BMW X3 30 xDrive M Sport Pro भारतात लॉंच : सर्वात शक्तिशाली व्हेरिएंट, 74.50 लाख रुपये किंमत
बीएमडब्ल्यू इंडियानं नवीन BMW X3 30 xDrive M Sport Pro भारतात लॉंच केली. या सर्वात शक्तिशाली व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 74.50 लाख रुपये आहे.

Published : February 16, 2026 at 1:27 PM IST
मुंबई : बीएमडब्ल्यू इंडियानं आपल्या लोकप्रिय लक्झरी एसयूव्ही एक्स3 चं नवं टॉप-स्पेक व्हेरिएंट BMW X3 30 xDrive M Sport Pro भारतात लॉंच केलं. या व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 74.50 लाख रुपये आहे. हे मॉडेल सध्याच्या एक्स3 रेंजमधील सर्वात शक्तिशाली आणि प्रीमियम व्हर्जन आहे. बुकिंग्स सुरू झाल्या असून, डिलिव्हरी लवकरच सुरू होईल. नव्या एक्स3 च्या आगमनानं बीएमडब्ल्यूनं लक्झरी मिड-साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये आपलं वर्चस्व आणखी मजबूत केलं आहे.
इंजिन आणि परफॉर्मन्स
नव्या BMW X3 30 xDrive M Sport Pro मध्ये 2.0 लिटर, चार-सिलेंडर टर्बो-पेट्रोल इंजिन आहे, ज्याला 48 व्होल्ट माइल्ड-हायब्रिड सिस्टीम जोडलेली आहे. हे इंजिन 258 एचपी पॉवर आणि 400 एनएम टॉर्क निर्माण करतं. 8-स्पीड स्टेपट्रॉनिक ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि बीएमडब्ल्यूचं प्रसिद्ध एक्सड्राइव्ह ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टीम यामुळं पॉवर चारही चाकांना समान प्रमाणात मिळते. 1-100 किमी/तास वेग फक्त 6.3 सेकंदात गाठता येतो. या गाडीची ARAI प्रमाणित इंधन कार्यक्षमता 14.61 किमी/लिटर आहे. ही कामगिरी या सेगमेंटमधील सर्वोत्तम मानली जाते.
अंतर्गत भाग आणि वैशिष्ट्ये
केबिनमध्ये मिनिमलिस्ट डिझाइन आणि उच्च दर्जाच्या मटेरियलचा वापर केला आहे. ड्रायव्हर-फोकस्ड बीएमडब्ल्यू कर्व्ड डिस्प्ले (12.3 इंच इन्फॉर्मेशन + 14.9 इंच कंट्रोल डिस्प्ले) आणि सेंसाटेक रॅप्ड पॅनल्स यामुळे प्रीमियम फील येतो. यात बीएमडब्ल्यू इंटरॅक्शन बार, कस्टमायझेबल अॅम्बियंट लाइटिंग, हेड-अप डिस्प्ले, व्हेंटिलेटेड स्पोर्ट सीट्स (सस्टेनेबल वेगांझा लेदर), लंबर सपोर्ट, पॅनोरॅमिक सनरूफ, रियर सनब्लाइंड्स, हार्मन कार्डन ऑडिओ सिस्टीम आणि ट्रॅव्हल अँड कम्फर्ट सिस्टीम यांचा समावेश आहे. सुरक्षेसाठी ADAS फीचर्स, 360-डिग्री कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक विथ ऑटो होल्ड आणि मल्टिपल एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत.
बाह्य डिझाइन
नव्या एक्स3 चं डिझाइन अधिक बोल्ड आणि आक्रमक आहे. लांबी 4,755 मिमी आणि रुंदी 1,920 मिमी असल्यानं ती या क्लासमधील सर्वात मोठी एसयूव्ही आहे. समोर ब्लॅक किडनी ग्रिल विथ आयकॉनिक ग्लो, अॅडॅप्टिव्ह एलईडी हेडलाइट्स, कॉर्नरिंग लाइट्स आणि शॅडोलाइन डिटेलिंग आहे. एम एरोडायनॅमिक पॅकेज, 20 इंच अलॉय व्हील्स, रेड एम स्पोर्ट ब्रेक्स, रियरला स्प्लिट एल-शेप्ड एलईडी टेल लॅम्प्स, ग्लॉस-ब्लॅक डिफ्यूजर आणि रूफ स्पॉइलर यामुळे स्पोर्टी लुक मिळतो.
रंग पर्याय
ही एसयूव्ही खालील रंगांमध्ये उपलब्ध आहे.
- ब्रूकलिन ग्रे मेटॅलिक
- ड्युन ग्रे मेटॅलिक
- अल्पाइन व्हाइट
- इंडिव्हिज्युअल टॅन्झानाइट ब्ल्यू
- ब्लॅक सॅफायर मेटॅलिक
भारतीय बाजारात बीएमडब्ल्यू एक्स3 30 : एक्सड्राइव्ह एम स्पोर्ट प्रो ची थेट स्पर्धा मर्सिडीज-बेंझ जीएलसी, ऑडी क्यू5 आणि व्हॉल्वो एक्ससी60 यांच्याशी आहे.
हे वाचलंत का :

