किशोरवयीन मुलानं अल्प कालावधीत आत्महत्या (self harm) किंवा संबंधित शब्द वारंवार शोधण्याचा प्रयत्न केला, तर पालकांना सूचना (अलर्ट) पाठवली (Instagram self harm Alert ) जाणार आहे. हे वैशिष्ट्य इंस्टाग्रामच्या पालक पर्यवेक्षण (parental supervision) साधनांचा भाग आहे. कंपनीनं सांगितलं की, हा निर्णय पालकांना सावध करण्यासाठी घेतला जात आहे. हे अलर्ट पुढील आठवड्यात सुरू होणार असून, सुरुवातीला अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये रोलआउट होईल. इतर देशांमध्येही ते नंतर लागू केलं जाईल.

अलर्ट कसं कार्य करतं?
मेटाच्या म्हणण्यानुसार, पालक आणि किशोरवयीन मुलांना पुढील आठवड्यात नवीन अलर्ट सुरू झाल्याची माहिती (Instagram harm Alert) मिळेल. जर किशोरवयीन मुलानं आत्महत्येला प्रोत्साहन देणारी वाक्ये, स्वत:ला इजा पोहोचवण्याची इच्छा दर्शवणारी वाक्ये किंवा 'suicide' किंवा 'self-harm' सारखे शब्द वारंवार शोधले, तर पालकांना अलर्ट पाठवला जाईल. हा अलर्ट ईमेल, एसएमएस (टेक्स्ट मेसेज), व्हॉट्सअ‍ॅप किंवा इंस्टाग्राम अ‍ॅपद्वारे पाठवला जाईल. अलर्ट आल्यानंतर पालकांना किती वेळा मुलानं असे शब्द शोधले याची माहिती दिली जाईल. तसंच, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पालकांना मुलाशी संवेदनशील संवाद साधण्यासाठी संसाधनं (resources) उपलब्ध करून दिली जातील. कंपनीनं स्पष्ट केलं की, एकदा किंवा दोनदा शोध घेतल्यास अलर्ट येणार नाही; फक्त वारंवार आणि संशयास्पद शब्द सर्च केल्या अलर्ट पाठवला जाणार आहे, जेणेकरून पालकांना अनावश्यक सूचना येणार नाहीत.

किशोर सुरक्षेसाठी व्यापक उपाय
इंस्टाग्राम आधीपासूनच आत्महत्येला प्रोत्साहन देणारा कंटेंट ब्लॉक करतंय. किशोरवयीन अकाउंट्सवर असे कंटेंट दिसत नाही. अशा शोधांवर ब्लॉक लावून वापरकर्त्यांना मानसिक आरोग्य संसाधनं आणि स्थानिक हेल्पलाइन मागर्दशकाकडं पाठवलं जाईल.कंपनीनं सांगितलं की, तात्काळ धोका वाटल्यास आपत्कालीन सेवांशी संपर्क साधला जाईल. हे नवीन वैशिष्ट्य मेटाच्या किशोर सुरक्षेच्या व्यापक प्रयत्नांचा भाग आहे.

एआयसाठीही लवकरच अलर्ट
हे अलर्ट सुरुवातीला फक्त इंस्टाग्रामच्या शोध (search) साठी लागू होतील. कंपनीनं सांगितलं की, आता अनेक किशोरवयीन मुलं एआय टूल्सकडून मदत घेतात, त्यामुळं एआयशी झालेल्या काही संवादांवरही पालकांना सूचना देण्याचं वैशिष्ट्य विकसित केलं जात आहे. एआय प्रणाली आधीपासूनच सुरक्षित प्रतिसाद देतात आणि संसाधनं पुरवतात, पण लवकरच एआय संवादांवरही अलर्ट येणार आहेत. याबाबत अधिक माहिती येणाऱ्या महिन्यांत दिली जाईल.

हे वाचलंत का :

  1. गुगलचे नवीनतम एआय इमेज जनरेशन मॉडेल, नॅनो बनाना 2 लाँच
  2. 'फोन पे, गुगल पे'चं धाब दणाणलं : अ‍ॅपल पे लवकरच भारतात होणार लाँच
  3. 1 मार्च 2026 पासून स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या कोणते स्मार्टफोन होणार महाग?