ETV Bharat / technology

बजाज पल्सर NS400z 14 हजारांनी स्वस्त; नवीन 349cc इंजनसह अपडेट

बजाज ऑटोनं Pulsar NS400z ला नवीन 349cc इंजिनसह अपडेट केलंय. नवीन GST दरांमुळं किंमत 1.94 लाख वरून 1.80 लाख रुपये झालीय.

Bajaj Pulsar NS400z, 349cc Pulsar, Bajaj NS400z Price, Pulsar New Model
बजाज पल्सर NS400z (Bajaj)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : May 2, 2026 at 10:52 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

हैदराबाद: दुचाकी वाहन क्षेत्रातील आघाडीची कंपनी बजाज ऑटोनं आपल्या लोकप्रिय Pulsar NS400z मॉडेलमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. कंपनीनं नुकतेच नवीन 349cc इंजनसह ही बाइक लॉंच केली असून, नवीन GST दरांमुळं किंमतही लक्षणीयरीत्या कमी करण्यात आली आहे.

जवळपास 14,000 रुपयांची बचत : लॉंचवेळी 1.94 लाख रुपये (एक्स-शोरूम) असलेली ही बाइक आता केवळ 1.80 लाख रुपयांत उपलब्ध झाली आहे. म्हणजेच ग्राहकांना जवळपास 14,000 रुपयांची प्रत्यक्ष बचत करता येणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ऑन-रोड किंमतीवर ग्राहकांना तब्बल 24,500 रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो. 373cc इंजन असलेल्या मागील मॉडेलच्या जागी हे नवीन अपडेटेड व्हर्जन आलं आहे.

इंजन आणि परफॉर्मन्स : या अपडेटमध्ये सर्वात मोठा बदल इंजनमध्ये आहे. नवीन Pulsar NS400z मध्ये 349cc सिंगल-सिलेंडर इंजन देण्यात आलं आहे. हे इंजन 9,000rpm वर 40 bhp पॉवर आणि 7,500rpm वर 33.2Nm टॉर्क जनरेट करतं. मागील 373cc इंजनच्या तुलनेत पॉवर (42.4bhp) आणि टॉर्क (35 Nm) थोडा कमी झाला आहे. इंजनचा बोर 89 mm सारखाच ठेवण्यात आला आहे, मात्र स्ट्रोक 60 mm वरून 56.1 mm पर्यंत कमी करण्यात आला आहे. यामुळं इंजन आकारानं छोटं झालं असून, 350cc च्या नियमात बसल्यानं टॅक्स फायदाही मिळाला आहे.

मुख्य वैशिष्ट्ये (Features) : बाइकमध्ये मागील सर्व प्रीमियम फीचर्स कायम ठेवण्यात आले आहेत. यात USD फ्रंट फोर्क, असिस्ट आणि स्लिपर क्लच, राइड-बाय-वायर थ्रॉटल, चार राइडिंग मोड्स, ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी असलेला LCD इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि पूर्ण LED लाइटिंग यांचा समावेश आहे. नवीन किंमत आणि 349cc इंजनसह ही बाइक आता Triumph Speed 400 आणि KTM 390 Duke सारख्या सब-350cc आणि 390cc सेगमेंटमधील प्रतिस्पर्धी बाइक्सना कडवी टक्कर देणार आहे. बजाजनं किंमत आकर्षक ठेवून युवा आणि परफॉर्मन्सप्रेमी ग्राहकांना लक्ष्य केलं आहे.

हे वाचलतं का :

  1. Oben Electric Rorr EVO भारतात लॉंच, केवळ 777 मध्ये बुकिंग सुरू
  2. बजाज चेतक अधिक नवीन वैशिष्ट्यांसह झाली अपडेट, जाणून घ्या किंमत
  3. 2026 Renault Triber MPV नवीन वैशिष्ट्यांसह भारतात लॉंच