ETV Bharat / technology

आयफोन 18 प्रो मध्ये LTPO+ डिस्प्ले तंत्रज्ञान; बॅटरी लाईफ सुधारणार

अ‍ॅपल आयफोन 18 प्रो आणि प्रो मॅक्समध्ये LTPO+ डिस्प्ले तंत्रज्ञान आणणार आहे. यामुळं बॅटरी आयुष्य सुधारेल आणि Always On Display अधिक चांगला होईल.

iPhone 18 Pro and iPhone 18 Pro Max
आयफोन 18 प्रो लीक फोटो (Etv Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : May 7, 2026 at 3:04 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : अ‍ॅपल कंपनी आपल्या आगामी आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्स मॉडेल्ससाठी डिस्प्ले तंत्रज्ञानात मोठा बदल करणार आहे. नवीन रिपोर्टनुसार, कंपनी सध्याच्या LTPO OLED पॅनल्सऐवजी प्रगत LTPO+ तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. यामुळं डिव्हाइसेसची पॉवर एफिशियन्सी वाढेल. या तंत्रज्ञानामुळं बॅटरी आयुष्य सुधारेल आणि Always-On Display चा अनुभव अधिक चांगला होईल. स्क्रीन आकार मात्र 6.3 इंच आणि 6.9 इंच एवढेच राहतील. हा बदल आयफोन यूजर्ससाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे.

LTPO+ तंत्रज्ञान म्हणजे काय? : सध्या आयफोन प्रो मॉडेल्समध्ये LTPO (Low-Temperature Polycrystalline Oxide) OLED डिस्प्लेचा वापर होतो. हे तंत्रज्ञान Always-On Display साठी आवश्यक असतं कारण ते रिफ्रेश रेट 1 Hz ते 120 Hz पर्यंत डायनॅमिक पद्धतीनं बदलू शकतं. LTPO+ हे याची पुढील आवृत्ती असेल. यात ऑक्साइड मटेरियलचा वापर थिन-फिल्म ट्रान्झिस्टर (TFT) ड्राईव्ह करण्यासाठी केला जातो. यामुळं OLED लाइट एमिशन अधिक कार्यक्षमतेनं नियंत्रित करता येतात. पर्यावरण, वापर आणि लाइटिंग कंडिशन्सनुसार डिस्प्ले आपोआप अॅडजस्ट होऊ शकते. याचा परिणाम म्हणजे कमी ब्राइटनेसवरही स्क्रीन अधिक स्थिर आणि गुणवत्तापूर्ण दिसते. यामुळं युजर्सना कमी प्रकाशात स्क्रीनवर दिसणारे फ्लिकरिंग किंवा ग्रेन (grainy) इफेक्ट लक्षणीयरीत्या कमी होईल.

LTPO+ तंत्रज्ञानाचे फायदे : या तंत्रज्ञानाचे प्रमुख दोन प्रमुख फायदे आहेत.

1. उत्तम पॉवर एफिशियन्सी: LTPO+ तंत्रज्ञानामुळं सामान्य वापरात आणि Always-On Display ऑन असतानाही बॅटरी कमी खर्च होईल. यामुळं आयफोन 18 प्रो सीरीजचा बॅटरी परफॉर्मन्स मागील मॉडेल्सपेक्षा चांगला राहील.

2. चांगला Always-On अनुभव: कमी प्रकाशात डिस्प्ले अधिक रिस्पॉन्सिव्ह होईल. ब्राइटनेस अॅडजस्टमेंट स्मूथ होईल आणि स्क्रीनची गुणवत्ता टिकून राहील. यामुळं युजर्सना रात्री किंवा अंधारातही आरामदायक अनुभव मिळेल.

पॅनल पुरवठादार कोण? : रिपोर्टनुसार, Samsung Display आणि LG Display या दोन कंपन्या आयफोन 18 प्रो लाइनअपसाठी बहुतेक OLED पॅनल्स पुरवणार आहेत. चायनिज कंपनी BOE ला यावर्षी प्रो मॉडेल्ससाठी अप्रूवल मिळालेलं नाही. यासाठी उत्पादन गुणवत्ता आणि यील्ड (yield) संबंधित समस्या कारणीभूत आहेत. Samsung आणि LG च्या विश्वसनीयतेवर Apple कंपनीचा विश्वास आहे.

आकार आणि इतर अपेक्षा : आयफोन 18 प्रो 6.3 इंच आणि प्रो मॅक्स 6.9 इंच स्क्रीनसह येणार आहे. फोनची स्क्रीन साइज बदलणार नाही, फक्त अंतर्गत तंत्रज्ञान महत्वाचे बदल होतील. हे अपग्रेड केवळ बॅटरी आणि डिस्प्ले क्वालिटीवरच नाही, तर एकूण युजर एक्सपीरियन्स सुधारेल. याबाबत अद्याप अ‍ॅपलनं अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, The Elec या कोरियन प्रकाशनाच्या रिपोर्टनुसार (9to5Mac द्वारे) ही माहिती समोर आली आहे. iPhone 18 सीरीज 2026 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.

कॅमेरा, प्रोसेसर आणि इतर बदल : डिस्प्ले अपग्रेडसोबतच अ‍ॅपल नवीन A१९ चिप, अधिक चांगली कॅमेरा सिस्टीम आणि इतर हार्डवेअर सुधारणांवरही काम करत असल्याचे संकेत आहेत.

हे वाचलंत का :

  1. OnePlus Nord CE 6 Lite भारतात लाँच: 7000mAh बॅटरी आणि MediaTek Dimensity 7400 सह शक्तिशाली परफॉर्मन्स
  2. OnePlus Nord CE6 : 8000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह भारतात लॉंच
  3. विवो X300 अल्ट्रा आणि X300 FE भारतात लाँच: फोटोग्राफी प्रेमींसाठी शक्तिशाली पर्याय