डार्क मॅटरचा पहिला सुगावा? एका मैल खाली सापडला गूढ कण!
दक्षिण डकोटाच्या एक मैल खोल भूमिगत प्रयोगात वैज्ञानिकांना डार्क मॅटरचा संभाव्य सुगावा मिळालाय.

Published : September 2, 2026 at 10:44 AM IST
मुंबई : दक्षिण डकोटातील सॅनफर्ड अंडरग्राउंड रिसर्च फॅसिलिटीमध्ये एक मैल खोल भूमिगत प्रयोगात वैज्ञानिकांना डार्क मॅटरचा संभाव्य सुगावा मिळाला आहे. LUX-ZEPLIN प्रयोगात 10 टन द्रव झेनॉन वापरून WIMP कणाची झेनॉन अणूशी टक्कर नोंदवली गेली. फिकट प्रकाशाची चमक दिसली, पण एकाच घटना असल्यानं संशोधकांनी अजून पूर्ण शोध म्हणून दावा केलेला नाही.
The first signs of dark matter may have finally been spotted.
— Power to the People ☭🕊 (@ProudSocialist) September 1, 2026
85% of the universe is comprised of dark matter, but for decades physicists haven’t been able to directly observe it until now!
The breakthrough took place at the Sanford Underground Research Facility in Lead, South… pic.twitter.com/lpiGtQyXXq
अंधारात दडलेलं विश्वाचं रहस्य : सामान्य पदार्थ म्हणजेच तारे, ग्रह, माणूस आणि आपण पाहू शकतो ते सर्व विश्वातील एकूण पदार्थाच्या केवळ 15 टक्के आहे. उरलेले 85 टक्के पदार्थ डार्क मॅटर आहे. हा पदार्थ प्रकाश उत्सर्जित किंवा परावर्तित करत नाही, म्हणून तो दुर्बिणींना आणि मानवी डोळ्यांना दिसत नाही. तरीही वैज्ञानिकांना त्याच्या अस्तित्वाची खात्री आहे, कारण त्याच्या गुरुत्वाकर्षणीय प्रभावामुळं आकाशगंगांची रचना आणि गती समजते.
दक्षिण डकोटाच्या खाणीत एक मैल खाली प्रयोग : रेउटर्सच्या 1 सप्टेंबरच्या अहवालानुसार, दक्षिण डकोटातील ब्लॅक हिल्स प्रदेशातील जुन्या सोन्याच्या खाणीत बांधलेल्या सॅनफर्ड अंडरग्राउंड रिसर्च फॅसिलिटीमध्ये वैज्ञानिकांनी डार्क मॅटरच्या शोधात महत्त्वाचा सुगावा मिळवला आहे. हा प्रयोग सुमारे 1.6 किलोमीटर खोल भूमिगत चालतो.
WIMP नावाचा गूढ कण : संशोधकांनी WIMP (Weakly Interacting Massive Particle) नावाच्या गृहीत कणाशी संबंधित कण-संवादाचे निरीक्षण नोंदवलx. हा डार्क मॅटरचा एक प्रमुख उमेदवार मानला जातो. युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टलचे कणभौतिकशास्त्रज्ञ सॅम एरिक्सन यांनी सांगितलं की, “हा डार्क मॅटर निरीक्षणाचा पहिला सुगावा असू शकतो.”
LUX-ZEPLIN प्रयोगाची रचना : LUX-ZEPLIN (LZ) प्रयोगात 10 टन द्रव झेनॉन वापरलं जातं. अमेरिकेच्या ऊर्जा विभागाच्या लॉरेन्स बर्कले नॅशनल लॅबोरेटरीकडून चालवला जाणारा हा मोठा दंडगोलाकार डिटेक्टर डार्क मॅटर कणांना झेनॉन अणूंशी टक्कर देताना पकडण्यासाठी तयार केला आहे.
फिकट प्रकाश आणि न्यूक्लियर रिकॉइल : जेव्हा एखादा कण झेनॉन अणूशी टक्करतो, तेव्हा फिकट अल्ट्राव्हायोलेट प्रकाशाची चमक आणि अणूच्या केंद्रकाची हलकी झटका (न्यूक्लियर रिकॉइल) दिसते. वैज्ञानिकांनी असीच एक घटना नोंदवली, जी WIMP कणाच्या अपेक्षित वर्तनाशी जुळते.
फक्त एकच घटना, शोध नाही : मात्र संशोधकांनी स्पष्ट केलं की, “ही फक्त एकच घटना असल्यानं आम्ही अजून डार्क मॅटर म्हणून दावा करत नाही.” जपानमधील वैज्ञानिक परिषदेत आणि Physical Review Letters जर्नलमध्ये सादर केलेल्या अभ्यासात त्यांनी सांगितलं की, सांख्यिकीय निकष अजून पूर्ण झालेलं नाहीत.
इतर शक्यतांचाही तपास : UCLAच्या खगोलभौतिकशास्त्रज्ञ अल्वाइन कामाहा यांनी सांगितलं, “आम्ही कदाचित काहीतरी असामान्य पाहत आहोत, पण निष्कर्ष काढण्यापूर्वी आम्हाला अत्यंत तटस्थ राहावं लागेल.” वैज्ञानिक इतर संभाव्य स्पष्टीकरणेही तपासत आहेत.
दर सेकंदाला लाखो कण, तरीही दुर्मिळ संवाद : कामाहा यांनी सांगितलं की, “आमच्या शरीरातून दर सेकंदाला लाखो डार्क मॅटर कण जात असतील, तरीही त्यांपैकी जवळजवळ कोणीही आमच्या अणूंशी संवाद साधत नाही.” डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी या दोन्ही विश्वाच्या मोठ्या रहस्यांविषयी वैज्ञानिक अजूनही अनिश्चित आहेत. ही घटना डार्क मॅटर संशोधनातील एक रोमांचक पाऊल आहे, पण अंतिम शोध अजून बाकी आहे. पुढील अधिक डेटा आणि पडताळणी यातूनच खरे चित्र समोर येईल.
हे वाचलंत का :

