केटीएम 200 ड्यूक आणि 250 ड्यूक नवीन रंग पर्यायासह लॉंच
2026 केटीएम 200 ड्यूक आणि 250 ड्यूक नवीन रंग पर्यायांसह भारतात लाँच झाल्या आहेत. जाणून घ्या किंमत आणि फीचर...

Published : February 25, 2026 at 10:44 AM IST
मुंबई : KTM इंडियानं त्यांच्या ड्यूक व्हेरिएंटमध्ये दोन एंट्री-लेव्हल बाइक्स लॉंच केल्या आहेत. KTM 200 ड्यूक आणि KTM 250 ड्यूक, नवीन रंगांसह अपडेट झाल्या आहे. कंपनीनं आंतरराष्ट्रीय बाजारात सादर केलेल्या या मॉडेल्ससाठी समान रंग योजना स्वीकारली आहे, ज्यामुळं त्या अधिक आकर्षक बनल्या आहेत. नवीन अपडेटमध्ये, 250 ड्यूक आता स्लेट ग्रे आणि सिल्व्हर मेटॅलिक पेंट स्कीममध्ये उपलब्ध आहे, तर 200 ड्यूकमध्ये नवीन अटलांटिक ब्लू रंग आहे.
किंमत
अपडेट्स जरी फक्त रंगांमध्ये असले, तरी किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. KTM 250 ड्यूकची किंमत 2.13 लाख (एक्स-शोरूम) आहे, तर KTM 200 ड्यूकची किंमत 1.93 लाख (एक्स-शोरूम) आहे.
KTM 250 ड्यूक
KTM 250 ड्यूक आता स्लेट ग्रे आणि सिल्व्हर मेटॅलिक सारख्या नवीन, आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळं त्यांचा स्ट्रीटफायटर लूक आणखी आकर्षक झाला आहे. यात 248.8 सीसी लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे 30.75 बीएचपी आणि 25 एनएम टॉर्क जनरेट करतं. या बाईक स्लिपर क्लचसह 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेल्या आहे. त्यामुळं स्मूथ आणि कंट्रोल्ड रायडिंग अनुभव मिळतो. यात डब्ल्यूपी एपेक्स सस्पेंशन, 320 मिमी फ्रंट आणि 240 मिमी रियर डिस्क ब्रेक्स, ड्युअल-चॅनेल एबीएससह आहेत. 17-इंच चाके, 800 मिमी सीट उंची आणि अंदाजे 163 किलो वजन यामुळं ती संतुलित राहते.
केटीएम 200 ड्यूक
केटीएम 200 ड्यूक आता नवीन अटलांटिक ब्लू रंगात उपलब्ध आहे, ज्यामुळं ती पूर्वीपेक्षा अधिक स्टायलिश आणि आकर्षक दिसते. यात 199.5 सीसी, लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे 24.68 बीएचपी आणि 19.3 एनएम टॉर्क जनरेट करतं. ही बाईक स्लिपर क्लचसह 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेली आहे, ज्यामुळं गियर शिफ्टिंग सोपं होतं. यात WP सस्पेंशन सेटअप, 300 मिमी फ्रंट आणि 230 मिमी रिअर डिस्क ब्रेक आणि ड्युअल-चॅनेल ABS आहेत. 17-इंच चाकं चांगली रोड ग्रिप देतात.
आहे काय खास?
दोन्ही बाईक्समध्ये यांत्रिकरित्या कोणतेही बदल नसले तरी, नवीन रंगामुंळ त्यांना आकर्षक लूक मिळतोय. दोन्ही दुचाकी आता शक्तिशाली कामगिरीसह स्टाईल हवं असलेल्या रायडर्ससाठी एक आकर्षक पर्याय आहे.
हे वाचलंत का :

