अमेझॉनच्या आशियातील सर्वात मोठ्या कार्यलयाचं भारतात उद्घाटन, सात हजारांहून अधिक नोकऱ्या
अमेझॉनने आशियातील दुसऱ्या सर्वात मोठ्या क्रमांकाच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं. पुढील 4 वर्षांत कंपनी भारतात $35 अब्ज डॉलची गुंतवणूक करणार आहे.

Published : February 23, 2026 at 3:57 PM IST
मुंबई : अमेझॉनने आशियातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं कार्यालय (Amazon new office) भारतात सुरू केलंय. हे कार्यालय बेंगळुरूत 11 लाख चौरस फूट क्षेत्रफळाचं असून 12 मजली कॅम्पस विनायक नगरजवळ येलहंका येथे आहे. यात कार्यालयात भारतातील (Amazon Bengaluru Office) ई-कॉमर्स, ऑपरेशन्स, पेमेंट्स, तंत्रज्ञान आणि सेलर सर्व्हिसेस विभागांमध्ये 7,000 हून अधिक कर्मचाऱ्यांची असेल. यामुळं बेंगळुरूचा जागतिक तंत्रज्ञान केंद्र म्हणून दर्जा अधिक मजबूत झाला आहे. अमेझॉननं भारतात पुढील चार वर्षांत $35 अब्ज (सुमारे 2.93 लाख कोटी रुपये) गुंतवणुकीची घोषणा केली आहे. या घोषणेमुळं 15 दशलक्ष लहान व्यवसाय आणि लाखो नोकऱ्या निर्माण होतील.
Karnataka Welcomes Amazon’s 10th Corporate Office as Company Unveils $35 Billion India Expansion
— M B Patil (@MBPatil) February 23, 2026
Inaugurated Amazon’s 11 lakh sq. ft. corporate headquarters (BLR 37) at Vinayak Nagar near Yelahanka, Bengaluru. This marks Amazon’s 10th corporate office in Karnataka and reflects… pic.twitter.com/lRfLPi14nk
कर्नाटकातील 10वं कॉर्पोरेट कार्यालय
हे नवीन कॅम्पस अमेझॉनचं कर्नाटकातील 10वं कॉर्पोरेट कार्यालय (Amazon new office in Bengaluru) आहे. यापूर्वी कंपनीनं राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. कर्नाटकाचे मोठे आणि मध्यम उद्योग तथा पायाभूत सुविधा मंत्री एम. बी. पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन झालं.पाटील यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटलं की, "हे अमेझॉनचं कर्नाटकातील 10वं कॉर्पोरेट कार्यालय आहे. आमच्या दीर्घकालीन भागीदारीचं हे कार्यालय प्रतिबिंब आहे." त्यांनी अमेझॉनसह इतर जागतिक कंपन्यांना राज्यात अधिक गुंतवणूक, उत्पादन आणि निर्यात करण्याचे यावेळी आमंत्रण दिलं.
$35 अब्ज गुंतवणूक
अमेझॉननं आतापर्यंत भारतात $40 अब्जांहून अधिक गुंतवणूक केली आहे. आता पुढील काळात $35 अब्ज अतिरिक्त गुंतवणुकीची योजना आहे. ही गुंतवणूक भारताला अधिक बळकटी देणारी ठरणार आहे. यामुळं लहान व्यवसायांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर विस्तार करता येईल, रोजगार निर्मिती होईल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. कर्नाटक या गुंतवणुकीचा मोठा वाटा मिळवण्याच्या स्थितीत आहे, कारण राज्यात आधीच अमेझॉनची मजबूत उपस्थिती आहे.
कर्नाटकचं आकर्षण का?
मंत्री पाटील म्हणाले, कर्नाटकचं भारतातील सर्वाधिक प्रति व्यक्ति उत्पन्न आहे (3.80 लाख रुपयांहून अधिक). ते दरवर्षी राष्ट्रीय तिजोरीत 1.6 लाख कोटी रुपयांचं योगदान देतात. भारतातील 35 टक्के ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (जीसीसी) कर्नाटकात आहेत. बेंगळुरू जागतिक इनोव्हेशन इंडेक्समध्ये 21व्या क्रमांकावर आहे. राज्याची लॉजिस्टिक्स सुविधा वेगानं विकसित होत आहे. 233 कोल्ड स्टोरेज, वेअरहाऊसिंग क्षमता, फ्रेट रेल कॉरिडॉर्स, मल्टिमॉडल पार्क्स, ड्राय पोर्ट्स आणि ट्रक टर्मिनल्स कर्नाटकमध्ये आहे. त्यामुळं कर्नाटकचं कंपन्यांना आकर्षण आहे.
हे वाचलंत का :

