गुगलचे नवीनतम एआय इमेज जनरेशन मॉडेल, नॅनो बनाना 2 लाँच
गूगलनं सर्वोत्तम एआय इमेज जनरेशन मॉडेल नॅनो बनाना 2 लाँच केलंय. गेमिनी-आधारित, रिअल-टाइम, उच्च-गुणवत्ता, जलद आणि स्मार्ट प्रतिमा तयार करणारं हे क्रांतिकारी टूल आहे.

Published : February 27, 2026 at 9:51 AM IST
हैदराबाद : गूगलनं त्याच्या लोकप्रिय एआय इमेज जनरेशन टूलची नवीनतम आवृत्ती नॅनो बनाना 2 लाँच केली आहे. अल्फाबेट इंकचे सीईओ सुंदर पिचाई यांनी हे कंपनीचं आतापर्यंतचं सर्वोत्तम इमेज मॉडेल म्हणून वर्णन केलं आहे. हे मॉडेल गेमिनी एआयच्या प्रगत क्षमतेवर आधारित आहे आणि रिअल-टाइम वेब सर्चमधून माहिती घेऊन उच्च-गुणवत्तेच्या प्रतिमा तयार करतं.
Introducing Nano Banana 2: Our best image generation and editing model yet. 🍌
— Google (@Google) February 26, 2026
Pro-level quality, at Flash speed. Rolling out today across @GeminiApp, Search, and our developer and creativity tools. pic.twitter.com/6oNWYhVSqp
काय आहे नॅनो बनाना 2?
नॅनो बनाना 2 हे गूगलचं नवीनतम आर्टिफिशियल इंटेलिजन्स-आधारित इमेज क्रिएशन आणि एडिटिंग मॉडेल आहे. हे टूल नैसर्गिक भाषेत वर्णन केलेल्या कल्पना किंवा सूचनांवरून त्वरित उच्च-रिझोल्यूशन प्रतिमा तयार करतं किंवा विद्यमान फोटो एडिट करतं. गेमिनी एआयच्या जागतिक ज्ञान आणि रिअल-टाइम इन्फॉर्मेशनचा वापर करून हे मॉडेल अधिक अचूक, तपशीलवार आणि वास्तववादी प्रतिमा तयार करतं. यात प्रगत फीचर्स सब्जेक्ट कन्सिस्टन्सी, अचूक टेक्स्ट रेंडरिंग, क्रिएटिव्ह कंट्रोल (अस्पेक्ट रेशियो, ऑब्जेक्ट्सची संख्या), आणि जलद प्रोसेसिंग सारखे फीचर आहे. हे गेमिनी अॅप, गूगल सर्चचे एआय मोड, गूगल लेंस आणि फ्लो व्हिडिओ टूलमध्ये उपलब्ध आहे.
मागील आवृत्त्यांचा इतिहास
नॅनो बनाना ऑगस्ट 2025 मध्ये लाँच झालं होतं. उच्च-रिझोल्यूशन आउटपुटमुळं ते त्वरित व्हायरल झालं होतं. नोव्हेंबरमध्ये नॅनो बनाना प्रो आलं, ज्यात स्टुडिओ-क्वालिटी क्रिएटिव्ह कंट्रोल होतं. आता नॅनो बनाना 2 हे प्रो-लेव्हल क्षमता आणि फ्लॅश-स्पीडचं संयोजन आहे, जे अधिक जलद आणि स्मार्ट इमेज जनरेशन करून देतं. हे मॉडेल क्रिएटर्स, मार्केटर्स आणि सामान्य वापरकर्त्यांसाठी क्रांतिकारी ठरेल, कारण ते प्रतिमा तयार करणे आणि एडिटिंग सोपं करून चांगलं छायाचित्र बनवतं.
हे वाचलंत का :

