ETV Bharat / technology

गूगल पिक्सेल 9 मालिकेला लवकरच अ‍ॅपलच्या एअरड्रॉपची सुसंगतता मिळणार

गूगल पिक्सेल 9 मालिका लवकरच अ‍ॅपलच्या एअरड्रॉपशी सुसंगत होणार आहे. क्विक शेअरद्वारे आयफोन-अँड्रॉइड फाइल शेअरिंग सोपं होईल.

Google Pixel 9 series,  Apple AirDrop
Google (Google)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : January 9, 2026 at 12:54 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : गूगलची पिक्सेल 9 मालिका लवकरच अ‍ॅपलच्या लोकप्रिय एअरड्रॉप सुविधेशी सुसंगत होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात गूगलनं घोषणा केली होती की, अँड्रॉइड आणि आयफोन वापरकर्ते आता क्विक शेअर आणि एअरड्रॉपच्या मदतीनं एकमेकांना सुरक्षितपणे वायरलेस फाइल्स शेअर करू शकतील, असा एक अहवाल समोर आला आहे. ही सुविधा सुरुवातीला फक्त नवीन पिक्सेल 10 मालिकेपुरती मर्यादित होती. मात्र, आता ही सुविधा पिक्सेल 9 मालिकेसाठीही विकसित होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

क्विक शेअरमध्ये एअरड्रॉप सपोर्टची तयारी
अँड्रॉइड अथॉरिटी या प्रकाशनानं टिपस्टर असेंबलडिबगच्या सहकार्यानं अँड्रॉइडच्या नवीनतम कॅनरी बिल्ड (ZP11.251212.007) ची सखोल तपासणी केली. या तपासणीत गूगलनं जोडलेल्या नवीन सिस्टीम फाइल्स आढळल्या, ज्या आयफोनमधून पिक्सेल 9 मालिकेतील फोनवर फाइल्स पाठवण्यासाठी क्विक शेअरला आवश्यक आहेत. या फाइल्स आधीच्या पिक्सेल 9 मालिकेच्या फर्मवेअरमध्ये नव्हत्या. मात्र, नॉन-फ्लॅगशिप पिक्सेल 9ए मॉडेलला ही सुविधा मिळण्याची शक्यता कमी आहे. प्रकाशनाला पिक्सेल 9 आणि आयफोनदरम्यान ही सुविधा प्रत्यक्षात कार्यरत आहे की नाही, याची चाचणी घेता आली नाही.या नवीन सिस्टीम फाइल्स फक्त पिक्सेल 9 मालिकेत आढळल्या असून, पिक्सेल 8 किंवा पिक्सेल 8 प्रो सारख्या जुन्या मॉडेल्समध्ये त्या नाहीत.

विस्तार आणि तंत्रज्ञान
नोव्हेंबरच्या घोषणे दरम्यान गूगलनं स्पष्ट केलं होतं की, ही सुविधा सुरुवातीला पिक्सेल 10 साठी आणली आहे, पण भविष्यात अधिक अँड्रॉइड डिव्हाइसेसना ती उपलब्ध करून दिली जाईल. मात्र, याबाबत निश्चित वेळापत्रक जाहीर केलं नव्हतं. आता पिक्सेल 9 साठी या फाइल्स दिसल्यानं ही सुविधा लवकरच अधिकृतपणे जाहीर होऊ शकते. ही सुविधा अँड्रॉइड आणि आयफोनव्यतिरिक्त आयपॅडओएस आणि मॅकोस डिव्हाइसेससोबतही कार्य करेल. क्विक शेअर एअरड्रॉपच्या ‘एव्हरीवन फॉर 10 मिनिट्स’ मोडचा वापर करतं. गूगलचे म्हणणे आहे की, ही सुविधा कोणत्याही वर्कअराऊंडऐवजी थेट पीअर-टू-पीअर कनेक्शनवर आधारित आहे.

हे वाचलंत का :

  1. विवो X200T भारतात लवकरच लाँच होणार: दमदार स्पेसिफिकेशन्स लीक
  2. Realme 16 Pro vs Motorola Edge 60 Pro : 30 हजाराच्या सेगमेंटमध्ये कोणता स्मार्टफोन उत्तम?
  3. ओप्पो पॅड 5 भारतात लाँच: नवीन टॅबलेटसह रेनो 15 सिरीज बाजारात