ETV Bharat / state

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ऐतिहासिक विजय; 'दीदी, खेला होबे नही तर खेला खतम हो गया', नवनीत राणा यांचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयानंतर माजी खासदार नवनीत राणा यांनी ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.

Navneet Rana
नवनीत राणा (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 4, 2026 at 7:32 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

अमरावती : आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज (4 मे) जाहीर झाले आहेत. या निकालांनी भारतीय राजकारणात मोठे फेरबदल घडवून आणल्याचं दिसत आहे.

नवनीत राणा यांचा ममता बॅनर्जीवर साधला निशाणा : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस पक्षाचा पराभव करत भारतीय जनता पार्टीनं ऐतिहासिक विजय मिळवला आहे. यावर अमरावतीच्या माजी खासदार आणि भाजपा नेत्या नवनीत राणा यांनी तीव्र प्रक्रिया व्यक्त केली. "खेला होबे नही तर खेला खतम हो गया", अशा शब्दात त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. या विजयामुळं पश्चिम बंगालमध्ये विकासाचा नवा अध्याय सुरू होईल अशी अपेक्षा देखील नवनीत राणा यांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया देताना नवनीत राणा (ETV Bharat Reporter)


मोदी शाह यांच्या नेतृत्वाला दिलं‌ श्रेय : या विजयाचं संपूर्ण श्रेय नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाला देत नवनीत राणा म्हणाल्या की, योग्य रणनीती आणि संघटित प्रयत्नामुळं हा निकाल शक्य झाला. बंगालच्या जनतेनं बदलाची इच्छा व्यक्त केली असून हा केवळ राजकीय विजय नसून जनतेच्या भावनांचा सन्मान आहे. 'मोदी है तो मुमकिन है' असं म्हणत नवनीत राणा यांनी नेतृत्वावरील विश्वासही व्यक्त केला.



महिलांच्या सुरक्षेपासून विकासापर्यंत मुद्द्यांचा उल्लेख : पश्चिम बंगालमध्ये महिलांची सुरक्षा, घुसकरांचा प्रश्न आणि रोजगाराच्या संधी यासारख्या मुद्द्यांवर जनतेनं मतदान केल्याचं नवनीत राणा यांनी सांगितलं. पश्चिम बंगालच्या जनतेने अन्याय आणि अहंकाराला नाकारत विकासाचा मार्ग निवडला असल्याचं त्यांनी नमूद केलं. राज्यातील बदलामुळं सर्वसामान्यांना नागरी विशेषतः महिला आणि युवक यांना सुरक्षित आणि प्रगत वातावरण मिळेल अशी अपेक्षा देखील नवनीत राणा यांनी व्यक्त केली.

हेही वाचा -

  1. बारामतीत सुनेत्रा पवारांचा ऐतिहासिक विजय; देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा विक्रम
  2. राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले यांचा विजय; मतदारांचा विश्वास जपणारच, अक्षय कर्डिले यांची प्रतिक्रिया
  3. 'ही तर सुरुवात...'; बारामती निकालानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया