गूगल क्रोम ब्राउजरमध्ये उत्पादकता वाढवणारी तीन नवीन वैशिष्ट्ये
गूगल क्रोममध्ये नवीन वैशिष्ट्ये आली आहेत. स्प्लिट व्यू, PDF अॅनोटेशन आणि ड्राइव्ह सेव्हसह टॅब मॅनेजमेंट आता अधिक सोपं आणि जलद झालंय.

Published : February 21, 2026 at 10:59 AM IST
नवी दिल्ली : गूगलनं गुरुवारी क्रोम ब्राउजरसाठी उत्पादकता केंद्रित नवीन सुधारणांची घोषणा केली. माउंटन व्ह्यू येथील या टेक दिग्गज कंपनीनं सांगितलं की, हे बदल सामान्य आणि एंटरप्राइज वापरकर्त्यांना टॅब्स अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यास आणि काम जलद पूर्ण करण्यास मदत करतील. या अपडेटमध्ये स्प्लिट व्यू नावाचं नवीन टॅब ऑर्गनायझेशन टूल, PDF मध्ये अॅनोटेशन सुविधा आणि गूगल ड्राइव्हमध्ये थेट सेव्ह करण्याची सुविधा समाविष्ट आहे.
स्प्लिट व्यू: दोन टॅब एकाच वेळी पाहा
क्रोममधील पहिलं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे स्प्लिट व्यू. हे वापरकर्त्यांना एकाच क्रोम विंडोमध्ये दोन टॅब एकत्र बाजूनं पाहण्याची सुविधा देतं. वेगवेगळ्या ब्राउजर विंडोचा आकार मॅन्युअली बदलण्याऐवजी, वापरकर्ते एखाद्या टॅबवर राइट-क्लिक करून 'स्प्लिट व्यू' पर्याय निवडू शकतात आणि तो दुसऱ्या टॅबसोबत पेअर करू शकतात. गूगलच्या ब्लॉग पोस्टनुसार, ब्राउजर आपोआप दोन्ही पेजेस स्क्रीनवर समान रीतीनं व्यवस्थित करतो. हे वैशिष्ट्य कंटेंट तयार करताना डॉक्युमेंट्स आणि रेफरन्स नोट्सची तुलना करणे किंवा एकाच वेळी अनेक वेब अॅप्सवर काम करणं सोपं करतं. हे गेल्या काही महिन्यांपासून टेस्टिंगमध्ये होते आणि आता अधिकृतपणे रोलआउट होत आहे.
PDF अॅनोटेशन: ब्राउजरमध्येच नोट्स आणि हायलाइट
दुसरं महत्त्वाचं अपडेट म्हणजे क्रोमच्या बिल्ट-इन PDF व्ह्यूअरमध्ये अॅनोटेशन क्षमता जोडणे. आता वापरकर्ते PDF उघडताच टेक्स्ट हायलाइट करू शकतात, कमेंट्स जोडू शकतात, ड्रॉ करू शकतात आणि बेसिक मार्कअप करू शकतात. PDF उघडल्यावर अॅनोटेशन टूलबार दिसेल, ज्यामुळं फाइल डाउनलोड न करता थेट ब्राउजरमध्ये संपादन शक्य होईल. हे वैशिष्ट्य वापरकर्त्यांच्या फीडबॅकनुसार आणलं गेलं आहे.
गूगल ड्राइव्हमध्ये थेट सेव्ह
तिसरं वैशिष्ट्य 'Save to Google Drive' आहे. हे वापरकर्त्यांना क्रोममधून फाइल्स आणि PDF थेट त्यांच्या गूगल ड्राइव्ह अकाउंटमध्ये सेव्ह करण्यास सक्षम करतं. डाउनलोड करून पुन्हा अपलोड करण्याची गरज नाही. फाइल 'Saved from Chrome' फोल्डरमध्ये स्टोअर होते, जी सर्व डिव्हाइसेसवर उपलब्ध असते. यामुळं क्लाउड-बेस्ड वर्कफ्लो सोपा होतो आणि लोकल स्टोरेजचा वापर कमी होतो. गूगलनं सांगितलं की, ही वैशिष्ट्ये डेस्कटॉपवर नवीनतम क्रोम व्हर्जनमध्ये हळूहळू रोलआउट होत आहेत. फेज्ड रोलआउटमुळं सर्व वापरकर्त्यांपर्यंत हे वैशिष्ट्ये पोहोचण्यास वेळ लागू शकतो.
हे वाचलंत का :

