AI+ Nova 2 सीरीज भारतात लाँच; 50-मेगापिक्सेल कॅमेरा, 6000mAh बॅटरीसह बजेटमध्ये नवा पर्याय
AI+ Nova 2 Ultra 5G आणि AI+ Nova 2 5G भारतात 6,000mAh बॅटरी आणि 50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह लॉंच झाले आहेत.

Published : April 9, 2026 at 2:22 PM IST
मुंबई : भारतीय स्मार्टफोन ब्रँड एआय+नं एप्रिल 2026 मध्ये आपल्या नव्या उत्पादनांची घोषणा केली. गुरुवारी झालेल्या लाँच इव्हेंटमध्ये कंपनीनं एआय+ नोव्हा 2 सीरीज आणि एआय+ नोव्हा फ्लिप G सादर केले. या सीरीजमध्ये दोन मुख्य मॉडेल्स एआय+ नोव्हा 2 5G आणि एआय+ नोव्हा 2 अल्ट्रा 5G समाविष्ट आहेत. दोन्ही फोन 5G सपोर्टसह येतात आणि बजेट सेगमेंटमध्ये आकर्षक फीचर्स देतात.
Nova 2 5G, Nova 2 Ultra 5G, and NovaFlip 5G. No more guessing. #NovaSeries pic.twitter.com/zufwUr5rCM
— Madhav Sheth (@MadhavSheth1) April 9, 2026
6000 एमएएच बॅटरी : कंपनीनं यातील दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 50 मेगापिक्सल मुख्य कॅमेरा आणि 6000 एमएएच बॅटरी दिली आहे. हे फोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होतील. नोव्हा 2 सीरीज बजेट आणि मिड-रेंज यूजर्ससाठी डिझाइन करण्यात आली आहे. यात एआय फीचर्स, चांगला डिस्प्ले आणि दीर्घकाळ टिकणारी बॅटरी यांचा समावेश आहे. लाँच इव्हेंटमध्ये कंपनीनं नव्या फोनची डिझाइन, कलर ऑप्शन्स आणि काही मुख्य स्पेसिफिकेशन्स जाहीर केल्या.
एआय+ नोव्हा 2 5G किंमत आणि उपलब्धता: एआय+ नोव्हा 2 5G चं बेस व्हेरियंट (4जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज) ची किंमत भारतात 9,999 रुपये पासून सुरू होते. 6 जीबी + 128 जीबी व्हेरियंटची किंमत अद्याप जाहीर झालेली नाही. हा फोन 14 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.
ड्युअल रियर कॅमेरा सेटअप : या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50 मेगापिक्सल मुख्य सेन्सरचा समावेश आहे. बॅटरी 600एमएएच क्षमतेची आहे जी एका चार्जवर पूर्ण दिवस टिकते. फोन पाच रंगांमध्ये उपलब्ध असेल. ब्लॅक, ब्लू, ग्रीन, पिंक आणि पर्पल. यूजर्सना हा फोन दैनंदिन वापरासाठी, सोशल मीडिया, व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि हलक्या गेमिंगसाठी योग्य वाटेल. Unisoc T8200 प्रोसेसर आणि 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले यामुळं स्क्रोलिंग आणि वापर अनुभव स्मूथ राहील. Android 16 आधारित nxtQuantom OS वर चालणारा हा फोन एआय फीचर्ससह येतो.
एआय+ नोव्हा 2 अल्ट्रा 5G प्रीमियम बजेट पर्याय: एआय+ नोव्हा 2 अल्ट्रा 5G चं बेस व्हेरियंट (6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज) ची प्रभावी किंमत 14,999 रुपये आहे. यात बँक ऑफर्स, कॅशबॅक आणि एक्सचेंज बोनसचा समावेश असू शकतो. 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत अद्याप जाहीर झालेली नाही. हा फोन 17 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर विक्रीसाठी येईल. उपलब्ध कलर ऑप्शन्स आहेत. ब्लॅक, ब्लू, ग्रीन, पर्पल आणि रेड. अल्ट्रा मॉडेलमध्ये कस्टमायझेबल रियर लाइटिंग फीचर असल्याचं सांगितलं जातं जे नोटिफिकेशन्स, कॉल्स आणि म्युझिकसाठी वापरता येईल.
हे वाचलंत का :

