ETV Bharat / technology

सूर्याबाहेर पहिल्यांदाच दुसऱ्या ताऱ्यावर प्रचंड सौरवादळ सापडलं, सूर्यापेक्षा 10,000 पट मोठं

सूर्याबाहेर पहिल्यांदाच दुसऱ्या ताऱ्यावर प्रचंड सौरवादळ (CME) शास्त्रज्ञांना आढळून आलं आहे. हे सौरवादळ सूर्यापेक्षा 10,000 पट मोठं आहे.

coronal mass ejection
The aurora borealis, also known as the northern lights, glow in the sky over St Mary's Lighthouse in Whitley Bay on the North East coast, England, Wednesday Nov. 12, 2025 (Owen Humphreys/PA via AP)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : November 17, 2025 at 5:26 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

हैदराबाद : आपला सूर्य कधी कधी खूप मोठे “स्फोट” करतो, ज्याला शास्त्रज्ञ “कोरोनल मास इजेक्शन” (CME) म्हणतात. यामुळं पृथ्वीवर औरोरा (रंगीत आकाशातील लाटा) दिसतात आणि कधी कधी विजेचे उपकरणही बंद पडतात. आता पहिल्यांदाच शास्त्रज्ञांना आपल्या सूर्याच्या बाहेर, दुसऱ्या एका ताऱ्यावर असा प्रचंड स्फोट दिसला आहे. हा तारा आपल्यापासून फक्त 133 प्रकाशवर्ष दूर आहे आणि त्याचं नाव StKM 1-1262. हा एक लहान, थंडगार लाल तारा आहे, ज्याला (रेड ड्वार्फ) देखील म्हणतात.

The northern lights fill the sky behind the Saint Joseph the Woodworker Shrine Tuesday, Nov. 11, 2025, near Valley Falls, Kan
The northern lights fill the sky behind the Saint Joseph the Woodworker Shrine Tuesday, Nov. 11, 2025, near Valley Falls, Kan (AP Photo)

सुर्यापेक्षा 10,000 पट मोठा स्फोट
StKM 1-1262 वर एक स्फोट झाला, पण तो आपल्या सूर्यावर होणाऱ्या सर्वात मोठ्या स्फोटापेक्षा 10,000 पट जास्त ताकदवान होता. जर या ताऱ्याजवळ कोणतेही ग्रह असता तर त्यांचे संपूर्ण वातावरण गायब झालं असतं. म्हणजे तिथे जीव राहणे खूप कठीण झालं असतं.

शोध का महत्वाचा?
विश्वात सर्वात जास्त आढळणारे तारे हे लाल बटू तारे आहेत. यांच्याभोवती पृथ्वी सारखेच छोटे ग्रहही खूप सापडतात. आधी शास्त्रज्ञांना वाटायचं की अशा ताऱ्यांजवळ जीव राहू शकतो. पण आता समजलं आहे की हे तारे खूपच घातक आहे. त्यामुळं तिथले ग्रह जीवनासाठी योग्य नाहीत.

कसा लागला शोध?
युरोपमधील LOFAR नावाच्या खास रेडिओ दूरबिनीनं या ताऱ्याचा शोध लावला. 2016 मध्ये हे घडले होते, पण आता 2025 मध्ये त्याचा अभ्यास पूर्ण झाला आणि ‘नेचर’ या मोठ्या नियतकालिकात हा शोध प्रकाशित झाला आहे. थोडक्यात सांगायचं झाल्यास पहिल्यांदाच दुसऱ्या ताऱ्यावर सूर्यापेक्षा हजारो पट मोठे सौरवादळ आढळून आलं आहे. त्यामुळं अशा ताऱ्याच्या शोधामुळं भविष्यातील संशोधनाला चालना मिळणार आहे. तसंच इतर ग्रहावरील जीवणाचं रहस्य उलगडण्यात मदत होईल.

हे वाचलंत का :