नांदेडमध्ये हत्येचा थरार : जुन्या वादातून तरुणाची हत्या, आई, भाऊ गंभीर जखमी
नांदेडमधील एकता नगर इथं ३२ वर्षीय युवकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आकाश मिलिंद देवणे असं हत्या करण्यात आलेल्या युवकाचं नाव आहे.

Published : August 28, 2026 at 10:48 AM IST
नांदेड : पावडेवाडी रोड परिसरातील एकता नगर इथं ३२ वर्षीय युवकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आकाश मिलिंद देवणे असं हत्या करण्यात आलेल्या युवकाचं नाव आहे. या घटनेत त्याचा भाऊ महेश मिलिंद देवणे तसेच आई सविता मिलिंद देवणे हे दोघं जखमी झाले आहेत. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात चार आरोपी निष्पन्न झाले असून नितीन, रोहित, कुणाल आणि सिद्धार्थ सावते अशी त्यांची नावं आहेत. यापैकी रोहित, कुणाल आणि सिद्धार्थ सावते यांना भाग्यनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर एका आरोपीचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी दिली. मात्र ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
रक्ताच्या थोरोळ्यात पडलेला होता तरुण : घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंजने, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "रात्री दहाच्या सुमारास माहिती मिळताच पावडेवाडी रोड एकता नगर इथं पोलीस पथकासह गेलो असतो आकाश दवणे हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळला. त्यास शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्याचा मृत्यू झाला होता. त्यासोबत त्याची आई आणि भाऊ हे देखील जखमी झाले होते. या हत्येप्रकरणी तीन आरोपी अटकेत आहेत, एक आरोपी फरार आहे. त्याचा शोध घेत आहोत," अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी दिली.
हेही वाचा :

