इंस्टाग्रामची सर्वात प्रतीक्षित सुविधा: प्रोफाइल ग्रिड रिअरेंज
इंस्टाग्रामने सर्वात प्रतीक्षित फीचर आणले आहे, आता युजर्स प्रोफाइल ग्रिडमध्ये पोस्ट्सची मोकळेपणाने पुनर्रचना करू शकतात.

Published : June 9, 2026 at 12:33 PM IST
मुंबई : इंस्टाग्रामनं युजर्ससाठी एक मोठी सुविधा रोलआउट केली आहे. आता युजर्स आपल्या प्रोफाइलवरील पोस्ट्सची व्यवस्था बदलू शकतात. मूळ पोस्टिंग तारखा किंवा कंटेंट प्रभावित न होता ग्रिड पूर्णपणे रिअरेंज करता येईल. ही सुविधा प्रोफाइलचा सौंदर्य आणि अॅस्थेटिक्स राखण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
प्रोफाइल ग्रिड रिअरेंज फीचर कसे वापरावे?: या नवीन “Reorder Grid” फीचरचा वापर करणे अतिशय सोपं आहे.
1. आपल्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर जा.
2. कोणत्याही पोस्टवर प्रेस अँड होल्ड करा.
3. पॉप-अप मेन्यूमध्ये नवीन “Reorder Grid” पर्याय निवडा.
4. पोस्ट्स ड्रॅग अँड ड्रॉप करून इच्छित क्रमाने व्यवस्थित करा.
क्रिएटर्ससाठी फादेशीर सुविधा : बदल लगेच सेव्ह होतात आणि प्रोफाइलला भेट देणाऱ्या प्रत्येकाला नवीन व्यवस्था दिसते. इंस्टाग्रामचे प्रमुख आदम मोसेरी यांनी जवळपास एक वर्षापूर्वी या फीचरवर काम सुरू असल्याची माहिती दिली होती. युजर्सकडून सतत मागणी येत असल्यानं मेटानं यावर बराच काळ काम केलं होतं. ही सुविधा विशेषतः क्रिएटर्स, फोटोग्राफर्स, आर्टिस्ट्स, ब्रँड्स आणि छोट्या व्यवसायांसाठी फायद्याची ठरेल.
प्रोफाइल रिफ्रेश करणं झालं सोपं : आता पोस्ट्सची तारीख विचारात न घेता त्यांना आपल्या पोर्टफोलिओ, स्टाइल किंवा मार्केटिंग गरजेनुसार व्यवस्थित करता येईल. नवीन प्रोजेक्ट किंवा कॅम्पेन लाँच करण्यापूर्वी प्रोफाइल रिफ्रेश करणे आता सोपं झालं आहं. सामान्य युजर्ससाठीही ही सुविधा उपयुक्त आहे. जुने कंटेंट डिलीट किंवा रिपोस्ट न करता प्रोफाइल अधिक आकर्षक आणि सुसंगत बनवता येईल. यामुळं इंस्टाग्राम इतर प्लॅटफॉर्म्सशी स्पर्धा करण्यात अधिक मजबूत होईल, जिथं प्रोफाइल कस्टमायझेशनला प्राधान्य दिलं जातं. ही सुविधा जगभरात हळूहळू उपलब्ध होत आहे आणि लवकरच सर्व युजर्सना मिळेल अशी अपेक्षा आहे.
हे वाचलंत का :

