Google AI चे प्रमुख डेमिस हसाबिस यांची अल्फाबेटचे मुख्य शास्त्रज्ञ म्हणून नियुक्ती
अल्फाबेटनं आपल्या एआय (AI) विभागाच्या नेतृत्वात महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. डेमिस हसाबीस हे त्यांच्या सध्याच्या व्यवस्थापकीय भूमिकेतून पायउतार होत.

Published : August 6, 2026 at 11:16 AM IST
मुंबई: गुगलची मूळ कंपनी असलेल्या अल्फाबेटनं बुधवारी आपल्या एआय (AI) विभागातील नेतृत्वात मोठे बदल जाहीर केले. गुगल डीपमाइंडचे (Google DeepMind) सीईओ डेमिस हसाबीस त्यांच्या व्यवस्थापकीय पदावरून पायउतार होत आहेत. या व्यतिरिक्त 'जेमिनी' (Gemini) मॉडेलशी संबंधित अनुभवी अभियंता जेफ डीन कंपनी सोडण्याच्या तयारीत आहेत. गुगल डीपमाइंडसाठी हा बदल महत्त्वपूर्ण टप्प्यावर होतोय, कारण त्यांचं प्रगत 'जेमिनी' मॉडेल जूनमध्ये लाँच होणार होतं, मात्र ते अद्याप लाँच झालेलं नाही. या घडामोडींमुळं गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्रातील वर्तुळात अशी चिंता निर्माण झाली आहे. गुगल 'अँथ्रोपिक' (Anthropic) आणि 'ओपनएआय' (OpenAI) सारख्या स्पर्धकांच्या मागे पडत आहे. या बातमीनंतर अल्फाबेटच्या शेअर्समध्ये 4 टक्क्यांची घसरण दिसून आलीय.
Tomorrow will be my last day at Google after 27 years, and watching it grow from 25 people to 190,000+ has been an amazing journey. Below is a note I shared with many people internally at Google today. An excerpt is:
— Jeff Dean (@JeffDean) August 5, 2026
It has been an absolute pleasure to work with you and to help… pic.twitter.com/o3aRNLkssA
"मानवी आरोग्य सुधारणे हा एआयचा सर्वात महत्त्वाचा उपयोग असायला हवा. कर्करोगासारख्या आजारांवर उपचार करण्यास मदत करून एआयनं जगाला आपली उपयुक्तता सिद्ध करण्याची हीच वेळ आहे." - डेमिस हसाबिस, अल्फाबेटचे मुख्य शास्त्रज्ञ
हसाबीस यांची नवीन वाटचाल: नोबेल विजेते असलेले हसाबीस अल्फाबेटमध्ये 'चीफ सायंटिस्ट' (मुख्य शास्त्रज्ञ) हे नवीन पद स्वीकारतील. ते गुगल डीपमाइंडच्या सीईओ पदावरून 'प्रेसिडेंट' (अध्यक्ष) पदाचा कार्यभार पहातील. कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या संदेशात त्यांनी 'आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स' (AGI) लवकरच लॉंच होणार असल्याचे संकेत दिले आहे. अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या संदेशात नमूद केलं की, हसाबीस यांना एजीआयच्या (AGI) भविष्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करता यावं, यासाठी त्यांच्याशी चर्चा सुरू होती. विभागाचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर (CTO) कोरे कावुककुओग्लू (Koray Kavukcuoglu) दैनंदिन कामकाजावर देखरेख करतील; ते सीईओऐवजी 'सीनियर व्हाइस प्रेसिडेंट' (वरिष्ठ उपाध्यक्ष) हे पद भूषवतील आणि अल्फाबेटचे 'चीफ एआय आर्किटेक्ट' म्हणूनही काम पाहतील.
Just shared some changes we’re making to the teams at @GoogleDeepMind.@DemisHassabis is stepping up to become Chair of @GoogleDeepMind & Chief Scientist of Alphabet, in addition to leading @IsomorphicLabs. He’ll be able to dedicate his time and focus on shaping the future of…
— Sundar Pichai (@sundarpichai) August 5, 2026
जेफ डीनसह इतर कंपनी सोडण्याच्या तयारीत : जेफ डीन, संजय घेमावत, ओरिओल विन्याल्स आणि क्वोक ले, हे गुगलचे काही प्रमुख 'डिस्कव्हरी लूप' (Discovery Loop) नावाचं स्टार्टअप सुरू करण्यासाठी कंपनी सोडत आहेत. ही कंपनी मशीन लर्निंग, विज्ञान आणि अभियांत्रिकीमधील प्रगतीवर लक्ष केंद्रित करेल आणि तिची रचना 'पब्लिक बेनिफिट कॉर्पोरेशन' म्हणून करण्यात आली आहे. अल्फाबेटनं या बदलांमागची कारणे अद्याप स्पष्ट केलेली नाहीत. सूत्रानं सांगितले की, गूगल क्लाउडमधील वरिष्ठ नेत्यांनी कवुकुओग्लू यांच्या नियुक्तीचं स्वागत केलं.
आपल्या मेमोमध्ये, हसाबिस यांनी एआय मॉडेल्समधील प्रगतीवर प्रकाश टाकला, ज्यात जेमिनी 4 (Gemini 4) सारख्या अपग्रेड्सचा समावेश आहे. ते डीपमाइंडमधून वेगळ्या झालेल्या आयसोमॉर्फिक लॅब्स (Isomorphic Labs) या औषध शोध कंपनीलाही अधिक वेळ देतील, जिथे ते सीईओ म्हणून कार्यरत आहेत.
हे वाचलंत का :
- पंतप्रधान मोदींची नेटफ्लिक्सचे सह-सीईओशी भेट; भारत जागतिक कंटेंट हब, युवकांना मिळणार कौशल्य आणि शिक्षण
- व्हॉट्सॲपनं ग्रुप चॅट्ससाठी आणले अपग्रेड्स: @all मेंशन, पोल सुधारणा आणि नवीन ग्रुप निर्मितीची सोय
- आदिवासी गावाची जागतिक ओळख: उधमाळ ठरणार भारतातलं पहिलं ‘डार्क स्काय कम्युनिटी’ गाव, 42.14 लाखांचा निधी मंजूर

