ETV Bharat / state

कोणता झेंडा घेऊ हाती? विविध पक्षांच्या झेंडे, शाल, खरेदीला गर्दी

मतदार कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेऊन कोणाला सत्ता देणार हे येत्या 16 तारखेलाच कळणार आहे, तसेच कार्यकर्त्यांची झेंडे, टोपी खरेदीला मोठी गर्दी होताना पाहायला मिळतंय.

buy flags and scarves of various political parties
विविध पक्षांच्या झेंडे, शाल, खरेदीला गर्दी (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 5, 2026 at 3:19 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

पुणे - महापालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झाली असून, विविध पक्षांच्या उमेदवारांकडून डिजिटल प्रचार जोरात सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. मतदार कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेऊन कोणाला सत्ता देणार हे येत्या 16 तारखेलाच कळणार असताना पुण्यातील मुरूडकर झेंडेवाले यांच्याकडे सर्वच पक्षाचे झेंडे, शाल, टोपी, बॅच खरेदीला मोठी गर्दी होताना पाहायला मिळतंय.

विविध साहित्य खरेदीसाठी गर्दी : निवडणुकीच्या या रणधुमाळीत सर्वच पक्षांकडून प्रचार रॅली तसेच प्रचार सभा आणि मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करावा लागतो, यासाठी पक्षाचे झेंडे, शाल, टोपी, बॅच, बिल्ले हे उमेदवारांसहित कार्यकर्त्यांना लागत असतात. पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडे हे साहित्य गेल्या अनेक दशकांपासून बनविले जातात आणि ते खूप प्रसिद्धदेखील आहे. यंदाच्या या महापालिकेच्या निवडणुकीतदेखील मोठ्या प्रमाणावर विविध पक्षांकडून मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडे झेंडे तसेच विविध साहित्य खरेदीसाठी गर्दी होताना पाहायला मिळतंय.

शाही उपरणे आणि शाही पगडीला विशेष मागणी : याबाबत मुरुडकर झेंडेवाले म्हणाले की, सध्या झेंडे, उपरणे, टोप्या, बॅचेस आणि विविध पक्षाचे चिन्ह यांना मोठ्या प्रमाणावर मागणी सुरू झालीय. ज्या उमेदवारांना ज्या ज्या पक्षाची उमेदवारी मिळाली आहे ते त्या त्या पक्षातील साहित्य खरेदी करतच आहेत. मात्र ज्यांना उमेदवारी मिळाली नाहीत आणि ज्यांनी बंड केलाय आणि त्यांना निवडणूक आयोगाने जे चिन्ह दिलंय, त्यांचीदेखील मागणी मोठ्या प्रमाणात वाढलीय. यंदा शाही उपरणे आणि शाही पगडी हे विशेष असून, याला जास्त मागणी आहे, असंही यावेळी त्यांनी सांगितलंय.

पक्षाचं साहित्य घेण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून गर्दी : सध्या महापालिकेच्या या निवडणुकीत आता आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झालीय. उमेदवारांकडून डिजिटल प्रचाराला जास्त महत्त्व दिलं जात असलं तरी पक्षाचे झेंडे, उमेदवारांचे उपरणे, झेंडे, उपरणे, टोप्या, बॅचेस याला देखील मागणी असून, हे घेण्यासाठी उमेदवाराकडून तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांकडून गर्दी केली जातेय.