ETV Bharat / technology

आर्टेमिस II च्या प्रक्षेपणापूर्वी क्रू क्वारंटाइनमध्ये

आर्टेमिस II : 6 मार्च 2026 ला नासाचे चार अंतराळवीर चंद्राभोवती 10 दिवसांचा ऐतिहासिक प्रवास सुरू करणार आहेत. 50+ वर्षांनंतर मानव चंद्राच्या जवळून जाणार आहे.

Artemis II crew
आर्टेमिस II क्रू (Etv Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : February 21, 2026 at 2:49 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

ह्यूस्टन: नासाची आर्टेमिस II मोहीम 6 मार्च 2026 रोजी आकाशात झेपवणार आहे. त्यामुळं नासानं लाँच पॅडवरील आवश्यक कामं पूर्ण करण्याची तयारी सुरू केली आहे. चाचणी डेटाचं विश्लेषण आणि आगामी दिवसांत होणाऱ्या फ्लाइट रेडिनेस रिव्ह्यूवर अवलंबून नासा सध्या लक्ष केंद्रीत करत आहे. या मोहिमेत चंद्राभोवती चाचणी उड्डाणासाठी चार अंतराळवीरांना शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता (सीएसटी) ह्यूस्टनमध्ये विलग्नवासात (quarantine) ठेवण्यात आले आहे.

14 दिवस विलग्नवास
साधारणतः लाँचपूर्वी 14 दिवस, नासाचे अंतराळवीर रिड वाइजमन (कमांडर), विक्टर ग्लोवर, क्रिस्टिना कोच आणि कॅनेडियन स्पेस एजन्सीचे (CSA) अंतराळवीर जेरेमी हॅन्सन विलग्नवास(quarantine) राहतील. क्रू लाँचपूर्वी सुमारे पाच दिवस आधी केनेडी स्पेस सेंटरला जाईल. नासानं 19 फेब्रुवारीला दुसरी वेट ड्रेस रिहर्सल यशस्वी केलीय. प्रोपेलंट ड्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर लाँच पॅडवर अंतिम तयारी सुरू झाली आहे. शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत व्यवस्थापकांनी चाचणी आणि पुढील मार्गाबाबत माहिती दिली.

चंद्राच्या जवळून 10 दिवस प्रवास
आर्टेमिस II मोहिमेत चार अंतराळवीर 10 दिवस प्रवास करतील. ते चंद्राच्या दूरच्या बाजूभोवती फिरून पृथ्वीवर परत येतील. क्रूमध्ये नासाचे रिड वाइजमन, विक्टर ग्लोवर, क्रिस्टिना कोच आणि CSA चं जेरेमी हॅन्सन यांचा समावेश आहे. लाँचपूर्वी ह्यूस्टनमध्ये ते कॉरन्टाईन असून सुदृढ राहण्याचा प्रयत्न करणार आहे.

Artemis II Mission CREW
Artemis II Mission चे अंतराळवीर (Nasa)

अपोलो उड्डाणानंतरची पहिली मानवी चंद्र मोहीम
ही मोहीम 1972 मधील अंतिम अपोलो उड्डाणानंतरची पहिली मानवी चंद्र मोहीम आहे. आर्टेमिस II मोहिमेचा उद्देश चंद्रावर पुन्हा मानव उतरवणे आणि दीर्घकालीन चंद्रवर उपस्थिती निर्माण करणे आहे. भविष्यातील मार्स मोहिमांसाठी चंद्राचा लाँच पॉइंट म्हणून उपयोग होण्याची शक्यता आहे. यापूर्वी हायड्रोजन लीकमुळं मोहिमेला विलंब झाला होता. यावेळी लिक्विड हायड्रोजन फ्युलिंग ऑपरेशन्सचं बारकाईनं निरीक्षण करण्यात आलं आहे. रिहर्सलदरम्यान ग्राउंड कम्युनिकेशन्समध्ये तात्पुरता अडथळा आला होता, परंतु बॅकअप सिस्टमनं काम सुरू ठेवल्यामुळं समस्या समजण्यात मदत झाली.

ऐतिहासिक लाँचची उलटी गणती
आर्टेमिस II स्पेस लॉन्च सिस्टम (SLS) रॉकेट आणि ओरायन स्पेसक्राफ्ट लाँच पॅडवर प्रेक्षपणासाठी सज्ज आहेत. अंतिम तयारी सुरू असून सहा मार्चला ही मोहीम आकाशात झेपावेल.

Artemis II mission
Artemis II mission मोहिमेचे टप्पे (Nasa)

हे वाचलंत का :

  1. नासा आर्टेमिस II मोहीम चार आठवड्यांनी पुढे ढकलली
  2. नासाच्या आर्टेमिस II चंद्र मोहिमेला इंधन गळतीमुळे धक्का, मोहिमेच्या वेळापत्रकावर परिणाम?
  3. Explainer : 50 वर्षांनंतर मानवाची पुन्हा चंद्राकडे झेप, Apollo नंतरचं पहिलं मानवयुक्त Artemis II मिशन!